S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांची चौकशी

07 एप्रिलउद्योगपतींची चौकशी केल्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीनं आता पंतप्रधान कार्यालयातल्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि कॅबिनेट सेक्रेटरी के. एम. चंद्रशेखर यांना समन्स बजावण्यात आलंय. 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकलेखा समितीने त्यांना दिले आहेत. कायदा सचिव डी. आर. मीना आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनासुद्धा 15 तारखेला हजर राहायला सांगण्यात आलंय. गुलाम वहानवटी यांचं नाव सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये साक्षीदार म्हणून नोंदवलं होतं.यापूर्वी उद्योगपती रतन टाटा, अनिल अंबानी आणि कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांची चौकशी या समितीनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 06:22 PM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांची चौकशी

07 एप्रिल

उद्योगपतींची चौकशी केल्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीनं आता पंतप्रधान कार्यालयातल्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि कॅबिनेट सेक्रेटरी के. एम. चंद्रशेखर यांना समन्स बजावण्यात आलंय. 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकलेखा समितीने त्यांना दिले आहेत. कायदा सचिव डी. आर. मीना आणि ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनासुद्धा 15 तारखेला हजर राहायला सांगण्यात आलंय. गुलाम वहानवटी यांचं नाव सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये साक्षीदार म्हणून नोंदवलं होतं.यापूर्वी उद्योगपती रतन टाटा, अनिल अंबानी आणि कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांची चौकशी या समितीनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close