S M L

है तयार हम...

27 मार्चवर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आता येत्या बुधवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान मुकाबला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर विरोधी टीम आमने सामने असतील. फायनलपूर्वीची फायनल असं या मॅचचं वर्णन केलं जात आहे. या मॅचसाठी दोन्ही टीम मोहालीत दाखल झाल्या आहेत. पाकिस्तानची टीम शुक्रवारी पोहचली तर भारतीय टीम शनिवारी दाखल झाली. भारतानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्ताननं वेस्टइंडिजचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मॅच 30 तारखेला होणार असल्याने दोन्ही टीमला सरावासाठी चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राजकारणी आणि नेतेमंडळीसुद्धा यात मागे नाहीत. यानिमित्तानं क्रिकेट डिप्लोमसीही सुरू झाली. मोहालीत होणार्‍या मॅचसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनासुद्धा त्यांनी निमंत्रण दिलंय. निमंत्रणाचे पत्र भारतातील पाकिस्तानी राजदूतांकडे देण्यात आलंय. पाकिस्तानने या निमंत्रणाचे स्वागत केलंय. दरम्यान, पंतप्रधान युसुफ रझा गिलानी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांची भेट घेऊन मॅचला उपस्थित राहण्यासंदर्भातला निर्णय कळवणार आहेत. मॅचसाठी रेकॉर्ड-ब्रेक गर्दी ; चंदीगढला छावणीचं स्वरूपयेत्या बुधवारी भारत-पाकिस्तानदरम्यान होणार्‍या वर्ल्डकपच्या महासंग्रामाकडे दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींचे डोळे लागले. ज्या ठिकाणी हे क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे त्या चंदीगढमधले चित्र काहीसं निराशादायी आहे. मॅचची तिकीट मिळत नसल्याने इथल्या क्रिकेटप्रेमींमध्ये निराशेची भावना आहे. दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगढला मात्र पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. मोहालीच्या स्टेडियमबाहेर लांबच लांब रांग सेमीफायनल मॅचच्या तिकीटासाठी लागत आहे. केवळ चंदीगढच नव्हे तर आंध्रप्रदेशातून आलेले क्रिकेटप्रेमीही या रांगेत उभे आहेत. मात्र मॅचची तिकीट मिळत नसल्याने त्यांची निराशा केली. जवळपास सोळा हजार तिकीट विकल्या गेल्याचा अंदाज आहे. मात्र आता तिकीटांसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागताहेत. आणि तेच सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींच्या आवाक्याबाहेर आहे.ही मॅच पाहण्यासाठी चंदीगढमध्ये क्रिकेटप्रेमींची रेकॉर्डब्रेक गर्दी होतेय. भारत आणि पाकिस्तानची टीमही चंदीगढमध्ये दाखल झाली आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल पाच हजार पाकिस्तानी नागरिकांना भारताने मॅचसाठी व्हिसा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या गर्दीत आणखीनच वाढ होणार आहे. ज्या ताज हॉटेलमध्ये दोन्ही टीम उतरल्या आहेत तो सगळा परिसर कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे. स्टेडियमच्या सुरक्षेची सूत्रं मोहाली पोलिसांच्या हाती आहेत. त्याचबरोबर सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्याही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. फक्त तिकीटधारक क्रिकेटप्रेमींनाच स्टेडियमच्या एक किलोमीटरच्या परिसरात प्रवेश मिळणार आहे. या मॅचची तिकीट याआधीच विकली गेली आहेत. मात्र क्रिकेटप्रेमी अजूनही तिकीट मिळतील या आशेवर आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यान होणार्‍या या महायुद्धाची उत्सुकता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 05:10 PM IST

है तयार हम...

27 मार्च

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आता येत्या बुधवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान मुकाबला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर विरोधी टीम आमने सामने असतील. फायनलपूर्वीची फायनल असं या मॅचचं वर्णन केलं जात आहे. या मॅचसाठी दोन्ही टीम मोहालीत दाखल झाल्या आहेत.

पाकिस्तानची टीम शुक्रवारी पोहचली तर भारतीय टीम शनिवारी दाखल झाली. भारतानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्ताननं वेस्टइंडिजचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मॅच 30 तारखेला होणार असल्याने दोन्ही टीमला सरावासाठी चार दिवसांचा अवधी मिळणार आहे.

या महामुकाबल्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राजकारणी आणि नेतेमंडळीसुद्धा यात मागे नाहीत. यानिमित्तानं क्रिकेट डिप्लोमसीही सुरू झाली. मोहालीत होणार्‍या मॅचसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनासुद्धा त्यांनी निमंत्रण दिलंय.

निमंत्रणाचे पत्र भारतातील पाकिस्तानी राजदूतांकडे देण्यात आलंय. पाकिस्तानने या निमंत्रणाचे स्वागत केलंय. दरम्यान, पंतप्रधान युसुफ रझा गिलानी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांची भेट घेऊन मॅचला उपस्थित राहण्यासंदर्भातला निर्णय कळवणार आहेत.

मॅचसाठी रेकॉर्ड-ब्रेक गर्दी ; चंदीगढला छावणीचं स्वरूपयेत्या बुधवारी भारत-पाकिस्तानदरम्यान होणार्‍या वर्ल्डकपच्या महासंग्रामाकडे दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींचे डोळे लागले. ज्या ठिकाणी हे क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे त्या चंदीगढमधले चित्र काहीसं निराशादायी आहे. मॅचची तिकीट मिळत नसल्याने इथल्या क्रिकेटप्रेमींमध्ये निराशेची भावना आहे. दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगढला मात्र पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे.

मोहालीच्या स्टेडियमबाहेर लांबच लांब रांग सेमीफायनल मॅचच्या तिकीटासाठी लागत आहे. केवळ चंदीगढच नव्हे तर आंध्रप्रदेशातून आलेले क्रिकेटप्रेमीही या रांगेत उभे आहेत. मात्र मॅचची तिकीट मिळत नसल्याने त्यांची निराशा केली. जवळपास सोळा हजार तिकीट विकल्या गेल्याचा अंदाज आहे. मात्र आता तिकीटांसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागताहेत. आणि तेच सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींच्या आवाक्याबाहेर आहे.

ही मॅच पाहण्यासाठी चंदीगढमध्ये क्रिकेटप्रेमींची रेकॉर्डब्रेक गर्दी होतेय. भारत आणि पाकिस्तानची टीमही चंदीगढमध्ये दाखल झाली आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल पाच हजार पाकिस्तानी नागरिकांना भारताने मॅचसाठी व्हिसा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या गर्दीत आणखीनच वाढ होणार आहे.

ज्या ताज हॉटेलमध्ये दोन्ही टीम उतरल्या आहेत तो सगळा परिसर कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे. स्टेडियमच्या सुरक्षेची सूत्रं मोहाली पोलिसांच्या हाती आहेत. त्याचबरोबर सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्याही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. फक्त तिकीटधारक क्रिकेटप्रेमींनाच स्टेडियमच्या एक किलोमीटरच्या परिसरात प्रवेश मिळणार आहे.

या मॅचची तिकीट याआधीच विकली गेली आहेत. मात्र क्रिकेटप्रेमी अजूनही तिकीट मिळतील या आशेवर आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यान होणार्‍या या महायुद्धाची उत्सुकता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close