S M L

कृषी धोरणात बदल करणार !

23 एप्रिलपंतप्रधान पॅकेजमध्ये भ्रष्टाचार केल्या प्रकरणी निलंबित झालेल्या 19 अधिकार्‍यांची नावं आयबीएन लोकमतच्या हाती. कृषी धोरणात अमुलाग्र बदल करणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.शेतकर्‍यांचे मारेकरी नावाची विशेष मोहीम आम्ही 12 एप्रिलपासून सुरु केली. पीएम आणि सीएम पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाला आहे. त्यातील दोषींवर कधी कारवाई होणार? यासाठी आम्ही ही मोहीम सुरु केली. आणि आता कारवाईची सुरवात झाली ती कृषी विभागापासून. कृषी विभागाच्या 405 अधिकार्‍यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. डिसेंबर महिन्यात या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. आता तब्बल चार महिन्यांनी यापैकी 77 अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे अंतिम आदेश काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली. ही कारवाई विविध स्वरुपची असेल. प्रमोशन थांबवणे, बडतर्फी, निलंबन आणि आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. याशिवाय, अवजारांच्या पुरवठादार असलेल्या राज्य सरकारच्या तिन्ही नोडल एजन्सीसच्या अधिकार्‍यांचीही पुढील दीड महिन्यात चौकशी केली जाणार आहे. आयबीएन लोकमतच्या हाती ज्या 19 अधिकार्‍यांवर करावाईचा बडगा उगारण्यात आला आहे ती यादी 1) पी.एस. घोंगडे, तालुका कृषी अधिकारी- नांदगाव-खंडेश्वर2) जे.व्ही. चहाणकर, तालुका कृषी अधिकारी- हिंगणघाट (सेवानिवृत्त)3) पी.एन. गोपालक, कृषी सहाय्यक - हिंगणघाट (आधी निलंबित)4) आर.जी. घोडमारे, कृषी पर्यवेक्षक - हिंगणघाट5) ए.एन. कंडारकर, तालुका कृषी अधिकारी- कारंजा6) एम. एस. इंगोले, वरिष्ठ लिपिक - कारंजा7) एस.आर. दामोदर, तालुका कृषी अधिकारी- जळगाव-जामोद8) बी. आर. नजरधने, तालुका कृषी अधिकारी -संग्रामपूर9) बी.एन. धुंदले, मंडल कृषी अधिकारी (सेवानिवृत्त) 10) डी.व्ही. गवई, तालुका कृषी अधिकारी- बुलडाणा11) एस.एम. पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी- मानोरा12) एम.एम. मन्वर, लिपिक- मानोरा (सेवानिवृत्त)13) पी.डी. खरात, तालुका कृषी अधिकारी- पांढरकवडा14) एस.आर. वालदे, मंडल कृषी अधिकारी- धामणगाव15) ए.एस. गजभिये, तालुका कृषी अधिकारी- धामणगाव16) व्ही.एम. गावंडे, तालुका कृषी अधिकारी - वरूड17) आर.डी. किलबिले, तालुका कृषी अधिकारी- बुलडाणा (याआधी निलंबित)18) बी.व्ही. वांदिले, तालुका कृषी अधिकारी- तिवसा (याआधी निलंबित)19) यू.बी. काटकर, तालुका कृषी अधिकारी- कळंब (सेवानिवृत्त)

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 09:49 AM IST

कृषी धोरणात बदल करणार !

23 एप्रिल

पंतप्रधान पॅकेजमध्ये भ्रष्टाचार केल्या प्रकरणी निलंबित झालेल्या 19 अधिकार्‍यांची नावं आयबीएन लोकमतच्या हाती. कृषी धोरणात अमुलाग्र बदल करणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांचे मारेकरी नावाची विशेष मोहीम आम्ही 12 एप्रिलपासून सुरु केली. पीएम आणि सीएम पॅकेजच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाला आहे. त्यातील दोषींवर कधी कारवाई होणार? यासाठी आम्ही ही मोहीम सुरु केली. आणि आता कारवाईची सुरवात झाली ती कृषी विभागापासून.

कृषी विभागाच्या 405 अधिकार्‍यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. डिसेंबर महिन्यात या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. आता तब्बल चार महिन्यांनी यापैकी 77 अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे अंतिम आदेश काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली.

ही कारवाई विविध स्वरुपची असेल. प्रमोशन थांबवणे, बडतर्फी, निलंबन आणि आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. याशिवाय, अवजारांच्या पुरवठादार असलेल्या राज्य सरकारच्या तिन्ही नोडल एजन्सीसच्या अधिकार्‍यांचीही पुढील दीड महिन्यात चौकशी केली जाणार आहे.

आयबीएन लोकमतच्या हाती ज्या 19 अधिकार्‍यांवर करावाईचा बडगा उगारण्यात आला आहे ती यादी

1) पी.एस. घोंगडे, तालुका कृषी अधिकारी- नांदगाव-खंडेश्वर2) जे.व्ही. चहाणकर, तालुका कृषी अधिकारी- हिंगणघाट (सेवानिवृत्त)3) पी.एन. गोपालक, कृषी सहाय्यक - हिंगणघाट (आधी निलंबित)4) आर.जी. घोडमारे, कृषी पर्यवेक्षक - हिंगणघाट5) ए.एन. कंडारकर, तालुका कृषी अधिकारी- कारंजा6) एम. एस. इंगोले, वरिष्ठ लिपिक - कारंजा7) एस.आर. दामोदर, तालुका कृषी अधिकारी- जळगाव-जामोद8) बी. आर. नजरधने, तालुका कृषी अधिकारी -संग्रामपूर9) बी.एन. धुंदले, मंडल कृषी अधिकारी (सेवानिवृत्त) 10) डी.व्ही. गवई, तालुका कृषी अधिकारी- बुलडाणा11) एस.एम. पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी- मानोरा12) एम.एम. मन्वर, लिपिक- मानोरा (सेवानिवृत्त)13) पी.डी. खरात, तालुका कृषी अधिकारी- पांढरकवडा14) एस.आर. वालदे, मंडल कृषी अधिकारी- धामणगाव15) ए.एस. गजभिये, तालुका कृषी अधिकारी- धामणगाव16) व्ही.एम. गावंडे, तालुका कृषी अधिकारी - वरूड17) आर.डी. किलबिले, तालुका कृषी अधिकारी- बुलडाणा (याआधी निलंबित)18) बी.व्ही. वांदिले, तालुका कृषी अधिकारी- तिवसा (याआधी निलंबित)19) यू.बी. काटकर, तालुका कृषी अधिकारी- कळंब (सेवानिवृत्त)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close