S M L

पुणे गॅस प्रकल्पाबाबत हिरानदांनी पत्नीसह कोर्टात हजर

28 मार्चपुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ कार्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करत निरंजन हिरानदांनी आज त्यांच्या पत्नीसह कोर्टात हजर झाले. नवलाख उमरे इथं हिरानंदानी गॅस विद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारतांना त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडगाव मावळ कोर्टाने हिरानंदानींसह त्यांची पत्नी आणि मुलांसह इतर चौघांना वेळोवेळी समन्स बजावले होते. परंतु हिरानंदानी आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयात हजर राहत नसल्याने कोर्टाने नोटीस बजावली होती. नवलाख उमरे येथील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकल्प उभारतांना आपण सर्व संबधीत विभागाच्या परवानग्या मिळवल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु या प्रकल्पाला नेमका कुणाचा विरोध आहे आणि प्रकल्प इतर राज्यात नेण्यासाठी तुमच्यावर कोण दबाव टाकतोय या प्रश्नाच उत्तर ते देऊ शकले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 04:08 PM IST

पुणे गॅस प्रकल्पाबाबत हिरानदांनी पत्नीसह कोर्टात हजर

28 मार्च

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ कार्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करत निरंजन हिरानदांनी आज त्यांच्या पत्नीसह कोर्टात हजर झाले. नवलाख उमरे इथं हिरानंदानी गॅस विद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारतांना त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडगाव मावळ कोर्टाने हिरानंदानींसह त्यांची पत्नी आणि मुलांसह इतर चौघांना वेळोवेळी समन्स बजावले होते.

परंतु हिरानंदानी आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयात हजर राहत नसल्याने कोर्टाने नोटीस बजावली होती. नवलाख उमरे येथील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकल्प उभारतांना आपण सर्व संबधीत विभागाच्या परवानग्या मिळवल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु या प्रकल्पाला नेमका कुणाचा विरोध आहे आणि प्रकल्प इतर राज्यात नेण्यासाठी तुमच्यावर कोण दबाव टाकतोय या प्रश्नाच उत्तर ते देऊ शकले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close