S M L

अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांना प्रतिवादी करा !

21 एप्रिल पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या घोटवडे इथल्या फार्महाऊस प्रकरणी पुणे दिवाणी न्यायालयाने अजित पवार यांना झटका दिला आहे. याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रतिवादी करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. चंद्रकांत गुंडगळ यांनी या प्रकरणी रघुनाथ तापकिर यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. ही जमीन तापकिर यांनी गुंडगळ यांना फसवून ती सुनेत्रा पवार यांच्या मालकीच्या फायर पॉवर ऍग्रो या कंपनीला विकल्याचा गुंडगळ यांनी अजित पवार यांच्यविरोधात दिवाणी फौजदारी दावा केला आहे. याप्रकरणी सुनावणी करताना सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले आहे. गुंडगळ विरुध्द तापकिर यांच्या दाव्यात सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचाही समावेश करावा असे आदेशही न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहे. अजित पवार जलसंपदा मंत्री असताना मुळा नदीचं पात्र अडवून आपल्या फार्महाऊसचं बांधकाम चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या घोटवडे इथल्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणी आयबीएनने या बातमीचा पाठपुरावा केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आमची टीम तिथं पोहोचताच काही वेळातच हे बांधकाम काळ्या कापडाने झाकण्याचा प्रकार अजितदादांच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. जमीनीचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही तिथल्या जागेवर एका फार्म हाऊसचं बांधकाम सुरु होतं. तर मुळा नदीतून बेसुमार वाळू-उपसा करून हे बांधकाम चालू होतं. आणि मुळा नदीवर बांध घालून शेतकर्‍यांचं हक्काचं पाणी तोडण्याचाही निर्दयी प्रकार ही घडला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 11:53 AM IST

अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांना प्रतिवादी करा !

21 एप्रिल

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या घोटवडे इथल्या फार्महाऊस प्रकरणी पुणे दिवाणी न्यायालयाने अजित पवार यांना झटका दिला आहे. याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रतिवादी करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

चंद्रकांत गुंडगळ यांनी या प्रकरणी रघुनाथ तापकिर यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. ही जमीन तापकिर यांनी गुंडगळ यांना फसवून ती सुनेत्रा पवार यांच्या मालकीच्या फायर पॉवर ऍग्रो या कंपनीला विकल्याचा गुंडगळ यांनी अजित पवार यांच्यविरोधात दिवाणी फौजदारी दावा केला आहे.

याप्रकरणी सुनावणी करताना सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले आहे. गुंडगळ विरुध्द तापकिर यांच्या दाव्यात सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचाही समावेश करावा असे आदेशही न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहे.

अजित पवार जलसंपदा मंत्री असताना मुळा नदीचं पात्र अडवून आपल्या फार्महाऊसचं बांधकाम चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या घोटवडे इथल्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणी आयबीएनने या बातमीचा पाठपुरावा केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

आमची टीम तिथं पोहोचताच काही वेळातच हे बांधकाम काळ्या कापडाने झाकण्याचा प्रकार अजितदादांच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. जमीनीचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही तिथल्या जागेवर एका फार्म हाऊसचं बांधकाम सुरु होतं. तर मुळा नदीतून बेसुमार वाळू-उपसा करून हे बांधकाम चालू होतं. आणि मुळा नदीवर बांध घालून शेतकर्‍यांचं हक्काचं पाणी तोडण्याचाही निर्दयी प्रकार ही घडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close