S M L

आमदारांसाठी लाईव्ह मॅच टिव्हीवरूनच !

01 एप्रिलवर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विशेष अतिथी येणार असल्याने आमदारांना वर्ल्डकप फायनलची तिकीट मिळणार नाहीत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलं. आमदारांना तिकीट मिळवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा राज्यमंत्र्यांना दिले होते. त्याबाबतची विचारणा आमदार सुभाष चव्हाण यांनी केली त्यावर जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलं. त्यामुळे आता आमदारांना प्रत्यक्ष मैदानावर न जाता टीव्हीवरूनच मॅचचं थेट प्रक्षेपण बघावे लागेल असा चिमटाही जयंत पाटील यांनी उपस्थित सदस्यांना काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 01:01 PM IST

आमदारांसाठी लाईव्ह मॅच टिव्हीवरूनच !

01 एप्रिल

वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विशेष अतिथी येणार असल्याने आमदारांना वर्ल्डकप फायनलची तिकीट मिळणार नाहीत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलं.

आमदारांना तिकीट मिळवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा राज्यमंत्र्यांना दिले होते. त्याबाबतची विचारणा आमदार सुभाष चव्हाण यांनी केली त्यावर जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलं. त्यामुळे आता आमदारांना प्रत्यक्ष मैदानावर न जाता टीव्हीवरूनच मॅचचं थेट प्रक्षेपण बघावे लागेल असा चिमटाही जयंत पाटील यांनी उपस्थित सदस्यांना काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close