S M L

जैतापूर प्रकल्पविरोधकांचा तारापूर ते जैतापूर मोर्चा

23 एप्रिलआज शनिवारी तारापूर इथून अणुउर्जा विरोधकांचा मोर्चा निघणार आहे. दोन दिवसांमध्ये 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा जैतापूरला पोहोचणार आहे. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तिथले प्रकल्प पीडित या मोर्चात सामील होणार आहेत. याशिवाय वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच. एम. देसरडा असे सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत आहेत. दरम्यान वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांनाही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे हे दोघेही या बंदीचा आदेश मोडून रविवारी रत्नागिरीत प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 10:28 AM IST

जैतापूर प्रकल्पविरोधकांचा तारापूर ते जैतापूर मोर्चा

23 एप्रिल

आज शनिवारी तारापूर इथून अणुउर्जा विरोधकांचा मोर्चा निघणार आहे. दोन दिवसांमध्ये 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा जैतापूरला पोहोचणार आहे. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तिथले प्रकल्प पीडित या मोर्चात सामील होणार आहेत. याशिवाय वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच. एम. देसरडा असे सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत आहेत. दरम्यान वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांनाही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे हे दोघेही या बंदीचा आदेश मोडून रविवारी रत्नागिरीत प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close