S M L

चक्क तळलेलं आईस्क्रीम...

12 एप्रिलतुम्ही आईस्क्रीमचे वेग-वेगळे फ्लेवर खाल्ले असतील परंतु तळलेलं आईस्क्रीम खाल्लं किंवा ऐकलंही नसेल मात्र असं आईस्क्रीम सध्या मिळतंय. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु झालेल्या पवनाथडी यात्रेत हे आईसक्रीम मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या यात्रेच आयोजन केलं आहे. राज्यातील तब्बल 350 महिला बचतगटांनी या यात्रेत सहभाग नोंदवला आहे. या बचतगटाना इथं विनामूल्य स्टॉल्स दिले जातात. त्यामुळे आपआपल्या प्रदेशाची ओळख असणारे अनेक खाद्य पदार्थ घेवून या महिलांनी स्टॉल्स सजवले आहेत. चटकदार मटणाचे सगळे प्रकार, भाजलेल्या वांग्याच भरीत आणि हातवरची भाकरी, मसालेदार मासे, शिरखुरमा असे अनेक खमंग पदार्थ या यात्रेत तर आहेत. मात्र इथं येणार्‍या प्रत्येकांचं लक्ष वेधून घेणारा एक नवीनच पदार्थ इथं मिळतोय आणि ते म्हणजे तळलेलं आईस्क्रीम हे तळलेलं आईस्क्रीम खाण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या शिवाय या यात्रेत लोककलाही सादर केल्या जात आहेत. सांगवी परिसरातील पीडब्लूडी मैदानावर 11 एप्रिलपासून सुरु झालेली ही यात्रा 17 एप्रिलपर्यत सर्वासाठी खुली राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 03:22 PM IST

चक्क तळलेलं आईस्क्रीम...

12 एप्रिल

तुम्ही आईस्क्रीमचे वेग-वेगळे फ्लेवर खाल्ले असतील परंतु तळलेलं आईस्क्रीम खाल्लं किंवा ऐकलंही नसेल मात्र असं आईस्क्रीम सध्या मिळतंय. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु झालेल्या पवनाथडी यात्रेत हे आईसक्रीम मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या यात्रेच आयोजन केलं आहे. राज्यातील तब्बल 350 महिला बचतगटांनी या यात्रेत सहभाग नोंदवला आहे.

या बचतगटाना इथं विनामूल्य स्टॉल्स दिले जातात. त्यामुळे आपआपल्या प्रदेशाची ओळख असणारे अनेक खाद्य पदार्थ घेवून या महिलांनी स्टॉल्स सजवले आहेत. चटकदार मटणाचे सगळे प्रकार, भाजलेल्या वांग्याच भरीत आणि हातवरची भाकरी, मसालेदार मासे, शिरखुरमा असे अनेक खमंग पदार्थ या यात्रेत तर आहेत.

मात्र इथं येणार्‍या प्रत्येकांचं लक्ष वेधून घेणारा एक नवीनच पदार्थ इथं मिळतोय आणि ते म्हणजे तळलेलं आईस्क्रीम हे तळलेलं आईस्क्रीम खाण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या शिवाय या यात्रेत लोककलाही सादर केल्या जात आहेत. सांगवी परिसरातील पीडब्लूडी मैदानावर 11 एप्रिलपासून सुरु झालेली ही यात्रा 17 एप्रिलपर्यत सर्वासाठी खुली राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close