S M L

अण्णांचं राळेगणसिध्दीत भव्य स्वागत

11 एप्रिललोकपाल विधेयकाची लढाई जिंकल्याशिवाय महाराष्ट्रात परतणार अशी प्रतिज्ञा करून अण्णा राळेगणिसद्धीमधून दिल्लीला गेले होते. आणि आता ही लढाई जिंकल्यानंतर आज ते महाराष्ट्रात परतले. अण्णांच्या राळेगणसिद्धी गावात आज संध्याकाळी अण्णांचं आगमन झालं आणि गावकर्‍यांनी एकच जल्लोष केला. राळेगणच्या गावकर्‍यांनी आज एकाच दिवशी गुढी पाडवा आणि दिवाळीचा आनंद अनुभवला. गावात मोठी आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी गावकर्‍यांनी जंगी तयारी केली होती. अण्णांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हत्ती, घोडे आणि उंटसुद्धा सहभागी होते. तसेच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी राळेगणसिद्धीत जमलेल्या सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आलं. ढोलपथक, झांजपथक आणि परिसरातले बँडपथक अण्णांच्या स्वागतासाठी आले होते.सत्कार समारंभानंतर अण्णा हजारेंनी भाषण केलं. अण्णा म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 63 वर्षात जे घडलं नाही ते भ्रष्टाचार समिती आणि राळेगणसिध्दी परिवाराने आज देशाला दिलं आहे. माहितीच्या अधिकार सारखा कायदा ही याच मातीतून देशाला दिला आहे. या कायद्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. पण या घोटाळ्यातील घोटाळेबाज गजाआड जाण्याची तरतूद या कायद्यात नाही. म्हणून जन लोकपाल बिल आणि राज्य आयुक्त बिल याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच मी जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा असं वाटलं नाही की हे आंदोलन इतक मोठ होईल. पण शेकडो कार्यकर्त्यांचं बळामुळे लोकामध्ये यांची जागृती झाली आणि आंदोलन मोठ झालं. यामुळे देशाला एक वेगळी दिशा देता आली. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर पहिल्यांदा एवढ मोठ आंदोलन झालं असं ही अण्णां म्हणाले. तर या आंदोलनात फक्त चारित्र्यशील आणि जिवनात त्याग करणारी माणसं या आंदोलनात असणार आहे तरच हे आंदोलन यशस्वी होऊ शकेल. तसेच गावातल्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच प्रत्येक आंदोलनात यश मिळाल्याचं ते म्हणाले. भाषण संपवल्यानंतर अण्णा भावनिक झाले. आणि त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. जाहीर सभेतच अण्णांचे डोळे पाणावले. अण्णा आपल्या गावात आल्यानंतर गावकर्‍यांशी संवाद साधताना भारावून गेले होते, गावातल्या लोकांच्या आठवणी त्यांनी कशा सतावत होत्या हे अण्णांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 01:47 PM IST

अण्णांचं राळेगणसिध्दीत भव्य स्वागत

11 एप्रिल

लोकपाल विधेयकाची लढाई जिंकल्याशिवाय महाराष्ट्रात परतणार अशी प्रतिज्ञा करून अण्णा राळेगणिसद्धीमधून दिल्लीला गेले होते. आणि आता ही लढाई जिंकल्यानंतर आज ते महाराष्ट्रात परतले. अण्णांच्या राळेगणसिद्धी गावात आज संध्याकाळी अण्णांचं आगमन झालं आणि गावकर्‍यांनी एकच जल्लोष केला. राळेगणच्या गावकर्‍यांनी आज एकाच दिवशी गुढी पाडवा आणि दिवाळीचा आनंद अनुभवला.

गावात मोठी आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी गावकर्‍यांनी जंगी तयारी केली होती. अण्णांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हत्ती, घोडे आणि उंटसुद्धा सहभागी होते. तसेच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी राळेगणसिद्धीत जमलेल्या सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आलं. ढोलपथक, झांजपथक आणि परिसरातले बँडपथक अण्णांच्या स्वागतासाठी आले होते.

सत्कार समारंभानंतर अण्णा हजारेंनी भाषण केलं. अण्णा म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 63 वर्षात जे घडलं नाही ते भ्रष्टाचार समिती आणि राळेगणसिध्दी परिवाराने आज देशाला दिलं आहे. माहितीच्या अधिकार सारखा कायदा ही याच मातीतून देशाला दिला आहे. या कायद्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. पण या घोटाळ्यातील घोटाळेबाज गजाआड जाण्याची तरतूद या कायद्यात नाही. म्हणून जन लोकपाल बिल आणि राज्य आयुक्त बिल याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

तसेच मी जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा असं वाटलं नाही की हे आंदोलन इतक मोठ होईल. पण शेकडो कार्यकर्त्यांचं बळामुळे लोकामध्ये यांची जागृती झाली आणि आंदोलन मोठ झालं. यामुळे देशाला एक वेगळी दिशा देता आली. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर पहिल्यांदा एवढ मोठ आंदोलन झालं असं ही अण्णां म्हणाले. तर या आंदोलनात फक्त चारित्र्यशील आणि जिवनात त्याग करणारी माणसं या आंदोलनात असणार आहे तरच हे आंदोलन यशस्वी होऊ शकेल.

तसेच गावातल्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच प्रत्येक आंदोलनात यश मिळाल्याचं ते म्हणाले. भाषण संपवल्यानंतर अण्णा भावनिक झाले. आणि त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. जाहीर सभेतच अण्णांचे डोळे पाणावले. अण्णा आपल्या गावात आल्यानंतर गावकर्‍यांशी संवाद साधताना भारावून गेले होते, गावातल्या लोकांच्या आठवणी त्यांनी कशा सतावत होत्या हे अण्णांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close