S M L

भोंदू बाबाच्या नादाला लागून तरुणावर आली जीव गमावण्याची वेळ

21 एप्रिलभोंदू बाबाच्या नादाला लागून किडनी गमावण्याची वेळ गोंदियाच्या तरुणावर आली आहे. राधेशाम हा तरुण सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अंगात भूत येत म्हणून राधेशामला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हातल्या लामटामधील भोंदू चौर्‍यासी बाबाकडे नेलं होत. भूत उतरवतो म्हणत या बाबाने राधेश्यामला झाडाला उलटा टांगला. चाबूक आणि लाथाभुक्यांनी मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर राधेश्यामच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. त्याला रुग्णालयात दाखल केल असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. चौर्‍यासी बाबाचा आश्रम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हात आहे. मात्र गोंदियाला हा जिल्हा लागून असल्यामुळे जिल्हातील अनेक कुंटुब बाबाच्या नादाला लागून उध्वस्त झाली आहे. बाबावर मध्यप्रदेशातील पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, खूनाचा प्रयत्न, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मांत्रिक असण्याचे प्रमाणपत्र देतोय मात्र तरीही त्याच्यावर पोलीस कारवाई होत नाही. या व्यतीरिक्त भूत प्रेत पळवणे, मुल बाळ या सर्वावर या बाबाकडे इलाज आहेच.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 12:04 PM IST

भोंदू बाबाच्या नादाला लागून तरुणावर आली जीव गमावण्याची वेळ

21 एप्रिल

भोंदू बाबाच्या नादाला लागून किडनी गमावण्याची वेळ गोंदियाच्या तरुणावर आली आहे. राधेशाम हा तरुण सध्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अंगात भूत येत म्हणून राधेशामला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हातल्या लामटामधील भोंदू चौर्‍यासी बाबाकडे नेलं होत. भूत उतरवतो म्हणत या बाबाने राधेश्यामला झाडाला उलटा टांगला.

चाबूक आणि लाथाभुक्यांनी मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर राधेश्यामच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. त्याला रुग्णालयात दाखल केल असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. चौर्‍यासी बाबाचा आश्रम मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हात आहे. मात्र गोंदियाला हा जिल्हा लागून असल्यामुळे जिल्हातील अनेक कुंटुब बाबाच्या नादाला लागून उध्वस्त झाली आहे.

बाबावर मध्यप्रदेशातील पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, खूनाचा प्रयत्न, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मांत्रिक असण्याचे प्रमाणपत्र देतोय मात्र तरीही त्याच्यावर पोलीस कारवाई होत नाही. या व्यतीरिक्त भूत प्रेत पळवणे, मुल बाळ या सर्वावर या बाबाकडे इलाज आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close