S M L

बदनामीच्या राजकारणामुळे न्या. संतोष हेगडे नाराज

21 एप्रिलअण्णा हजारे यांचं जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन यशस्वी झालं. मात्र या आंदोलनानंतर विरोधाकांनी जनलोकपाल समितीमधील सदस्यांवर टिकाची झोड उठवली. शांती भूषण यांच्यानंतर आता मसुदा समितीवर नियुक्त झालेले माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे नाराज आहेत. अण्णा आणि त्यांच्या सोबतींविरोधात सुरू असलेल्या बदनामीच्या मोहिमेला वैतागून ते समितीवरून राजीनामा देण्याचा विचार करत आहे. त्यांनी अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. येत्या शनिवारी दिल्लीत इतर सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असं हेगडे यांनी सांगितलं. हेगडेंची खंत- आमच्याविरुद्ध सुरू असलेली बदनामीची मोहीम दुःखदायक- दिग्विजय सिंग यांनी केलेल्या विधानामुळे राजीनाम्याचा विचार- सोनिया गांधी पत्रात एक लिहितात, दिग्विजय भलतंच बोलतात- मी राजकारणी नाही, एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकत नाही- दिग्विजय यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही, ते जाणून बुजून खोटं बोलत आहेन्या. संतोष हेगडे हे दिग्विजय सिंगांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज झालेत. त्यानंतर दिग्विजय सिंग काय म्हणतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना न्या. संतोष हेगडे पाठीशी घालताहेत असं मी अजिबात म्हणालो नाही. मी कोणालाही आव्हान दिलेलं नाही. संतोष हेगडे यांनी या आरोप प्रत्योरापामध्ये खिलाडूवृत्ती दाखवायला हवी. त्यांनीही अशा आरोपांचा सामना करावा आम्ही राजकारणी रोजच त्याला सामोरं जातो. केवळ उपस्थिती लावून कर्नाटकचे लोकायुक्त भ्रष्टाचाराला आळा घालू शकणार नाहीत असं मी म्हणालो असं दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे.हेगडेंप्रमाणेच दिग्विजय सिंग आणि इतर नेत्यांनी शांती भूषण यांच्यावरही अनेक आरोप केले होते. भूषण यांचं कथित संभाषण असलेली एक सीडी वाटण्यात आली होती. ही सीडी खरी असून भूषण यांनी न्यायमूतीर्ंना लाच देण्याचा प्रयत्न केला असा ठपका एका सरकार मान्य प्रयोगशाळेने ठेवला अशी माहिती आज पोलीस सूत्रांनी दिली. पण दुसर्‍या प्रयोगशाळेचा हवाला देत ही सीडी बनावट असल्याचा दावा अण्णांच्या सहकार्‍यांनी केला आहे. ते भूषण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. शांती भूषण अण्णा हजारेंच्या टीममधील मसुदा समितीतील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. देशातले सुप्रसिद्ध कायदेपंडित आणि माजी कायदा मंत्री असलेल्या शांती भूषण यांनी भ्रष्टाचार केल्याचा दावा एका सीडीमधून करण्यात येतोय. शांतीभूषण, मुलायम सिंग आणि अमर सिंग हे तिघं एका न्यायमूतीर्ंना लाच देण्याची चर्चा करतायात, असं यातल्या कथित संभाषणावरून पुढे येतंय. ही सीडी बनावट नसल्याचा दावा सीएफसीएल या सरकारमान्य प्रयोगशाळेने केल्याचे दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे शांतीभूषण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमर सिंग आणि काँग्रेसने केली आहे. पण ट्रूथ लॅब्स या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार ही सीडी बनावट आहे. अण्णा हजारे आणि त्यांच्या वतीने मसुदा समितीत सहभागी असलेले सर्व सदस्य या अहवालाच्या आधारावर भूषण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देतंय. पण आमच्यापैकी कुणीही राजीनामा देणार नाही, असं स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिलं. शांतिभूषण निर्दोष आहेत, अशी भूमिका अण्णांनी यापूर्वी घेतली होती. पण आपण त्यांची गॅरेंटी घेत नाही अशी पुस्तीही जोडली होती. आता अण्णा काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, जनलोकपाल विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडू असा पुनरुच्चार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केला आहे. भ्रष्टाचाराशी लढायला सध्याचे कायदे पुरेसे नाहीत असं मनमोहनसिंग म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 04:10 PM IST

बदनामीच्या राजकारणामुळे न्या. संतोष हेगडे नाराज

21 एप्रिल

अण्णा हजारे यांचं जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन यशस्वी झालं. मात्र या आंदोलनानंतर विरोधाकांनी जनलोकपाल समितीमधील सदस्यांवर टिकाची झोड उठवली. शांती भूषण यांच्यानंतर आता मसुदा समितीवर नियुक्त झालेले माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे नाराज आहेत.

अण्णा आणि त्यांच्या सोबतींविरोधात सुरू असलेल्या बदनामीच्या मोहिमेला वैतागून ते समितीवरून राजीनामा देण्याचा विचार करत आहे. त्यांनी अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. येत्या शनिवारी दिल्लीत इतर सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असं हेगडे यांनी सांगितलं.

हेगडेंची खंत

- आमच्याविरुद्ध सुरू असलेली बदनामीची मोहीम दुःखदायक- दिग्विजय सिंग यांनी केलेल्या विधानामुळे राजीनाम्याचा विचार- सोनिया गांधी पत्रात एक लिहितात, दिग्विजय भलतंच बोलतात- मी राजकारणी नाही, एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकत नाही- दिग्विजय यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही, ते जाणून बुजून खोटं बोलत आहे

न्या. संतोष हेगडे हे दिग्विजय सिंगांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज झालेत. त्यानंतर दिग्विजय सिंग काय म्हणतात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना न्या. संतोष हेगडे पाठीशी घालताहेत असं मी अजिबात म्हणालो नाही. मी कोणालाही आव्हान दिलेलं नाही. संतोष हेगडे यांनी या आरोप प्रत्योरापामध्ये खिलाडूवृत्ती दाखवायला हवी. त्यांनीही अशा आरोपांचा सामना करावा आम्ही राजकारणी रोजच त्याला सामोरं जातो. केवळ उपस्थिती लावून कर्नाटकचे लोकायुक्त भ्रष्टाचाराला आळा घालू शकणार नाहीत असं मी म्हणालो असं दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे.

हेगडेंप्रमाणेच दिग्विजय सिंग आणि इतर नेत्यांनी शांती भूषण यांच्यावरही अनेक आरोप केले होते. भूषण यांचं कथित संभाषण असलेली एक सीडी वाटण्यात आली होती. ही सीडी खरी असून भूषण यांनी न्यायमूतीर्ंना लाच देण्याचा प्रयत्न केला असा ठपका एका सरकार मान्य प्रयोगशाळेने ठेवला अशी माहिती आज पोलीस सूत्रांनी दिली. पण दुसर्‍या प्रयोगशाळेचा हवाला देत ही सीडी बनावट असल्याचा दावा अण्णांच्या सहकार्‍यांनी केला आहे. ते भूषण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

शांती भूषण अण्णा हजारेंच्या टीममधील मसुदा समितीतील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. देशातले सुप्रसिद्ध कायदेपंडित आणि माजी कायदा मंत्री असलेल्या शांती भूषण यांनी भ्रष्टाचार केल्याचा दावा एका सीडीमधून करण्यात येतोय. शांतीभूषण, मुलायम सिंग आणि अमर सिंग हे तिघं एका न्यायमूतीर्ंना लाच देण्याची चर्चा करतायात, असं यातल्या कथित संभाषणावरून पुढे येतंय. ही सीडी बनावट नसल्याचा दावा सीएफसीएल या सरकारमान्य प्रयोगशाळेने केल्याचे दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे शांतीभूषण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमर सिंग आणि काँग्रेसने केली आहे.

पण ट्रूथ लॅब्स या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार ही सीडी बनावट आहे. अण्णा हजारे आणि त्यांच्या वतीने मसुदा समितीत सहभागी असलेले सर्व सदस्य या अहवालाच्या आधारावर भूषण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देतंय. पण आमच्यापैकी कुणीही राजीनामा देणार नाही, असं स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिलं.

शांतिभूषण निर्दोष आहेत, अशी भूमिका अण्णांनी यापूर्वी घेतली होती. पण आपण त्यांची गॅरेंटी घेत नाही अशी पुस्तीही जोडली होती. आता अण्णा काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, जनलोकपाल विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडू असा पुनरुच्चार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केला आहे. भ्रष्टाचाराशी लढायला सध्याचे कायदे पुरेसे नाहीत असं मनमोहनसिंग म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close