S M L

सत्यसाईबाबा यांचं निधन

24 एप्रिलआंध्रप्रदेशातील पुट्टपर्थीचे अध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबा यांचं आज सकाळी साडेसात वाजता निधन झालं. पुट्टपर्थीच्या सत्य साई सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचं शरीर उपचारांनी फारसा प्रतिसाद देत नव्हतं. मल्टी ऑरगन फेल्युअरमुळे गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र श्वसनयंत्रणा पूर्ण निकामी झाली होती आणि त्यातच त्यांचं निधन झालं. जगभरात बाबाचे समाजाच्या सगळ्या थरातील भक्त आहेत. अंत्यदर्शनासाठी बाबांचं पार्थिव साई कुलवंत हॉल इथं सोमवारी आणि मंगळवारी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता साई कुलवंत हॉलमध्ये सत्यसाईबाबांच्या पार्थिवाच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, पुट्टपर्थीतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सगळ्यांनी शांतता पाळावी. हॉस्पिटलच्या बाहेर भावनातिरेकानं गर्दी करू नये असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पुट्टपार्थीला पोहोचत आहे. तसेच भाजपचे लालकृष्ण अडवाणी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे. सत्यसाईबाबांच्या जीवनप्रवासाविषयीपुट्टपर्ती आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील छोटसं खेड. आज 180 देशांमधुन भाविक आज या खेड्यात येतात. अध्यात्म आणि आत्मशांतीच्या शोधासाठी. 23 नोव्हेंबर 1926 रोजी याच पुट्टपर्तीत सत्य नारायण राजु यांचा जन्म झाला. सत्य नारायण राजु म्हणजेच सत्यसाई बाबा. जगभरातल्या भक्तांचे लाडके `बाबा`लहानपणी बाबांना सर्व `सत्या` या नावानचं हाक मारायचे. हाच सत्या पुढं जगभर नावलौकीक मिळवेल याची त्याकाळी कुणाला कल्पनाही आली नाही. लहानपणापासूनच बाबांची सतत दुसर्‍यांना मदत करण्याची वृत्ती. त्यांच्या आई वडिलांनाही या त्यांच्या गुणांचे खूप कौतुक होतं. मात्र सत्यानं अभ्यासात लक्ष द्यावे असं त्यांचं म्हणणं असायचं. लौकीक अर्थाने बाबा फक्त 4 थी पर्यंत शिकले. त्यावेळी बाबांनी पुट्टपर्तीत पंढरी भजन मंडळाची स्थापना केली.1940 हे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वर्ष याच वर्षी 20 ऑक्टोंबर रोजी त्यांनी आपणच शिर्डी साईबाबा असल्याचं घोषित केलं. त्याकाळी शिर्डी हे नावंही दक्षिण भारतात फारसं कुणाला माहित नव्हतं. आणि इथूनचं बाबांचा खरा प्रवास सुरू झाला. मी आता सर्वांचा ाहे असं सांगत ते घरापासून दूर झाले आणि लोकांना मार्गदर्शन करू लागले. गीतेतील मानवी मुल्या अतिशय सोप्या पध्दतीने सांगण्याची हातोटी आणि त्याला सेवेची जोड यामुळे हळुहळु लोक त्यांच्याकडे येवू लागले. पुट्टपर्तीत गर्दी वाढु लागली. नंतर बाबांनी 'प्रशांती निलयम' या आश्रमाची स्थापना केली. बाबा करत असलेल्या चमत्कारामुळे जसं त्यांचं नाव जगभर झालं. तसेच त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. अनेक वादळांना त्यांना सामोरे जावं लागलं. मात्र त्यांचा प्रभाव वाढतचं राहिला.बाबांचे भक्त'साई बाबा मॅन ऑफ मिरॅकल्स', 'माय बाबा अँड आय', 'गॉड लिव्हज इन इंडिया' या ुपस्तकांमुळे बाबांच नाव विदेशात पोहोचलं आज जगातल्या 180 देशांमध्ये सत्यसाई सेवा संघटनेच्या शाखा आहेत. बाबांच्या भक्तांवर एक नजर जरी टाकली तरी बाबांचा प्रभाव आपल्या लक्षात येईल. माजी संरक्षणसचिव डॉ. भगवंतम, बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कन्नड साहित्यिक डॉ. व्हि. के. गोगाक, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, निल आर्मस्ट्रॉग, माजी सरन्यायाधिश, डॉ.पी.एन. भगवती, न्या.श्रीकृष्ण अय्यर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पंडित रवीशंकर, उस्ताद अमजदअली खान, संतुरवादक शिवकुमार शर्मा, परविन सुलताना कविता कृष्णमृर्ती, उद्योगपती रतन टाटा, सुनिल मित्तल, टीव्हीस ग्रुपचे श्रीनिवासन हे बाबांचे भक्त. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा बाबांच्या भक्तांमध्ये समावेश होतो.बाबा आणि सेवाबाबांनी स्थापन केलेल्या शाळा आणि महाविद्यालयामधून आज लाखो विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. पुट्टपर्तीत तर केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. 'एज्युकेशन इन ह्युमन व्हॅल्युज' हा इथल्या शिक्षणाचा पाया आहे. पुट्टपर्ती आणि बंगळुरूमध्ये असलेल्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधूनही आज नि:शुल्क उपचार केले जातात. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडुतल्या 700 पेक्षा जास्त गावांना बाबांच्या ट्रस्ट कडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2011 06:58 AM IST

सत्यसाईबाबा यांचं निधन

24 एप्रिलआंध्रप्रदेशातील पुट्टपर्थीचे अध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबा यांचं आज सकाळी साडेसात वाजता निधन झालं. पुट्टपर्थीच्या सत्य साई सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचं शरीर उपचारांनी फारसा प्रतिसाद देत नव्हतं. मल्टी ऑरगन फेल्युअरमुळे गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मात्र श्वसनयंत्रणा पूर्ण निकामी झाली होती आणि त्यातच त्यांचं निधन झालं. जगभरात बाबाचे समाजाच्या सगळ्या थरातील भक्त आहेत. अंत्यदर्शनासाठी बाबांचं पार्थिव साई कुलवंत हॉल इथं सोमवारी आणि मंगळवारी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता साई कुलवंत हॉलमध्ये सत्यसाईबाबांच्या पार्थिवाच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, पुट्टपर्थीतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सगळ्यांनी शांतता पाळावी. हॉस्पिटलच्या बाहेर भावनातिरेकानं गर्दी करू नये असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पुट्टपार्थीला पोहोचत आहे. तसेच भाजपचे लालकृष्ण अडवाणी त्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.

सत्यसाईबाबांच्या जीवनप्रवासाविषयी

पुट्टपर्ती आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील छोटसं खेड. आज 180 देशांमधुन भाविक आज या खेड्यात येतात. अध्यात्म आणि आत्मशांतीच्या शोधासाठी. 23 नोव्हेंबर 1926 रोजी याच पुट्टपर्तीत सत्य नारायण राजु यांचा जन्म झाला. सत्य नारायण राजु म्हणजेच सत्यसाई बाबा. जगभरातल्या भक्तांचे लाडके `बाबा`

लहानपणी बाबांना सर्व `सत्या` या नावानचं हाक मारायचे. हाच सत्या पुढं जगभर नावलौकीक मिळवेल याची त्याकाळी कुणाला कल्पनाही आली नाही. लहानपणापासूनच बाबांची सतत दुसर्‍यांना मदत करण्याची वृत्ती. त्यांच्या आई वडिलांनाही या त्यांच्या गुणांचे खूप कौतुक होतं. मात्र सत्यानं अभ्यासात लक्ष द्यावे असं त्यांचं म्हणणं असायचं. लौकीक अर्थाने बाबा फक्त 4 थी पर्यंत शिकले. त्यावेळी बाबांनी पुट्टपर्तीत पंढरी भजन मंडळाची स्थापना केली.

1940 हे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वर्ष याच वर्षी 20 ऑक्टोंबर रोजी त्यांनी आपणच शिर्डी साईबाबा असल्याचं घोषित केलं. त्याकाळी शिर्डी हे नावंही दक्षिण भारतात फारसं कुणाला माहित नव्हतं. आणि इथूनचं बाबांचा खरा प्रवास सुरू झाला. मी आता सर्वांचा ाहे असं सांगत ते घरापासून दूर झाले आणि लोकांना मार्गदर्शन करू लागले.

गीतेतील मानवी मुल्या अतिशय सोप्या पध्दतीने सांगण्याची हातोटी आणि त्याला सेवेची जोड यामुळे हळुहळु लोक त्यांच्याकडे येवू लागले. पुट्टपर्तीत गर्दी वाढु लागली. नंतर बाबांनी 'प्रशांती निलयम' या आश्रमाची स्थापना केली. बाबा करत असलेल्या चमत्कारामुळे जसं त्यांचं नाव जगभर झालं. तसेच त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. अनेक वादळांना त्यांना सामोरे जावं लागलं. मात्र त्यांचा प्रभाव वाढतचं राहिला.

बाबांचे भक्त

'साई बाबा मॅन ऑफ मिरॅकल्स', 'माय बाबा अँड आय', 'गॉड लिव्हज इन इंडिया' या ुपस्तकांमुळे बाबांच नाव विदेशात पोहोचलं आज जगातल्या 180 देशांमध्ये सत्यसाई सेवा संघटनेच्या शाखा आहेत. बाबांच्या भक्तांवर एक नजर जरी टाकली तरी बाबांचा प्रभाव आपल्या लक्षात येईल.

माजी संरक्षणसचिव डॉ. भगवंतम, बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कन्नड साहित्यिक डॉ. व्हि. के. गोगाक, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, निल आर्मस्ट्रॉग, माजी सरन्यायाधिश, डॉ.पी.एन. भगवती, न्या.श्रीकृष्ण अय्यर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पंडित रवीशंकर, उस्ताद अमजदअली खान, संतुरवादक शिवकुमार शर्मा, परविन सुलताना कविता कृष्णमृर्ती, उद्योगपती रतन टाटा, सुनिल मित्तल, टीव्हीस ग्रुपचे श्रीनिवासन हे बाबांचे भक्त. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा बाबांच्या भक्तांमध्ये समावेश होतो.

बाबा आणि सेवा

बाबांनी स्थापन केलेल्या शाळा आणि महाविद्यालयामधून आज लाखो विद्यार्थी नि:शुल्क शिक्षण घेत आहेत. पुट्टपर्तीत तर केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. 'एज्युकेशन इन ह्युमन व्हॅल्युज' हा इथल्या शिक्षणाचा पाया आहे. पुट्टपर्ती आणि बंगळुरूमध्ये असलेल्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधूनही आज नि:शुल्क उपचार केले जातात. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडुतल्या 700 पेक्षा जास्त गावांना बाबांच्या ट्रस्ट कडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2011 06:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close