S M L

एंडोसल्फानवर बंदीसाठी भारतात 11 वर्षं लागणार

29 एप्रिलजीवघेणं कीटकनाशक समजल्या जाणार्‍या एंडोसल्फानवर जिनेव्हातल्या स्टॉकहोम कन्व्हेशनने जागतिक बंदी घातली आहे. भारत सरकार या बंदीच्या विरोधात होतं. पण अखेर भारताने काही सवलतीच्या आधारांवर बंदीला होकार दिला. पण त्यासाठी 11 वर्षं लागतील असं सांगितलं. भारतात एन्डोसल्फानचे सर्वाधिक उत्पादन आणि वापर होतो. त्याची उलाढाल 30 कोटी डॉलर्स इतकी आहे. 1980 मध्ये एंडोसल्फानमुळे केरळमधील कासरगोड या गावात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या आणि अनुवांशिक आजाराच्या केसेस आढळल्या. त्यानंतर केरळमध्ये एंडोसल्फानच्या वापरावर बंदी घालण्यात आली. देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज केरळमध्ये बंद पुकारण्यात आला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 05:45 PM IST

एंडोसल्फानवर बंदीसाठी भारतात 11 वर्षं लागणार

29 एप्रिल

जीवघेणं कीटकनाशक समजल्या जाणार्‍या एंडोसल्फानवर जिनेव्हातल्या स्टॉकहोम कन्व्हेशनने जागतिक बंदी घातली आहे. भारत सरकार या बंदीच्या विरोधात होतं. पण अखेर भारताने काही सवलतीच्या आधारांवर बंदीला होकार दिला. पण त्यासाठी 11 वर्षं लागतील असं सांगितलं. भारतात एन्डोसल्फानचे सर्वाधिक उत्पादन आणि वापर होतो.

त्याची उलाढाल 30 कोटी डॉलर्स इतकी आहे. 1980 मध्ये एंडोसल्फानमुळे केरळमधील कासरगोड या गावात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या आणि अनुवांशिक आजाराच्या केसेस आढळल्या. त्यानंतर केरळमध्ये एंडोसल्फानच्या वापरावर बंदी घालण्यात आली. देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज केरळमध्ये बंद पुकारण्यात आला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close