S M L

धोणी लकी कर्णधार !

02 एप्रिल महेंद्रसिंग धोणीच्या टीमकडून आता अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. आणि धोणी टीमसाठी लकी कॅप्टनही ठरला आहे. गेल्या 78 वर्षात 32 खेळाडूंनी भारतीय टीमचं नेतृत्व केलं आहे. पण या सगळ्यात धोणी कप्तान म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप भरवला गेला. तेव्हा धोणीने भारतीय टीमचं पहिल्यांदा नेतृत्व केलं. आणि पहिल्याच प्रयत्नात भारताला त्याने वर्ल्ड कप जिंकून दिला. तेव्हापासून त्याला भारताचा लकी कॅप्टन म्हटलं जातं. त्यानंतर 2008 मध्ये भारतीय टीमने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात वन डे सीरिज जिंकली ती धोणीच्याच कप्तानीखाली. अनिल कुंबळे रिटायर झाल्यावर धोणीकडे टेस्ट कप्तानीही सोपवण्यात आली. आणि पहिल्याच सीरिजमध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये टेस्ट आणि वन डे सीरिज जिंकली. टेस्टमध्येही धोणीच्या कप्तानीखाली भारताने शेवटच्या 10 सीरिजपैकी एकही सीरिज गमावलेली नाही. तर मायदेशात 7 पैकी 5 सीरिज टीमने जिंकल्यात. धोणी कप्तान झाल्यावरच भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर वन क्रमांकावर पोहोचली. आणि आता धोणीची टीम सिद्ध झालीय वन डे वर्ल्ड कपवर माव कोरण्यासाठी.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 09:17 AM IST

धोणी लकी कर्णधार !

02 एप्रिल

महेंद्रसिंग धोणीच्या टीमकडून आता अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. आणि धोणी टीमसाठी लकी कॅप्टनही ठरला आहे. गेल्या 78 वर्षात 32 खेळाडूंनी भारतीय टीमचं नेतृत्व केलं आहे. पण या सगळ्यात धोणी कप्तान म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप भरवला गेला. तेव्हा धोणीने भारतीय टीमचं पहिल्यांदा नेतृत्व केलं. आणि पहिल्याच प्रयत्नात भारताला त्याने वर्ल्ड कप जिंकून दिला.

तेव्हापासून त्याला भारताचा लकी कॅप्टन म्हटलं जातं. त्यानंतर 2008 मध्ये भारतीय टीमने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात वन डे सीरिज जिंकली ती धोणीच्याच कप्तानीखाली. अनिल कुंबळे रिटायर झाल्यावर धोणीकडे टेस्ट कप्तानीही सोपवण्यात आली. आणि पहिल्याच सीरिजमध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये टेस्ट आणि वन डे सीरिज जिंकली.

टेस्टमध्येही धोणीच्या कप्तानीखाली भारताने शेवटच्या 10 सीरिजपैकी एकही सीरिज गमावलेली नाही. तर मायदेशात 7 पैकी 5 सीरिज टीमने जिंकल्यात. धोणी कप्तान झाल्यावरच भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर वन क्रमांकावर पोहोचली. आणि आता धोणीची टीम सिद्ध झालीय वन डे वर्ल्ड कपवर माव कोरण्यासाठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close