S M L

जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरवात

17 एप्रिलदख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरवात झाली आहे. जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यासाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ज्योतिबाच्या मानाच्या 101 सासनकाठ्या आहेत. आज रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्रातील हजारो भावीक कालच मोठ्या संख्येनं डोंगरावर दाखल झाले आहेत. या यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल पहाटे 3 वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. चार वाजता पाद्यपूजा, काकड आरती आणि त्यानंतर शासकीय महाभिषेक झाला. आता जोतिबाची राजेशाही थाटातील पगडी पूजाही बांधण्यात येणार आहे. आणि यात्रेचं मुख्य आकर्षण असणार्‍या सासनकाठ्यांची मिरवणूकही काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 09:27 AM IST

जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरवात

17 एप्रिल

दख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरवात झाली आहे. जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यासाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ज्योतिबाच्या मानाच्या 101 सासनकाठ्या आहेत. आज रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्रातील हजारो भावीक कालच मोठ्या संख्येनं डोंगरावर दाखल झाले आहेत.

या यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल पहाटे 3 वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. चार वाजता पाद्यपूजा, काकड आरती आणि त्यानंतर शासकीय महाभिषेक झाला. आता जोतिबाची राजेशाही थाटातील पगडी पूजाही बांधण्यात येणार आहे. आणि यात्रेचं मुख्य आकर्षण असणार्‍या सासनकाठ्यांची मिरवणूकही काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close