S M L

स्पेक्ट्रम घोटाळ्यातील पैसा हडपण्यात नीरा राडियांवर संशय

29 एप्रिलनीरा राडिया या कॉर्पोरेट लॉबीस्टबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये पाच कंपन्या चालवत असून 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या लाभार्थी कंपन्यांशी व्यवहार करत आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालयाने त्यांच्या चौकशीला सुरवात केली आहे. नीरा राडिया 2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या चार्जशीटमधली साक्षीदार नंबर 44. राडिया यांचे 2 जी घोटाळ्याशी संबंध आहेत. हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळाला नव्हता. पण सीएनएन-आयबीएनच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमुळे ही स्थिती बदलू शकते. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्सशी केलेल्या पत्रव्यवहारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीरा राडिया आणि तिची बहीण करुणा मेनन यांनी 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा लाटल्याचा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा संशय आहे. पाच कंपन्याचे धागेदोरे ब्रिटीश व्हर्जीन आर्यलँडपर्यंत दिसून आलेत. आणि त्या सर्वांचा पत्ता एकच आहे. नीरा राडिया आणि त्यांच्या बहिणींच्या मालकीच्या या कंपन्या असल्याचा विश्वास एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला वाटतोय. 2 जी घोटाळ्याशी राडिया यांचा दिसून आलेला हा पहिलाच थेट संबंध आहे. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला तपासात - 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा हवालामार्गे परदेशात पाठवण्यात आला- हाच पैसा पुन्हा गुंतवणुकीच्या रुपानं भारतात आणला गेला - 5 कंपन्यांच्या माध्यमातून राडिया आणि त्यांच्या बहिणीनं घोटाळ्यातल्या आरोपींना पैसा लाटण्यासाठी मदत केल्याचा संशय - या सर्व कंपन्या ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्समध्ये 2007 मधल्या 4 महिन्यांत रजिस्टर्ड झाल्या - कोलेट्स ट्रेडिंग लिमिटेड ही कंपनी 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड झाली - हिमलेन ट्रेडिंगसुद्धा 19 नोव्हेंबर 2007 रोजीेच रजिस्टर्ड झाली - किंगस्टन इंटरनॅशनल ट्रेडिंग 27 ऑक्टोबर 2007 रोजी रजिस्टर्ड झाली - मलागा ओव्हरसिज लिमिटेड 25 सप्टेंबर 20007 रोजी - तर नेटसर्व्हर डिल्स 1 ऑगस्ट 2007 रोजी रजिस्टर्ड झाली या सर्व कंपन्यांचा पत्ता एकच आहे. तो म्हणजे मॉर्गन अँड मॉर्गन बिल्डिंग, पी. ओ. बॉक्स 958, पेसी इस्टेट, रोड टाऊन, टॉर्टोला, ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्स.एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने नीरा राडिया आणि त्यांची कंपनी वैष्णवी कम्युनिकेशन्सला याबाबत प्रश्नसूची पाठवली आहे. पण त्यांच्याकडून कोणतंच प्रत्युत्तर आलं नाही. 2 जी घोटाळ्याचा तपास सीबीआय करतं आहे. पण नीरा राडिया प्रकरणाची जबाबदारी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं घेतली. राडिया यांचं टॅप झालेलं संभाषण 2 जी घोटाळ्याच्या तपासात महत्त्वाचा दुवा आहे. या टेप्स कदाचित पुरावा म्हणून ग्राह्य मानल्या जाणार नाहीत. पण पैशांच्या अफरातफरीचा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा संशय खरा ठरला तर मात्र नीरा राडिया अडचणीत येऊ शकतात.2-जी चा पैसा राडियांनी लाटला?एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा तपास - 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा हवालामार्गे परदेशात पाठवण्यात आला- हाच पैसा पुन्हा गुंतवणुकीच्या रुपानं भारतात आणला गेला - 5 कंपन्यांच्या माध्यमातून राडिया आणि त्यांच्या बहिणीनं घोटाळ्यातल्या आरोपींना पैसा लाटण्यासाठी मदत केली? - सर्व कंपन्या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्समध्ये 2007 मधल्या 4 महिन्यांत रजिस्टर्ड - कोलेट्स ट्रेडिंग लिमिटेड 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - हिमलेन ट्रेडिंग 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - किंगस्टन इंटरनॅशनल ट्रेडिंग 27 ऑक्टोबर 2007 रोजी रजिस्टर्ड - मलागा ओव्हरसिज लिमिटेड 25 सप्टेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - नेटसर्व्हर डिल्स 1 ऑगस्ट 2007 रोजी रजिस्टर्ड

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 05:37 PM IST

स्पेक्ट्रम घोटाळ्यातील पैसा हडपण्यात नीरा राडियांवर संशय

29 एप्रिल

नीरा राडिया या कॉर्पोरेट लॉबीस्टबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये पाच कंपन्या चालवत असून 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या लाभार्थी कंपन्यांशी व्यवहार करत आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालयाने त्यांच्या चौकशीला सुरवात केली आहे.

नीरा राडिया 2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या चार्जशीटमधली साक्षीदार नंबर 44. राडिया यांचे 2 जी घोटाळ्याशी संबंध आहेत. हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळाला नव्हता. पण सीएनएन-आयबीएनच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमुळे ही स्थिती बदलू शकते.

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्सशी केलेल्या पत्रव्यवहारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीरा राडिया आणि तिची बहीण करुणा मेनन यांनी 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा लाटल्याचा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा संशय आहे. पाच कंपन्याचे धागेदोरे ब्रिटीश व्हर्जीन आर्यलँडपर्यंत दिसून आलेत. आणि त्या सर्वांचा पत्ता एकच आहे. नीरा राडिया आणि त्यांच्या बहिणींच्या मालकीच्या या कंपन्या असल्याचा विश्वास एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला वाटतोय. 2 जी घोटाळ्याशी राडिया यांचा दिसून आलेला हा पहिलाच थेट संबंध आहे.

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला तपासात

- 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा हवालामार्गे परदेशात पाठवण्यात आला- हाच पैसा पुन्हा गुंतवणुकीच्या रुपानं भारतात आणला गेला - 5 कंपन्यांच्या माध्यमातून राडिया आणि त्यांच्या बहिणीनं घोटाळ्यातल्या आरोपींना पैसा लाटण्यासाठी मदत केल्याचा संशय - या सर्व कंपन्या ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्समध्ये 2007 मधल्या 4 महिन्यांत रजिस्टर्ड झाल्या - कोलेट्स ट्रेडिंग लिमिटेड ही कंपनी 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड झाली - हिमलेन ट्रेडिंगसुद्धा 19 नोव्हेंबर 2007 रोजीेच रजिस्टर्ड झाली - किंगस्टन इंटरनॅशनल ट्रेडिंग 27 ऑक्टोबर 2007 रोजी रजिस्टर्ड झाली - मलागा ओव्हरसिज लिमिटेड 25 सप्टेंबर 20007 रोजी - तर नेटसर्व्हर डिल्स 1 ऑगस्ट 2007 रोजी रजिस्टर्ड झाली

या सर्व कंपन्यांचा पत्ता एकच आहे. तो म्हणजे मॉर्गन अँड मॉर्गन बिल्डिंग, पी. ओ. बॉक्स 958, पेसी इस्टेट, रोड टाऊन, टॉर्टोला, ब्रिटीश व्हर्जिन आर्यलँड्स.

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने नीरा राडिया आणि त्यांची कंपनी वैष्णवी कम्युनिकेशन्सला याबाबत प्रश्नसूची पाठवली आहे. पण त्यांच्याकडून कोणतंच प्रत्युत्तर आलं नाही. 2 जी घोटाळ्याचा तपास सीबीआय करतं आहे. पण नीरा राडिया प्रकरणाची जबाबदारी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं घेतली. राडिया यांचं टॅप झालेलं संभाषण 2 जी घोटाळ्याच्या तपासात महत्त्वाचा दुवा आहे. या टेप्स कदाचित पुरावा म्हणून ग्राह्य मानल्या जाणार नाहीत. पण पैशांच्या अफरातफरीचा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा संशय खरा ठरला तर मात्र नीरा राडिया अडचणीत येऊ शकतात.

2-जी चा पैसा राडियांनी लाटला?

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटचा तपास - 2 जी स्पेक्ट्रमचा पैसा हवालामार्गे परदेशात पाठवण्यात आला- हाच पैसा पुन्हा गुंतवणुकीच्या रुपानं भारतात आणला गेला - 5 कंपन्यांच्या माध्यमातून राडिया आणि त्यांच्या बहिणीनं घोटाळ्यातल्या आरोपींना पैसा लाटण्यासाठी मदत केली? - सर्व कंपन्या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्समध्ये 2007 मधल्या 4 महिन्यांत रजिस्टर्ड - कोलेट्स ट्रेडिंग लिमिटेड 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - हिमलेन ट्रेडिंग 19 नोव्हेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - किंगस्टन इंटरनॅशनल ट्रेडिंग 27 ऑक्टोबर 2007 रोजी रजिस्टर्ड - मलागा ओव्हरसिज लिमिटेड 25 सप्टेंबर 2007 रोजी रजिस्टर्ड - नेटसर्व्हर डिल्स 1 ऑगस्ट 2007 रोजी रजिस्टर्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close