S M L

खडसेंनी माफी मागावी ; आरोप चुकीचे !

13 एप्रिलयेरवडा जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलेले आरोप अतिशय चुकीचे आहेत. असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केला. एकनाथ खडसेंनी माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर लढाई लढू असा इशारा पाटील यांनी दिला आहे. आज बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंनी केलेल्या आरोपांचे खंडन केलं. दरम्यान, श्रीनिवास पाटलांचे हे आव्हान आपण स्वीकारतो अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. दरम्यान खडसेंनी दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव आणू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला. कृष्णा खोर्‍याची जमिनी भाडेपट्‌ट्याने दिली - निंबाळकरकृष्णा खोरे महामंडळाची साडेबाराशे एकर जमीन कवडीमोल भावानं खाजगी संस्थांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अलिकडेच विधानसभेत केला होता. त्यावर या जमिनी भाडेपट्‌ट्याने देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी देण्यात आलेल्या नाहीत असा खुलासा जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी केला. तसेच खडसे यांचा आरोप अपूर्ण माहितीच्या आधारावर आहे असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2011 04:27 PM IST

खडसेंनी माफी मागावी ; आरोप चुकीचे !

13 एप्रिल

येरवडा जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलेले आरोप अतिशय चुकीचे आहेत. असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केला. एकनाथ खडसेंनी माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांच्याविरूद्ध कायदेशीर लढाई लढू असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

आज बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंनी केलेल्या आरोपांचे खंडन केलं. दरम्यान, श्रीनिवास पाटलांचे हे आव्हान आपण स्वीकारतो अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. दरम्यान खडसेंनी दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव आणू असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला.

कृष्णा खोर्‍याची जमिनी भाडेपट्‌ट्याने दिली - निंबाळकर

कृष्णा खोरे महामंडळाची साडेबाराशे एकर जमीन कवडीमोल भावानं खाजगी संस्थांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अलिकडेच विधानसभेत केला होता. त्यावर या जमिनी भाडेपट्‌ट्याने देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी देण्यात आलेल्या नाहीत असा खुलासा जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी केला. तसेच खडसे यांचा आरोप अपूर्ण माहितीच्या आधारावर आहे असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2011 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close