S M L

कात्रजच्या घाटात बिल्डराचा गनिमी कावा !

28 एप्रिलपुण्यातील कात्रज टेकडी येथे गेले अनेक दिवस डोंगर फोड सुरु होती. सरकारने वारंवार नोटीस बजावूनही डोंगर फोड थांबत नव्हती. विधानसभेतही हे प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर काही दिवस येथील काम थांबवण्यात आलं होतं. पण पुण्याचे उपजिल्हाधिकारी आर. के गायकवाड यांनी पुन्हा या कामाला परवानगी दिली. 19 एप्रिल रोजी ही परवानगी देण्यात आली. पण ही परवानगी डोंगरफोडीची नसून येथील राडारोडा हटवण्याचे आदेश बिल्डरला देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात राडारोडा हटवण्यासोबतच डोंगर फोडण्याचे कामही सुुरुच होतं. प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर आज पुन्हा काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच डोंगर फोडण्यासाठीची मशिनरी आणि जेसीबी टेकडीवर आहेत. अजून बिल्डरवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ही कारवाईही फार्सच ठरणार आहे की काय असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2011 04:09 PM IST

कात्रजच्या घाटात बिल्डराचा गनिमी कावा !

28 एप्रिल

पुण्यातील कात्रज टेकडी येथे गेले अनेक दिवस डोंगर फोड सुरु होती. सरकारने वारंवार नोटीस बजावूनही डोंगर फोड थांबत नव्हती. विधानसभेतही हे प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर काही दिवस येथील काम थांबवण्यात आलं होतं. पण पुण्याचे उपजिल्हाधिकारी आर. के गायकवाड यांनी पुन्हा या कामाला परवानगी दिली.

19 एप्रिल रोजी ही परवानगी देण्यात आली. पण ही परवानगी डोंगरफोडीची नसून येथील राडारोडा हटवण्याचे आदेश बिल्डरला देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात राडारोडा हटवण्यासोबतच डोंगर फोडण्याचे कामही सुुरुच होतं. प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर आज पुन्हा काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच डोंगर फोडण्यासाठीची मशिनरी आणि जेसीबी टेकडीवर आहेत. अजून बिल्डरवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ही कारवाईही फार्सच ठरणार आहे की काय असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2011 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close