S M L

'आदर्श'जमिनदोस्त करुन प्रतिमा सुधारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

आशिष जाधव, मुंबई. 10 एप्रिलदेशात लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळेच वादग्रस्त आदर्श सोसायटी जमिनदोस्त करुन आपली प्रतिमा सुधारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. आदर्श पाडण्याच्या पर्यावरण खात्याच्या नोटीशीला मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली नाही तर, आदर्श पाडण्यावाचून पर्याय नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी विधानसभेत स्पष्ट केलं. मुंबईतल्या अतिशय मोक्याच्या भुखंडावर केलेला आदर्श घोटाळा. या घोटाळ्याच्या निमित्ताने विरोधकांना तर राज्यासह संपूर्ण देशात काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्याची संधी मिळाली. त्यामुळेच या घोटाळ्याचे मूळ संपवण्याचा सरकारचा इरादा आहे. देशातला घोटाळ्यांचा माहौल संपवायचा असेल तर आधी भ्रष्टाचाराची वास्तू म्हणून बदनाम झालेल्या आदर्शची इमारत जमिनदोस्त करावी लागेल, असं काँग्रेसश्रेष्ठींना वाटतंय. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यास आदर्शची इमारत पाडू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने काँग्रेसचा डाव बरोबर ओळखला. आदर्श संदर्भात नेमलेल्या न्यायालयीन आयोगाला सरकारने तीन महिन्याची मुदतवाढ तर दिली. पण अण्णा हजारेंच्या तावडीतून तात्पुरती सुटका करून घेतल्यानंतर काँग्रेसचा आता पक्षाची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीचा वेग वाढण्याबरोबरच कारवाईला गती येईल अशी चर्चा आहे. दरम्यान आदर्श सोसायटीच्या संदर्भातील 2000 ते 2003 या तीन वर्षांच्या काळातील महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत दिली. पण या फाईलचं मुव्हमेंट रजिस्टर सापडलं असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 09:58 AM IST

'आदर्श'जमिनदोस्त करुन प्रतिमा सुधारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

आशिष जाधव, मुंबई.

10 एप्रिल

देशात लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळेच वादग्रस्त आदर्श सोसायटी जमिनदोस्त करुन आपली प्रतिमा सुधारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. आदर्श पाडण्याच्या पर्यावरण खात्याच्या नोटीशीला मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली नाही तर, आदर्श पाडण्यावाचून पर्याय नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी विधानसभेत स्पष्ट केलं.

मुंबईतल्या अतिशय मोक्याच्या भुखंडावर केलेला आदर्श घोटाळा. या घोटाळ्याच्या निमित्ताने विरोधकांना तर राज्यासह संपूर्ण देशात काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्याची संधी मिळाली. त्यामुळेच या घोटाळ्याचे मूळ संपवण्याचा सरकारचा इरादा आहे.

देशातला घोटाळ्यांचा माहौल संपवायचा असेल तर आधी भ्रष्टाचाराची वास्तू म्हणून बदनाम झालेल्या आदर्शची इमारत जमिनदोस्त करावी लागेल, असं काँग्रेसश्रेष्ठींना वाटतंय. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यास आदर्शची इमारत पाडू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केल्याची चर्चा आहे.

मात्र भाजपने काँग्रेसचा डाव बरोबर ओळखला. आदर्श संदर्भात नेमलेल्या न्यायालयीन आयोगाला सरकारने तीन महिन्याची मुदतवाढ तर दिली. पण अण्णा हजारेंच्या तावडीतून तात्पुरती सुटका करून घेतल्यानंतर काँग्रेसचा आता पक्षाची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीचा वेग वाढण्याबरोबरच कारवाईला गती येईल अशी चर्चा आहे.

दरम्यान आदर्श सोसायटीच्या संदर्भातील 2000 ते 2003 या तीन वर्षांच्या काळातील महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत दिली. पण या फाईलचं मुव्हमेंट रजिस्टर सापडलं असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close