S M L

जन आंदोलकांचं काँग्रेसला प्रत्युत्तर ; संपत्ती केली जाहीर

15 एप्रिललोकपाल बिलाचा नवा मसुदा तयार करण्यासाठी उद्या शनिवारी संयुक्त समितीची पहिली बैठक होतेय. त्यापूर्वी आज भ्रष्टाचार विरोधी आंदोलकांची बैठक अण्णांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्र सरकारशी कशा पद्धतीने चर्चा करायची, याची रणनिती या बैठकीत ठरवण्यात आली. ही बैठक झाल्यानंतर संयुक्त समितीत असलेल्या आंदोलकांनी आपली संपत्ती जाहीर केली. सरकार आणि काँग्रेस पक्ष आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. शांतिभूषण, अमर सिंग आणि मुलायम सिंग यांच्यात झालेल्या एका संभाषणाची सीडी सध्या उपलब्ध आहे. या सीडीमध्ये बदल करण्यात आलेत असा दावा प्रशांत भूषण यांनी केला असून त्याविरुद्ध शांतिभूषण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आंदोलकांची स्थावर मालमत्ताशांती भूषण- नॉयडा, दिल्ली, बंगलोर, अलाहाबाद आणि रुरकी या ठिकाणी एकूण 8 घरं- गेल्या 10 वर्षांतली एकूण कमाई (इनकम टॅक्स रिटर्ननुसार) - 136 कोटी 71 लाख रुपयेप्रशांत भूषण- हिमाचल प्रदेशात 4800 चौ मीटर जमीन- नवी दिल्लीत जंगपुरा इथं बंगला- दिल्लीतल्या सुप्रीम कोर्ट सोसायटीत फ्लॅट- बाँड्स आणि शेअर्स - रु 1.45 कोटी- बँक ठेवी - रु 7.5 लाख- घरगुती व इतर वस्तू - रु 60 लाखसंतोष हेगडे- बंगलोरमध्ये रु 1 कोटी 50 लाख रुपये किमतीचं घर- बँक ठेवी - सुमारे 32 लाख रुपयेअरविंद केजरीवाल- जमीन - गाझियाबादमध्ये 220 चौ मीटरचा भूखंड (किंमत रु 55 लाख) - घरगुती वस्तूंची एकूण किंमत - रु 1 लाख- बँक ठेवी - रु 28, 640- रोख रक्कम रु 5, 300

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2011 03:13 PM IST

जन आंदोलकांचं काँग्रेसला प्रत्युत्तर ; संपत्ती केली जाहीर

15 एप्रिल

लोकपाल बिलाचा नवा मसुदा तयार करण्यासाठी उद्या शनिवारी संयुक्त समितीची पहिली बैठक होतेय. त्यापूर्वी आज भ्रष्टाचार विरोधी आंदोलकांची बैठक अण्णांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्र सरकारशी कशा पद्धतीने चर्चा करायची, याची रणनिती या बैठकीत ठरवण्यात आली. ही बैठक झाल्यानंतर संयुक्त समितीत असलेल्या आंदोलकांनी आपली संपत्ती जाहीर केली.

सरकार आणि काँग्रेस पक्ष आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. शांतिभूषण, अमर सिंग आणि मुलायम सिंग यांच्यात झालेल्या एका संभाषणाची सीडी सध्या उपलब्ध आहे. या सीडीमध्ये बदल करण्यात आलेत असा दावा प्रशांत भूषण यांनी केला असून त्याविरुद्ध शांतिभूषण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आंदोलकांची स्थावर मालमत्ता

शांती भूषण- नॉयडा, दिल्ली, बंगलोर, अलाहाबाद आणि रुरकी या ठिकाणी एकूण 8 घरं- गेल्या 10 वर्षांतली एकूण कमाई (इनकम टॅक्स रिटर्ननुसार) - 136 कोटी 71 लाख रुपयेप्रशांत भूषण- हिमाचल प्रदेशात 4800 चौ मीटर जमीन- नवी दिल्लीत जंगपुरा इथं बंगला- दिल्लीतल्या सुप्रीम कोर्ट सोसायटीत फ्लॅट- बाँड्स आणि शेअर्स - रु 1.45 कोटी- बँक ठेवी - रु 7.5 लाख- घरगुती व इतर वस्तू - रु 60 लाख

संतोष हेगडे- बंगलोरमध्ये रु 1 कोटी 50 लाख रुपये किमतीचं घर- बँक ठेवी - सुमारे 32 लाख रुपयेअरविंद केजरीवाल- जमीन - गाझियाबादमध्ये 220 चौ मीटरचा भूखंड (किंमत रु 55 लाख) - घरगुती वस्तूंची एकूण किंमत - रु 1 लाख- बँक ठेवी - रु 28, 640- रोख रक्कम रु 5, 300

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close