S M L

पुणे : बी.आर.टी प्रकरणी पी.एम.पीला सोमवारची अंतिम मुदत

अद्वैत मेहता, पुणे 28 मार्चपुण्यामध्ये वादग्रस्त ठरलेल्या बी.आर.टी म्हणजेच बस रॅपिड ट्रान्सिट प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी पी.एम.पीला आज सोमवारची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळेच पीएमपीने आज पुण्यातील सावरकर भवन मध्ये तातडीची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत बी.आर.टी बाबत कोणता निर्णय घेतला जातोय याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. बी.आर.टी प्रकल्पातील त्रुटींचा पर्दाफाश झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि राजकीय पुढारी खडबडून जागे झाले आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी बी.आर.टी प्रकल्प मार्गी लागावा याकरता पुढाकार घेतला असून स्वयंसेवी संस्था आणि पत्रकारांसमोर सल्लागार समितीचे सादरीकरण ठेवण्यात आलेय. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी राजकीय इच्छासक्ती दाखवून सक्षम बी.आर.टी राबवा अन्यथा बी.आर.टी ऐवजी शहर बससेवेची वाहतूक व्यवस्था बळकट करा असे मत व्यक्त केले.आय.एल.एफ.एस या संस्थेने पुण्यातील बी.आर.टी प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा अर्धवट असून, हा प्रकल्प या अर्धवट आराखड्यानुसारच राबवला जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 2006 साली गाजावाजा करून, देशात प्रथम पुण्यात हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. पण या प्रकल्पाचा बोजवाराच उडाला. नवे स्थायी समिती अध्यक्ष भाजपच्या गणेश बिडकरांनी प्रकल्पातील त्रुटी दूर करण्याकरता वाहतूक क्षेत्रातील सल्लागार कंपनी आय.टी.डी.पी ला सादरीकरण करायला सांगितले. संस्थेच्या प्रतिनिधींनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर बी.आर.टी नामी उपाय ठरू शकतो पण अंमलबजावणी प्रभावी हवी असे मत व्यक्त केलेय.पुण्यातील स्वयंसेवी संस्था गेली 5 वर्ष सातत्याने हेच सांगत होत्या की घाईघाईने प्रकल्प राबवू नका, पादचारी सायकलस्वारांचाही विचार करा आताही प्रशासनाला तोच सल्ला आहे. बी.आर.टी वरून पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पण पी.एम.पी च्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणार्‍या 12 लाख पुणेकरांचा विचार करायला कुणीच तयार नाहीे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 03:06 PM IST

पुणे : बी.आर.टी प्रकरणी पी.एम.पीला सोमवारची अंतिम मुदत

अद्वैत मेहता, पुणे

28 मार्च

पुण्यामध्ये वादग्रस्त ठरलेल्या बी.आर.टी म्हणजेच बस रॅपिड ट्रान्सिट प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी पी.एम.पीला आज सोमवारची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळेच पीएमपीने आज पुण्यातील सावरकर भवन मध्ये तातडीची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत बी.आर.टी बाबत कोणता निर्णय घेतला जातोय याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

बी.आर.टी प्रकल्पातील त्रुटींचा पर्दाफाश झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि राजकीय पुढारी खडबडून जागे झाले आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी बी.आर.टी प्रकल्प मार्गी लागावा याकरता पुढाकार घेतला असून स्वयंसेवी संस्था आणि पत्रकारांसमोर सल्लागार समितीचे सादरीकरण ठेवण्यात आलेय. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी राजकीय इच्छासक्ती दाखवून सक्षम बी.आर.टी राबवा अन्यथा बी.आर.टी ऐवजी शहर बससेवेची वाहतूक व्यवस्था बळकट करा असे मत व्यक्त केले.

आय.एल.एफ.एस या संस्थेने पुण्यातील बी.आर.टी प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा अर्धवट असून, हा प्रकल्प या अर्धवट आराखड्यानुसारच राबवला जात असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. 2006 साली गाजावाजा करून, देशात प्रथम पुण्यात हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. पण या प्रकल्पाचा बोजवाराच उडाला. नवे स्थायी समिती अध्यक्ष भाजपच्या गणेश बिडकरांनी प्रकल्पातील त्रुटी दूर करण्याकरता वाहतूक क्षेत्रातील सल्लागार कंपनी आय.टी.डी.पी ला सादरीकरण करायला सांगितले. संस्थेच्या प्रतिनिधींनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर बी.आर.टी नामी उपाय ठरू शकतो पण अंमलबजावणी प्रभावी हवी असे मत व्यक्त केलेय.

पुण्यातील स्वयंसेवी संस्था गेली 5 वर्ष सातत्याने हेच सांगत होत्या की घाईघाईने प्रकल्प राबवू नका, पादचारी सायकलस्वारांचाही विचार करा आताही प्रशासनाला तोच सल्ला आहे. बी.आर.टी वरून पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पण पी.एम.पी च्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणार्‍या 12 लाख पुणेकरांचा विचार करायला कुणीच तयार नाहीे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close