S M L

भारत - पाक सामन्याच्या निमित्ताने गृहसचिवांची बैठक

28 मार्चभारत-पाक क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण काहीस निवळत आहे. भारत-पाक क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधलं तणावाचं वातावरण काहीसं निवळतंय. याच डिप्लोमसीचा एक भाग म्हणून दोन्ही देशांच्या गृहसचिवांची आज दिल्लीत बैठक झाली. 26/11 च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक झाली. अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई, व्हीसाचा प्रश्न आणि इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे भारताचे गृहसचिव जी. के. पिल्लई आणि पाकिस्तानचे उच्चायुक्त शाहीद मलिक यांनी सांगितलं. या बैठकीनंतरच्या प्रगतीचा आढावा दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री येत्या जुलै महिन्यात घेणार आहेत. दोन्ही देशांचे 17 प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहे. गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींसाठी रात्री स्नेहभोजनही आयोजित केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 10:14 AM IST

भारत - पाक सामन्याच्या निमित्ताने गृहसचिवांची बैठक

28 मार्च

भारत-पाक क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण काहीस निवळत आहे. भारत-पाक क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधलं तणावाचं वातावरण काहीसं निवळतंय. याच डिप्लोमसीचा एक भाग म्हणून दोन्ही देशांच्या गृहसचिवांची आज दिल्लीत बैठक झाली. 26/11 च्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक झाली. अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई, व्हीसाचा प्रश्न आणि इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे भारताचे गृहसचिव जी. के. पिल्लई आणि पाकिस्तानचे उच्चायुक्त शाहीद मलिक यांनी सांगितलं. या बैठकीनंतरच्या प्रगतीचा आढावा दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री येत्या जुलै महिन्यात घेणार आहेत. दोन्ही देशांचे 17 प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहे. गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींसाठी रात्री स्नेहभोजनही आयोजित केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close