S M L

भारताची बॅटिंग...दे घुमा के

30 मार्चवर्ल्ड कप च्या सेमीफायनलमध्ये भारतने प्रथम टॉस जिंकून भारताने प्रथम फलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या मॅचला भारत - पाक युध्दाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भारतीय टीममध्ये आर. अश्विनच्या जागी आशिष नेहराला संधी देण्यात आली आहे तर पाकिस्तानही क्वार्टर फायनलची आपली तीच टीम खेळवत आहे. त्यामुळे शोएब अख्तरला याही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही.मॅचसाठी दोन्ही देशातील राजकीय नेते तसेच बॉलिवूड अभिनेतेही मॅचसाठी स्टेडियमवर हजर आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी जातीने मॅच पाहायला मोहालीत आले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच महासचिव राहुल गांधीही मॅच पाहण्यासाठी हजर आहेत. तर बॉलिवूड स्टारमंडळीही आपल्या चित्रपटाचं शुटिंग रद्दकरून मॅच बघण्यासाठी आली आहे. मॅच सुरु होण्यापूर्वी युसुफ रझा गिलानी आणि मनमोहन सिंग यांनी दोन्ही टीमशी हस्तांदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 08:37 AM IST

भारताची बॅटिंग...दे घुमा के

30 मार्च

वर्ल्ड कप च्या सेमीफायनलमध्ये भारतने प्रथम टॉस जिंकून भारताने प्रथम फलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या मॅचला भारत - पाक युध्दाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भारतीय टीममध्ये आर. अश्विनच्या जागी आशिष नेहराला संधी देण्यात आली आहे तर पाकिस्तानही क्वार्टर फायनलची आपली तीच टीम खेळवत आहे. त्यामुळे शोएब अख्तरला याही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही.

मॅचसाठी दोन्ही देशातील राजकीय नेते तसेच बॉलिवूड अभिनेतेही मॅचसाठी स्टेडियमवर हजर आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी जातीने मॅच पाहायला मोहालीत आले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच महासचिव राहुल गांधीही मॅच पाहण्यासाठी हजर आहेत. तर बॉलिवूड स्टारमंडळीही आपल्या चित्रपटाचं शुटिंग रद्दकरून मॅच बघण्यासाठी आली आहे. मॅच सुरु होण्यापूर्वी युसुफ रझा गिलानी आणि मनमोहन सिंग यांनी दोन्ही टीमशी हस्तांदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close