S M L

आम्हाला टार्गेट केलं जात आहे - अजित पवार

22 एप्रिलपुण्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्यावर होणार्‍या आरोपांविषयी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांवर आणि आपल्यावर आरोपकरून आपल्याला जाणीव पूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मीडिया आपल्याला आणि शरद पवारांना टार्गेट करते आम्ही घोटाळे केले नाही मीडिया पराचा कावळा करत आहे असा आरोपही केला. यावेळी कार्यकर्त्यांना चुका करू नका, पक्षाची बदनामी होते असा सल्लाही पवारांनी दिला. तर महाराष्ट्रात इतर भाषिकांचीही काळजी घेतली पाहिजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. सर्वच क्षेत्रात काम करण्यासाठी इतर राज्यातून कामगार येत आहेत त्यामुळे त्यांचाही मेळावा घेतला गेला पाहिजे असं पवार म्हणाले आहे.या मेळाव्यात नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिकाचे सदस्य याठिकाणी हजर आहेत.राष्ट्रवादीची सभा ही गणेश क्रीडा मंडळ येथे सुरु आहे. अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आर. आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि सुप्रिया सुळेंसह पक्षाचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2011 09:29 AM IST

आम्हाला टार्गेट केलं जात आहे - अजित पवार

22 एप्रिल

पुण्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्यावर होणार्‍या आरोपांविषयी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांवर आणि आपल्यावर आरोपकरून आपल्याला जाणीव पूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मीडिया आपल्याला आणि शरद पवारांना टार्गेट करते आम्ही घोटाळे केले नाही मीडिया पराचा कावळा करत आहे असा आरोपही केला. यावेळी कार्यकर्त्यांना चुका करू नका, पक्षाची बदनामी होते असा सल्लाही पवारांनी दिला.

तर महाराष्ट्रात इतर भाषिकांचीही काळजी घेतली पाहिजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. सर्वच क्षेत्रात काम करण्यासाठी इतर राज्यातून कामगार येत आहेत त्यामुळे त्यांचाही मेळावा घेतला गेला पाहिजे असं पवार म्हणाले आहे.

या मेळाव्यात नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिकाचे सदस्य याठिकाणी हजर आहेत.राष्ट्रवादीची सभा ही गणेश क्रीडा मंडळ येथे सुरु आहे. अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आर. आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि सुप्रिया सुळेंसह पक्षाचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2011 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close