S M L

अण्णांचं पंतप्रधानांना पत्र

06 एप्रिललोकपाल विधेयकसाठी अण्णांचं आंदोलन म्हणजे सरकारच्या विरोधात कटकारस्थान आहे, असा आरोप होतोय. या आरोपामुळे दुःखी झालेल्या अण्णांनी आज बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली.अण्णांचं पंतप्रधानांना पत्र'जंतरमंतरवर मी आमरण उपोषणाला सुरुवात केली. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी उपोषण आणि प्रार्थना करण्याचं निमंत्रण मी तुम्हालाही दिलं होतं. पण मला तुमच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. उपोषण करण्यासाठी मला काही लोकांनी प्रवृत्त केलं असा आरोप माझ्यावर होतोय. हा माझ्या संवेदनशीलतेचा आणि बुद्धीचा अपमान आहे. लोकांच्या चिथावणीमुळे आमरण उपोषणाला बसण्याएवढा मी लहान नाही. मी माझे मित्र आणि टीकाकार यांच्याकडून सल्ला घेतो. पण निर्णय मात्र विवेकाला जागूनच घेतो. सर्वच सरकारनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यात निरुत्साह दाखवला. लोकपाल विधेयकाचा कमकुवत मसुदा गेल्या 42 वर्षांत 8 वेळा संसदेत मांडण्यात आला. हे कमकुवत विधेयकसुद्धा मंजूर होऊ शकलं नाही. सरकारने विधेयकाची प्रक्रिया सुरू केली. तरीही अण्णा संयम दाखवत नाहीत, असं बोललं जातंय. मनमोहनजी, तुम्ही मला सांगा कोणती प्रक्रिया सुरू झालीय ते? तुम्ही म्हणता मंत्रिगट विधेयकाचा मसुदा तयार करतंय. पण या मंत्रिगटातले अनेक चेहरे भ्रष्ट आहेत. त्यापैकी काहीजण गजाआड आहेत. अशा भ्रष्ट लोकांनी तयार केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विधेयकाच्या प्रक्रियेवर तुम्ही विश्वास ठेवता? राष्ट्रीय सल्लागार समितीने सुचवलेल्या शिफारसी तरी कुठं स्वीकारण्यात आल्या ? मी आणि माझ्या कित्येक सहकार्‍यांनी तुम्हाला 1 डिसेंबरनंतर अनेकवेळा पत्रं लिहिली. पण त्यांना कधीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा मी बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली, त्यावेळीच सरकारने प्रतिसाद दिला. मनमोहनसिंगजी, अजूनही तुम्हाला वाटतं की मी उतावीळ आहे, तसं असेल तर मला आनंदच होईल. कारण सरकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काहीच करत नसल्याने देशातील सर्व लोकच उतावीळ आहेत. आम्ही तयार केलेल्या विधेयकाचा मसुदा तुम्ही जसाच्या तसा स्वीकारावा, असा आमचा हट्ट नाही. पण सकारात्मक चर्चेसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म तर तयार करून द्या. अशी संयुक्त समिती ज्यात निम्मे सदस्य सामाजिक कार्यकर्ते आहेत, किमान तिची तरी स्थापना करा. सरकार इतर मुद्द्यांवर समित्या नेमायला तयार आहे, पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र नाही, असं का? चर्चा आणि वाटाघटींवर आमचा विश्वास आहे. आम्ही चर्चेला नकार देतोय, असं सांगून कृपया देशवासियांची दिशाभूल करू नका. कृपया आमच्या चळवळीत उणिवा आणि कटकारस्थान शोधण्याचा प्रयत्न करू नका. असं कोणतंच कटकारस्थान नाही. जरी असलं तरी त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्याची तुमची जबाबदारी कमी होत नाही.' - अण्णा हजारे

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 05:00 PM IST

अण्णांचं पंतप्रधानांना पत्र

06 एप्रिल

लोकपाल विधेयकसाठी अण्णांचं आंदोलन म्हणजे सरकारच्या विरोधात कटकारस्थान आहे, असा आरोप होतोय. या आरोपामुळे दुःखी झालेल्या अण्णांनी आज बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली.

अण्णांचं पंतप्रधानांना पत्र

'जंतरमंतरवर मी आमरण उपोषणाला सुरुवात केली. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी उपोषण आणि प्रार्थना करण्याचं निमंत्रण मी तुम्हालाही दिलं होतं. पण मला तुमच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. उपोषण करण्यासाठी मला काही लोकांनी प्रवृत्त केलं असा आरोप माझ्यावर होतोय.

हा माझ्या संवेदनशीलतेचा आणि बुद्धीचा अपमान आहे. लोकांच्या चिथावणीमुळे आमरण उपोषणाला बसण्याएवढा मी लहान नाही. मी माझे मित्र आणि टीकाकार यांच्याकडून सल्ला घेतो. पण निर्णय मात्र विवेकाला जागूनच घेतो.

सर्वच सरकारनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यात निरुत्साह दाखवला. लोकपाल विधेयकाचा कमकुवत मसुदा गेल्या 42 वर्षांत 8 वेळा संसदेत मांडण्यात आला. हे कमकुवत विधेयकसुद्धा मंजूर होऊ शकलं नाही. सरकारने विधेयकाची प्रक्रिया सुरू केली. तरीही अण्णा संयम दाखवत नाहीत, असं बोललं जातंय. मनमोहनजी, तुम्ही मला सांगा कोणती प्रक्रिया सुरू झालीय ते?

तुम्ही म्हणता मंत्रिगट विधेयकाचा मसुदा तयार करतंय. पण या मंत्रिगटातले अनेक चेहरे भ्रष्ट आहेत. त्यापैकी काहीजण गजाआड आहेत. अशा भ्रष्ट लोकांनी तयार केलेल्या भ्रष्टाचारविरोधी विधेयकाच्या प्रक्रियेवर तुम्ही विश्वास ठेवता? राष्ट्रीय सल्लागार समितीने सुचवलेल्या शिफारसी तरी कुठं स्वीकारण्यात आल्या ? मी आणि माझ्या कित्येक सहकार्‍यांनी तुम्हाला 1 डिसेंबरनंतर अनेकवेळा पत्रं लिहिली.

पण त्यांना कधीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा मी बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली, त्यावेळीच सरकारने प्रतिसाद दिला. मनमोहनसिंगजी, अजूनही तुम्हाला वाटतं की मी उतावीळ आहे, तसं असेल तर मला आनंदच होईल. कारण सरकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काहीच करत नसल्याने देशातील सर्व लोकच उतावीळ आहेत.

आम्ही तयार केलेल्या विधेयकाचा मसुदा तुम्ही जसाच्या तसा स्वीकारावा, असा आमचा हट्ट नाही. पण सकारात्मक चर्चेसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म तर तयार करून द्या. अशी संयुक्त समिती ज्यात निम्मे सदस्य सामाजिक कार्यकर्ते आहेत, किमान तिची तरी स्थापना करा. सरकार इतर मुद्द्यांवर समित्या नेमायला तयार आहे, पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र नाही, असं का? चर्चा आणि वाटाघटींवर आमचा विश्वास आहे.

आम्ही चर्चेला नकार देतोय, असं सांगून कृपया देशवासियांची दिशाभूल करू नका. कृपया आमच्या चळवळीत उणिवा आणि कटकारस्थान शोधण्याचा प्रयत्न करू नका. असं कोणतंच कटकारस्थान नाही. जरी असलं तरी त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्याची तुमची जबाबदारी कमी होत नाही.'

- अण्णा हजारे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close