S M L

बिनायक सेन यांना जामीन

15 एप्रिलमानवाधिकार कार्यकर्ते बिनायक सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. चार महिन्यांपूर्वी छत्तीसगड सरकारने त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं. पण त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलामानवाधिकार कार्यकर्ते बिनायक सेन यांची अखेर चार महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली. छत्तीसगड सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिथल्या सेशन कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बिनायक सेन यांना जेलमध्ये जावं लागलं. पण बिनायक सेन यांनी हा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत नेला आणि तिथं मात्र त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा कुठलाही सबळ पुरावा नाही, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोह सिद्ध होऊ शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. सेन बाजूनं लढणार्‍या राम जेठमलानी यांनी कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.गेल्या चार महिन्यांमध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा असं सांगत बिनायक सेन यांच्या पत्नीने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. तर सेन यांच्या आईनं बिनायक जेलबाहेर आले, यासारखा दुसरा आनंद नसल्याचं सांगितलं. सेन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने छत्तीसगड सरकारवरही ताशेरे ओढले. बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती असली तरी, त्याला आपण देशद्रोह म्हणू शकत नाही, असंही कोर्टानं सुनावलं. कोर्टाच्या या निर्णयाचे वेगवेगळ्या स्तरातूनही स्वागत झालं.या निर्णयानंतरही काही दिवसात त्यांची छत्तीसगडमधील रायपूर तुरूंगातून सुटका होईल. पण त्यांना त्यांचं निर्दोषत्त्व छत्तीसगड हायकोर्टातही सिद्ध करायचं आहे. त्यांच्या समर्थकांमध्येही सध्या जल्लोषाचं वातावरण आहे.सुप्रीम कोर्टाचं मत" बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती असली तरी, ते देशद्रोहाखाली गुन्हेगार ठरू शकत नाहीत. " - न्या. एच.एस. बेदीतर " एखाद्याच्या घरी जर गांधीजींचं आत्मचरित्र सापडलं, तर त्याला गांधीवादी म्हणता येत नाही. " न्या. सी.के.प्रसाददरम्यान देशद्रोहाच्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे, त्याचा फेरआढावा घेण्यासंबंधी आता विचार करावा लागणार आहे असं मत केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केलंय. कायदा आयोगाला याबाबत पत्र लिहून आढावा घेण्यासंदर्भात सांगणार असल्याचे त्यांनी म्हटल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 09:15 AM IST

बिनायक सेन यांना जामीन

15 एप्रिल

मानवाधिकार कार्यकर्ते बिनायक सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. चार महिन्यांपूर्वी छत्तीसगड सरकारने त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं. पण त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला

मानवाधिकार कार्यकर्ते बिनायक सेन यांची अखेर चार महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली. छत्तीसगड सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिथल्या सेशन कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बिनायक सेन यांना जेलमध्ये जावं लागलं.

पण बिनायक सेन यांनी हा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत नेला आणि तिथं मात्र त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा कुठलाही सबळ पुरावा नाही, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोह सिद्ध होऊ शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. सेन बाजूनं लढणार्‍या राम जेठमलानी यांनी कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.

गेल्या चार महिन्यांमध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा असं सांगत बिनायक सेन यांच्या पत्नीने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. तर सेन यांच्या आईनं बिनायक जेलबाहेर आले, यासारखा दुसरा आनंद नसल्याचं सांगितलं. सेन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने छत्तीसगड सरकारवरही ताशेरे ओढले. बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती असली तरी, त्याला आपण देशद्रोह म्हणू शकत नाही, असंही कोर्टानं सुनावलं. कोर्टाच्या या निर्णयाचे वेगवेगळ्या स्तरातूनही स्वागत झालं.

या निर्णयानंतरही काही दिवसात त्यांची छत्तीसगडमधील रायपूर तुरूंगातून सुटका होईल. पण त्यांना त्यांचं निर्दोषत्त्व छत्तीसगड हायकोर्टातही सिद्ध करायचं आहे. त्यांच्या समर्थकांमध्येही सध्या जल्लोषाचं वातावरण आहे.

सुप्रीम कोर्टाचं मत

" बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती असली तरी, ते देशद्रोहाखाली गुन्हेगार ठरू शकत नाहीत. " - न्या. एच.एस. बेदीतर " एखाद्याच्या घरी जर गांधीजींचं आत्मचरित्र सापडलं, तर त्याला गांधीवादी म्हणता येत नाही. " न्या. सी.के.प्रसाददरम्यान देशद्रोहाच्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे, त्याचा फेरआढावा घेण्यासंबंधी आता विचार करावा लागणार आहे असं मत केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केलंय. कायदा आयोगाला याबाबत पत्र लिहून आढावा घेण्यासंदर्भात सांगणार असल्याचे त्यांनी म्हटल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close