S M L

'तारापूर ते जैतापूर 'मोर्चा तारापूरमध्ये पोलिसांनी अडवला

23 एप्रिलजैतापूर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज देशभरातील कार्याकर्त्यांनी एकत्र येऊन तारापूर ते जैतापूर यात्रेचं आयोजन केलंय. ही यात्रा आज सुरू होऊन 26 तारखेला जैतापूर इथं संपणार आहे. मात्र 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा तारापूर येथेच पोलिसांनी अडवला. आंदोलक नेते वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच.एम.देसरडा आणि बनवारीलाल शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना बोईसर पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तेथील प्रकल्प पीडित या मोर्चात सहभागी झाले आहेत. याआधी वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांवरही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2011 02:50 PM IST

'तारापूर ते जैतापूर 'मोर्चा तारापूरमध्ये पोलिसांनी अडवला

23 एप्रिल

जैतापूर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज देशभरातील कार्याकर्त्यांनी एकत्र येऊन तारापूर ते जैतापूर यात्रेचं आयोजन केलंय. ही यात्रा आज सुरू होऊन 26 तारखेला जैतापूर इथं संपणार आहे. मात्र 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा तारापूर येथेच पोलिसांनी अडवला.

आंदोलक नेते वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच.एम.देसरडा आणि बनवारीलाल शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना बोईसर पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तेथील प्रकल्प पीडित या मोर्चात सहभागी झाले आहेत. याआधी वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांवरही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close