S M L

टीम इंडिया जिंकली तर एका मिसळवर एक मिसळ फ्री !

28 मार्चपुणे म्हटलं की पुणेरी पाट्या, पुणे म्हटलं की पुणेरी मिसळ. पण अशाचं एका पाट्यानी सर्व क्रिकेट प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. पुण्यातील भरत नाट्यगृहासमोरील सत्यम हॉटेलच्या मालकाने '30 मार्चला भारत-पाक मॅच दरम्यान टीम इंडिया जिंकली तर एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्यात येईल' अशी पाटी हॉटेल बाहेर लावली आहे. हल्ली सत्यम हॉटेलमध्ये मिसळ खाण्यास चांगलीचं गर्दी असते. पण या पाटीमुळे क्रिकेटप्रेमींची एकच गर्दी होतं आहे. सत्यम हॉटेलचे मालक अशोक जाधव म्हणतात की, भारत जिंकणारचं असा विश्वास आहे यासाठी जवळपास 5 हजार मिसळची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील मिसळ ही घराघरात पोहचावी हा यामागचा उद्देश आहे असं ही त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 05:54 PM IST

टीम इंडिया जिंकली तर एका मिसळवर एक मिसळ फ्री !

28 मार्च

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या, पुणे म्हटलं की पुणेरी मिसळ. पण अशाचं एका पाट्यानी सर्व क्रिकेट प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. पुण्यातील भरत नाट्यगृहासमोरील सत्यम हॉटेलच्या मालकाने '30 मार्चला भारत-पाक मॅच दरम्यान टीम इंडिया जिंकली तर एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्यात येईल' अशी पाटी हॉटेल बाहेर लावली आहे. हल्ली सत्यम हॉटेलमध्ये मिसळ खाण्यास चांगलीचं गर्दी असते. पण या पाटीमुळे क्रिकेटप्रेमींची एकच गर्दी होतं आहे. सत्यम हॉटेलचे मालक अशोक जाधव म्हणतात की, भारत जिंकणारचं असा विश्वास आहे यासाठी जवळपास 5 हजार मिसळची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील मिसळ ही घराघरात पोहचावी हा यामागचा उद्देश आहे असं ही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close