S M L

पाक चारी मुंड्या चीत !

30 मार्चवर्ल्ड कप पटकावण्यापासून भारतीय टीम आता फक्त एक पाऊल दूर आहे. आज मोहालीत रंगलेल्या मेगासेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 29 रन्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याची परंपराही भारताने कायम राखली आहे. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 261 रन्सचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानची टीम 231 रन्सवर गारद झाली. मोहम्मद हाफिजने सर्वाधिक 43 रन्स केले. पण भारताच्या दमदार बॉलिंगसमोर पाकिस्तानचे इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. भारताच्या पाचही बॉलर्सनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 260 रन्स केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतातर्फे सर्वाधिक 85 रन्स केल्या आहेत.आता येत्या एप्रिलला भारत आणि श्रीलंका दरम्यान मुंबईत वर्ल्ड कपची मेगाफायनल रंगेल.पाकला हरवण्याची परंपरा कायम भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याची परंपरा कायम राखली आहे. तब्बल पाचव्यांदा भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन्ही टीम पहिल्यांदा आमने सामने आल्या आणि लढतीत भारताने पाकिस्तानचा 43 रन्सनं पराभव केला. यानंतर 1996 च्या वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानवर मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 287 रन्स केले आणि पाकिस्तानला 248 रन्समध्ये गुंडाळले. ही मॅच भारताने 39 रन्सने जिंकली. 1999 च्या वर्ल्ड कपमध्येही भारतानं पाकिस्तानचा पराभव करण्याची हॅट्‌ट्रीक केली. ही मॅच भारताने 47 रन्सने जिंकली. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम चौथ्यांदा आमने सामने आल्या आणि यावेळेलाही बाजी भारतानेच मारली. सचिन तेंडुलकरने केलेल्या 98 रन्सच्या जोरावर भारताने ही मॅच 6 विकेट्नं जिंकली होती. आणि आता 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.लकी सचिन..!मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 85 रन्सची झुंजार खेळी केली पण तो आजच्या मॅचमध्ये भलताच नशिबवान ठरून ही सेंचुरी मात्र पूर्ण करू शकला नाही. त्याला आजच्या मॅचमध्ये तब्बल 6 वेळा जीवदान मिळाले. पहिली दोन जीवदानं रेफरल सिस्टीममुळे मिळाली. सचिनविरुध्दचे एलबीडब्ल्यु आणि स्टम्पिंगचे अपिल रेफरल फेटाळले गेले. त्यानंतर सचिन 27 रन्सवर असताना मिसबाह उल हक तर 45 रन्सवर असताना युनीस खानने त्याला सोपं जीवदान दिलं. दोन्हीवेळेला दुदैर्वी बॉलर होता शाहिद आफ्रिदी. त्यानंतर विकेटकिपर अकमलने स्टम्पमागे दोनदा सचिनला जीवदान दिलं. अखेर सईद अजमलने त्याची विकेट काढली. शाहिद आफ्रिदीनंच त्याचा अजमलच्या बॉलिंगवर कॅच पकडला आणि सचिनला आउट केलं. सचिनने वन-डे मधील आपली 95 वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.खास उपस्थिती !भारत आणि पाकिस्तान दरम्यानची मेगा मॅच सुरु आहे. पण मॅचसाठी दोन्ही देशातील राजकीय नेते तसेच बॉलिवूड अभिनेतेही मॅचसाठी स्टेडियमवर हजर होते. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी मॅच पाहण्यासाठी खास मोहालीत उपस्थित होते. मॅच सुरु होण्यापूर्वी युसुफ रझा गिलानी आणि मनमोहन सिंग यांनी दोन्ही टीमशी हस्तांदोलन केलं. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच महासचिव राहुल गांधीही स्टेडियममधून मॅचसाठी हजर होते. राजकीय नेत्यांबरोबरच बॉलिवूड कलाकारही मागे राहिले नाही बॉलिवूड स्टार आमीर खान आणि किरण राव, दिपकी पदुकोण,बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी, शक्ती कपूर, डिनो मॉरिया आदी कलाकार मॅचचा आनंद लुटण्यासाठी हजर होते. तसेच किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या ही उपस्थित होते. स्कोअर बोर्ड पहिली इनिंग __________________________________________________________भारताचा स्कोअर - 260/9(49.5ov) __________________________________________________________ बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवागlbw B वहाब रईज38249सचिन तेंडुलकर C शाहिद आफ्रिदी B सईद अजमल8511411 गौतम गंभीर st कामरान अकमल B मोहम्मद हाफिज27322विराट कोहलीC उमर अकमल B वहाब रईज711युवराज सिंगB वहाब रईज01एम.एस.धोणी(C) lbw B वहाब रईज18322 सुरेश रैना नाबाद 36393हरभजन सिंग st कामरान अकमल b सईद अजमल 12 15 2झहिर खानबॅटिंग c कामरान अकमल B वहाब रईज 9 101आशिष नेहरा Run out कामरान अकमल 1 2 मुनाफ पटेल नाबाद 00 विकेटस: 1/48 (वीरेंद्र सेहवाग, 5.5 ov.), 2/116 (गौतम गंभीर, 18.5 ov.), 3/141 (विराट कोहली, 25.2 ov.), 4/141 (युवराज सिंग, 25.3 ov.), 5/187 (सचिन तेंडुलकर , 37.0 ov.), 6/205 (एम.एस.धोणी, 41.4 ov.),7/236 (हरभजन सिंग 46.4 ov.), 8/256 (झहिर खान 49.2 ov.), 9/258 (आशिष नेहरा 49.5 ov.) बॉलर्स OM R Wkts W No Econ उमर गुल60 450017.5अब्दुल रझाक20140007वहाब रईज80354434.38सईद अजमल80 331114.13शाहिद आफ्रिदी100450004.5मोहम्मद हाफिज100341103.4 दुसरी इनिंग __________________________________________________________ पाकिस्तानचा स्कोअर - 231/10(49.5ov) __________________________________________________________बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सकामरान अकमल C युवराज सिंग B झहिर खान19203मोहम्मद हाफिज C एम.एस.धोणी B मुनाफ पटेल43497असद शफीफ b युवराज सिंग 30392युनुस खानC सुरेश रैना b युवराज सिंग 1332 मिस्बाह-उल-हक C विराट कोहली B झहिर खान5676 5 1 उमर अकमल b हरभजन सिंग292412अब्दुल रझाक B मुनाफ पटेल 39शाहीद आफ्रिदी(C)C वीरेंद्र सेहवाग B युवराज सिंग 19141वहाब रईज c सचिन तेंडुलकर B आशिष नेहरा8 9 उमर गुल lbw B आशिष नेहरा 2 3 सइद अजमलनाबाद 15विकेटस::1/44 (कामरान अकमल 9 ov.), 2/70 (मोहम्मद हाफिज 15.3 ov.), 3/103 (असद शफीफ 23.5 ov.), 4/106 (युनुस खान 25.4 ov.) 5/142 (उमर अकमल 33.1 ov.), 6/150 (अब्दुल रझाक 36.2 ov.) 7/184 (शाहीद आफ्रिदी 41.5 ov.), 8/199 (वहाब रईज 44.5 ov.), 9/208 (उमर गुल 46.1 ov.), 10/231 (मिस्बाह-उल-हक 49.5 ov.)बॉलर्स OM R Wkts W No Econ झहिर खान9.50582206.11आशिष नेहरा100332003.3मुनाफ पटेल 101402104हरभजन सिंग100432004.3युवराज सिंग 10157200 5.7 __________________________________________________________

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 05:21 PM IST

पाक चारी मुंड्या चीत !

30 मार्च

वर्ल्ड कप पटकावण्यापासून भारतीय टीम आता फक्त एक पाऊल दूर आहे. आज मोहालीत रंगलेल्या मेगासेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 29 रन्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याची परंपराही भारताने कायम राखली आहे. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 261 रन्सचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानची टीम 231 रन्सवर गारद झाली. मोहम्मद हाफिजने सर्वाधिक 43 रन्स केले. पण भारताच्या दमदार बॉलिंगसमोर पाकिस्तानचे इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. भारताच्या पाचही बॉलर्सनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 260 रन्स केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतातर्फे सर्वाधिक 85 रन्स केल्या आहेत.आता येत्या एप्रिलला भारत आणि श्रीलंका दरम्यान मुंबईत वर्ल्ड कपची मेगाफायनल रंगेल.

पाकला हरवण्याची परंपरा कायम

भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याची परंपरा कायम राखली आहे. तब्बल पाचव्यांदा भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन्ही टीम पहिल्यांदा आमने सामने आल्या आणि लढतीत भारताने पाकिस्तानचा 43 रन्सनं पराभव केला.

यानंतर 1996 च्या वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानवर मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 287 रन्स केले आणि पाकिस्तानला 248 रन्समध्ये गुंडाळले. ही मॅच भारताने 39 रन्सने जिंकली.

1999 च्या वर्ल्ड कपमध्येही भारतानं पाकिस्तानचा पराभव करण्याची हॅट्‌ट्रीक केली. ही मॅच भारताने 47 रन्सने जिंकली. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम चौथ्यांदा आमने सामने आल्या आणि यावेळेलाही बाजी भारतानेच मारली. सचिन तेंडुलकरने केलेल्या 98 रन्सच्या जोरावर भारताने ही मॅच 6 विकेट्नं जिंकली होती. आणि आता 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.लकी सचिन..!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 85 रन्सची झुंजार खेळी केली पण तो आजच्या मॅचमध्ये भलताच नशिबवान ठरून ही सेंचुरी मात्र पूर्ण करू शकला नाही. त्याला आजच्या मॅचमध्ये तब्बल 6 वेळा जीवदान मिळाले. पहिली दोन जीवदानं रेफरल सिस्टीममुळे मिळाली. सचिनविरुध्दचे एलबीडब्ल्यु आणि स्टम्पिंगचे अपिल रेफरल फेटाळले गेले. त्यानंतर सचिन 27 रन्सवर असताना मिसबाह उल हक तर 45 रन्सवर असताना युनीस खानने त्याला सोपं जीवदान दिलं.

दोन्हीवेळेला दुदैर्वी बॉलर होता शाहिद आफ्रिदी. त्यानंतर विकेटकिपर अकमलने स्टम्पमागे दोनदा सचिनला जीवदान दिलं. अखेर सईद अजमलने त्याची विकेट काढली. शाहिद आफ्रिदीनंच त्याचा अजमलच्या बॉलिंगवर कॅच पकडला आणि सचिनला आउट केलं. सचिनने वन-डे मधील आपली 95 वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

खास उपस्थिती !

भारत आणि पाकिस्तान दरम्यानची मेगा मॅच सुरु आहे. पण मॅचसाठी दोन्ही देशातील राजकीय नेते तसेच बॉलिवूड अभिनेतेही मॅचसाठी स्टेडियमवर हजर होते. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी मॅच पाहण्यासाठी खास मोहालीत उपस्थित होते. मॅच सुरु होण्यापूर्वी युसुफ रझा गिलानी आणि मनमोहन सिंग यांनी दोन्ही टीमशी हस्तांदोलन केलं.

त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच महासचिव राहुल गांधीही स्टेडियममधून मॅचसाठी हजर होते. राजकीय नेत्यांबरोबरच बॉलिवूड कलाकारही मागे राहिले नाही बॉलिवूड स्टार आमीर खान आणि किरण राव, दिपकी पदुकोण,बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी, शक्ती कपूर, डिनो मॉरिया आदी कलाकार मॅचचा आनंद लुटण्यासाठी हजर होते. तसेच किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या ही उपस्थित होते.

स्कोअर बोर्ड

पहिली इनिंग

__________________________________________________________

भारताचा स्कोअर - 260/9(49.5ov)

__________________________________________________________

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सवीरेंद्र सेहवागlbw B वहाब रईज38249सचिन तेंडुलकर C शाहिद आफ्रिदी B सईद अजमल8511411 गौतम गंभीर st कामरान अकमल B मोहम्मद हाफिज27322विराट कोहलीC उमर अकमल B वहाब रईज711युवराज सिंगB वहाब रईज01एम.एस.धोणी(C) lbw B वहाब रईज18322 सुरेश रैना नाबाद 36393हरभजन सिंग st कामरान अकमल b सईद अजमल 12 15 2झहिर खानबॅटिंग c कामरान अकमल B वहाब रईज 9 101आशिष नेहरा Run out कामरान अकमल 1 2 मुनाफ पटेल नाबाद 00

विकेटस: 1/48 (वीरेंद्र सेहवाग, 5.5 ov.), 2/116 (गौतम गंभीर, 18.5 ov.), 3/141 (विराट कोहली, 25.2 ov.), 4/141 (युवराज सिंग, 25.3 ov.), 5/187 (सचिन तेंडुलकर , 37.0 ov.), 6/205 (एम.एस.धोणी, 41.4 ov.),7/236 (हरभजन सिंग 46.4 ov.), 8/256 (झहिर खान 49.2 ov.), 9/258 (आशिष नेहरा 49.5 ov.)

बॉलर्स OM R Wkts W No Econ उमर गुल60 450017.5अब्दुल रझाक20140007वहाब रईज80354434.38सईद अजमल80 331114.13शाहिद आफ्रिदी100450004.5मोहम्मद हाफिज100341103.4

दुसरी इनिंग

__________________________________________________________

पाकिस्तानचा स्कोअर - 231/10(49.5ov)

__________________________________________________________

बॅटसमनस्टेट्स रन्सबॉल फोरसिक्सकामरान अकमल C युवराज सिंग B झहिर खान19203मोहम्मद हाफिज C एम.एस.धोणी B मुनाफ पटेल43497असद शफीफ b युवराज सिंग 30392युनुस खानC सुरेश रैना b युवराज सिंग 1332 मिस्बाह-उल-हक C विराट कोहली B झहिर खान5676 5 1 उमर अकमल b हरभजन सिंग292412अब्दुल रझाक B मुनाफ पटेल 39शाहीद आफ्रिदी(C)C वीरेंद्र सेहवाग B युवराज सिंग 19141वहाब रईज c सचिन तेंडुलकर B आशिष नेहरा8 9 उमर गुल lbw B आशिष नेहरा 2 3 सइद अजमलनाबाद 15

विकेटस::1/44 (कामरान अकमल 9 ov.), 2/70 (मोहम्मद हाफिज 15.3 ov.), 3/103 (असद शफीफ 23.5 ov.), 4/106 (युनुस खान 25.4 ov.) 5/142 (उमर अकमल 33.1 ov.), 6/150 (अब्दुल रझाक 36.2 ov.) 7/184 (शाहीद आफ्रिदी 41.5 ov.), 8/199 (वहाब रईज 44.5 ov.), 9/208 (उमर गुल 46.1 ov.), 10/231 (मिस्बाह-उल-हक 49.5 ov.)

बॉलर्स OM R Wkts W No Econ झहिर खान9.50582206.11आशिष नेहरा100332003.3मुनाफ पटेल 101402104हरभजन सिंग100432004.3युवराज सिंग 10157200 5.7

__________________________________________________________

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close