S M L

जलविधेयकाच्या विरोधात पाणी संघर्ष मंच आंदोलन उभारणार !

28 एप्रिलमहाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या जलविधेयकाच्या विरोधात लोकाभिमुख पाणी संघर्ष मंच आंदोलन उभारणार आहे. तसेच सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे, संघर्ष मंचचे भारत पाटणकर यांनी सांगितले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एन.डी.पाटील, सुनिती सू.र., सचिन वारघडे उपस्थित होते. उच्चाधिकार समितीच्या वाटपाच्या माध्यमातून जे सिंचनाचे पाणी उद्योगासाठी वळवलं त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचंच काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने केल्याचा आरोप एन.डी. पाटील यांनी यावेळी केला. 20 मे रोजी पुण्यात पाणी परिषद भरवून त्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन उभं केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 03:11 PM IST

जलविधेयकाच्या विरोधात पाणी संघर्ष मंच आंदोलन उभारणार !

28 एप्रिल

महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या जलविधेयकाच्या विरोधात लोकाभिमुख पाणी संघर्ष मंच आंदोलन उभारणार आहे. तसेच सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे, संघर्ष मंचचे भारत पाटणकर यांनी सांगितले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एन.डी.पाटील, सुनिती सू.र., सचिन वारघडे उपस्थित होते.

उच्चाधिकार समितीच्या वाटपाच्या माध्यमातून जे सिंचनाचे पाणी उद्योगासाठी वळवलं त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचंच काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने केल्याचा आरोप एन.डी. पाटील यांनी यावेळी केला. 20 मे रोजी पुण्यात पाणी परिषद भरवून त्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन उभं केलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close