S M L

एक तास लाईट बंद ठेवून पृथ्वी वाचवण्यासाठी हातभार लावा !

मुश्ताक खान, मुंबई26 मार्चग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी तुम्हीही आता हातभार लावू शकता आज शनिवारी आपल्या घरातील लाईट्स एका तासासाठी बंद ठेवण्याचा दिवस आहे. रात्री साडे आठ वाजता देशभरात अर्थ अवर साजरा करण्याच येणार आहे. या दिनी बॉलीवूड कलाकारांसह कॉर्पोरेट जगतही बत्ती बंद ठेवणार आहेत.26 मार्च हा दिवस लाईट बंद करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. बदलत्या वातावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी डब्लूडब्लूएफ तर्फे अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत देशभारतील 70 लाख नागरिक लाईट्स बंद करुन पृथ्वी वाचवण्यासाठी हातभार लावणार आहेत.या मोहिमेत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनही सहभागी झाली आहे. यंदा या मोहिमेचं हे तिसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी मुंबईत एका तासात 65 मेगावॅट विजेची बचत करण्यात आली होती. दिल्लीच्या कुतूब मिनार, लाल किल्ला तर मुंबईतील सीएसटी, एअर इंडिया बिल्डिंग, आणि रिझर्व बँकेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळीही कॉर्परेट कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सध्या क्रिकेट वर्ल्ड कप सुरु असल्यामुळे क्रिकेट फॅन्सनाही विद्याने आवाहन केले आहे. यावेळी भारतातच नव्हे तर जगभरातील लाईट्स बंद करण्यात येणार आहे. तेव्हा तुम्हीही आपल्या घरातील,कार्यालयातील लाईट्स बंद करायला विसरु नका.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 09:12 AM IST

एक तास लाईट बंद ठेवून पृथ्वी वाचवण्यासाठी हातभार लावा !

मुश्ताक खान, मुंबई

26 मार्च

ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी तुम्हीही आता हातभार लावू शकता आज शनिवारी आपल्या घरातील लाईट्स एका तासासाठी बंद ठेवण्याचा दिवस आहे. रात्री साडे आठ वाजता देशभरात अर्थ अवर साजरा करण्याच येणार आहे. या दिनी बॉलीवूड कलाकारांसह कॉर्पोरेट जगतही बत्ती बंद ठेवणार आहेत.

26 मार्च हा दिवस लाईट बंद करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. बदलत्या वातावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी डब्लूडब्लूएफ तर्फे अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत देशभारतील 70 लाख नागरिक लाईट्स बंद करुन पृथ्वी वाचवण्यासाठी हातभार लावणार आहेत.या मोहिमेत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनही सहभागी झाली आहे.

यंदा या मोहिमेचं हे तिसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी मुंबईत एका तासात 65 मेगावॅट विजेची बचत करण्यात आली होती. दिल्लीच्या कुतूब मिनार, लाल किल्ला तर मुंबईतील सीएसटी, एअर इंडिया बिल्डिंग, आणि रिझर्व बँकेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळीही कॉर्परेट कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

त्याचबरोबर सध्या क्रिकेट वर्ल्ड कप सुरु असल्यामुळे क्रिकेट फॅन्सनाही विद्याने आवाहन केले आहे. यावेळी भारतातच नव्हे तर जगभरातील लाईट्स बंद करण्यात येणार आहे. तेव्हा तुम्हीही आपल्या घरातील,कार्यालयातील लाईट्स बंद करायला विसरु नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close