S M L

पवार कुटुंबीयांचे बलवाशी व्यावसायिक संबंध ?

01 एप्रिलविरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी आज शुक्रवारी विधानसभेत आणखी एक गौप्यस्फोट केला. येरवड्यातील 15 हजार कोटींचा जमीन घोटाळा एकनाथ खडसेंनी उघडकीस आणला आहे. यानिमित्तानं म्हणजे पवार कुटुंबीयांचे शाहीद बलवाशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. येरवड्यातील 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टने लाटल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. 1989 मध्ये पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी मुकुंद भवन ट्रस्ट बरोबर न्यायालयात तडजोड केली. ही तडजोड बेकायदेशीर होती, असाही खडसेंचा आरोप आहे. मंत्रिमंडळाची मान्यता न घेता 2003 मध्ये त्याच जागेवरचे क्रीडांगण आणि रुग्णालयाचे आरक्षण बदलण्यात आले. त्यानंतरच पंचशील टेकपार्क आणि शाहीद बलवाच्या पंचतारांकित हॉटेलसाठी जागा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.येरवड्यातील याच जमिनीवरच्या 9 एकरच्या भूखंडावर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचं पंचशील टेकपार्क उभारलं जातंय. तसेच 8 एकरच्या भूखंडावर शाहीद बलवा यांची डीबी रिअ ॅलिटी कंपनी ग्रँड हयात नावाचं फाईव्ह स्टार हॉटेल उभारतेय. पंचशील टेकपार्क आणि ग्रँड हयात हॉटेलसाठी वेगवेगळ्या विभागाची परवानगी घेताना शाहीद बलवांच्या कंपनीने पत्रव्यहार केल्याचे स्पष्ट झालं आहे. पंचशील टेकपार्कच्या कंपनी डीड अर्थात करारनाम्यात बिल्डर अतुल चोरडिया यांच्या बरोबरीने सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे प्रत्येकी 909 शेअर्स असल्याचं स्पष्ट झालं. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. 3.26 ऐवजी 326 एकर !पुण्याचं नाव सध्या भूखंडाच्या घोटाळ्यांनी गाजतंय. आजवरचा पुण्यातील सर्वात मोठा घोटाळा येरवड्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. येरवड्यातील बहुतेक जमीन ही वतनाची आहे. त्यातली काही जमीन ही 1884 च्या आधीपासून संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. याच जमिनीतली 3.26 एकर जमीन सरकारने मुकुंद भवन ट्रस्टला रॉयल्टी म्हणून दिली. 1989 साली या ना त्या कारणाने या जमिनीचा वाद निर्माण झाला. आणि हे प्रकरण पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात गेलं. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी तडजोड पत्र करून 3.26 ऐवजी 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टच्या नावे केली. ही तडजोड बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला.2003 मध्ये विलासराव देशमुख सरकारने मंत्रिमंडळाची परवानगी न घेता 326 एकरातल्या काही भूखंडाचे आरक्षण बदललं. रूग्णालय आणि क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली जमीन रहिवासी विभागासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे 9 एकर जमिनीवर पंचशील टेकपार्कचे आयटी सेंटर आणि डीबी रिऍल्टीच्या ग्रँड हयात या फाईव्ह स्टार हॉटेलच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. या दोन्हीही प्रोजेक्टसाठी शाहीद बलवा यांच्या सहीनिशी डीबी रिऍल्टीनं पर्यावरण खातं आणि पर्यटन खात्याची परवानगी घेतली. विशेष म्हणजे पंचशील टेकपार्कमध्ये बिल्डर अतुल चोरडिया यांच्याबरोबर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांची भागीदारी असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.पण पवार कुटुंबीयांवर जाणूनबुजून आरोप केले जाताहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.संरक्षण खात्याची जमीन परस्पर पद्धतशीरपणे लाटली जाते. त्या व्यवहाराला कायद्याचे स्वरूप देणार्‍या जिल्हाधिकार्‍याला पुढं खासदार बनवलं जातं. आणि त्याच जमिनीतला काही वाटा हितसंबंधातल्या काही लोकांना इमले रचण्यासाठी दिला जातो, त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य अनेक अर्थांनी वाढलंय. काय आहे 'येरवडा' घोटाळा?- येरवड्यातील संरक्षण विभागाची जमीन लाटण्यात आली- 3.26 एकरऐवजी 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टच्या नावे - तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केली तडजोड - 8 एकर जमिनीवर शाहीद बलवाचं फाईव्ह स्टार हॉटेल- 9 एकर जमिनीवर पंचशील टेकपार्कचं आयटी सेंटर - पंचशील टेकपार्कमध्ये बिल्डर अतुल चोरडियाबरोबर सदानंद सुळे, सुप्रिया सुळेंची भागीदारी- मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या काळात आरक्षण उठवलं- बांधकामांसाठी पर्यावरण आणि इतर परवानग्या शाहीद बलवांनी घेतल्याश्रीनिवास पाटील कोण?- श्रीनिवास पाटील पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी - 1990 मध्ये मुकुंद भवन ट्रस्टसोबत कोर्टात तडजोड पत्र सादर केलं - तडजोड पत्रात 3.26 एकरचं 326 एकर केलं - नंतर ते राष्ट्रवादीचे खासदार झाले - शरद पवारांशी जवळचे संबंध

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 09:55 AM IST

पवार कुटुंबीयांचे बलवाशी व्यावसायिक संबंध ?

01 एप्रिल

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी आज शुक्रवारी विधानसभेत आणखी एक गौप्यस्फोट केला. येरवड्यातील 15 हजार कोटींचा जमीन घोटाळा एकनाथ खडसेंनी उघडकीस आणला आहे. यानिमित्तानं म्हणजे पवार कुटुंबीयांचे शाहीद बलवाशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. येरवड्यातील 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टने लाटल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

1989 मध्ये पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी मुकुंद भवन ट्रस्ट बरोबर न्यायालयात तडजोड केली. ही तडजोड बेकायदेशीर होती, असाही खडसेंचा आरोप आहे. मंत्रिमंडळाची मान्यता न घेता 2003 मध्ये त्याच जागेवरचे क्रीडांगण आणि रुग्णालयाचे आरक्षण बदलण्यात आले.

त्यानंतरच पंचशील टेकपार्क आणि शाहीद बलवाच्या पंचतारांकित हॉटेलसाठी जागा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.येरवड्यातील याच जमिनीवरच्या 9 एकरच्या भूखंडावर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचं पंचशील टेकपार्क उभारलं जातंय. तसेच 8 एकरच्या भूखंडावर शाहीद बलवा यांची डीबी रिअ ॅलिटी कंपनी ग्रँड हयात नावाचं फाईव्ह स्टार हॉटेल उभारतेय.

पंचशील टेकपार्क आणि ग्रँड हयात हॉटेलसाठी वेगवेगळ्या विभागाची परवानगी घेताना शाहीद बलवांच्या कंपनीने पत्रव्यहार केल्याचे स्पष्ट झालं आहे. पंचशील टेकपार्कच्या कंपनी डीड अर्थात करारनाम्यात बिल्डर अतुल चोरडिया यांच्या बरोबरीने सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे प्रत्येकी 909 शेअर्स असल्याचं स्पष्ट झालं. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे.

3.26 ऐवजी 326 एकर !

पुण्याचं नाव सध्या भूखंडाच्या घोटाळ्यांनी गाजतंय. आजवरचा पुण्यातील सर्वात मोठा घोटाळा येरवड्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. येरवड्यातील बहुतेक जमीन ही वतनाची आहे. त्यातली काही जमीन ही 1884 च्या आधीपासून संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. याच जमिनीतली 3.26 एकर जमीन सरकारने मुकुंद भवन ट्रस्टला रॉयल्टी म्हणून दिली.

1989 साली या ना त्या कारणाने या जमिनीचा वाद निर्माण झाला. आणि हे प्रकरण पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात गेलं. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी तडजोड पत्र करून 3.26 ऐवजी 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टच्या नावे केली. ही तडजोड बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला.

2003 मध्ये विलासराव देशमुख सरकारने मंत्रिमंडळाची परवानगी न घेता 326 एकरातल्या काही भूखंडाचे आरक्षण बदललं. रूग्णालय आणि क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली जमीन रहिवासी विभागासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे 9 एकर जमिनीवर पंचशील टेकपार्कचे आयटी सेंटर आणि डीबी रिऍल्टीच्या ग्रँड हयात या फाईव्ह स्टार हॉटेलच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

या दोन्हीही प्रोजेक्टसाठी शाहीद बलवा यांच्या सहीनिशी डीबी रिऍल्टीनं पर्यावरण खातं आणि पर्यटन खात्याची परवानगी घेतली. विशेष म्हणजे पंचशील टेकपार्कमध्ये बिल्डर अतुल चोरडिया यांच्याबरोबर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांची भागीदारी असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

पण पवार कुटुंबीयांवर जाणूनबुजून आरोप केले जाताहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संरक्षण खात्याची जमीन परस्पर पद्धतशीरपणे लाटली जाते. त्या व्यवहाराला कायद्याचे स्वरूप देणार्‍या जिल्हाधिकार्‍याला पुढं खासदार बनवलं जातं. आणि त्याच जमिनीतला काही वाटा हितसंबंधातल्या काही लोकांना इमले रचण्यासाठी दिला जातो, त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य अनेक अर्थांनी वाढलंय.

काय आहे 'येरवडा' घोटाळा?

- येरवड्यातील संरक्षण विभागाची जमीन लाटण्यात आली- 3.26 एकरऐवजी 326 एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टच्या नावे - तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केली तडजोड - 8 एकर जमिनीवर शाहीद बलवाचं फाईव्ह स्टार हॉटेल- 9 एकर जमिनीवर पंचशील टेकपार्कचं आयटी सेंटर - पंचशील टेकपार्कमध्ये बिल्डर अतुल चोरडियाबरोबर सदानंद सुळे, सुप्रिया सुळेंची भागीदारी- मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या काळात आरक्षण उठवलं- बांधकामांसाठी पर्यावरण आणि इतर परवानग्या शाहीद बलवांनी घेतल्याश्रीनिवास पाटील कोण?

- श्रीनिवास पाटील पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी - 1990 मध्ये मुकुंद भवन ट्रस्टसोबत कोर्टात तडजोड पत्र सादर केलं - तडजोड पत्रात 3.26 एकरचं 326 एकर केलं - नंतर ते राष्ट्रवादीचे खासदार झाले - शरद पवारांशी जवळचे संबंध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close