S M L

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शोधकार्यात भूतानची मदत

01 मेअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्याबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे. 24 तास उलटून गेले तरी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा शोध अजून लागलेला नाही. हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पाच जण आहेत. आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून पुन्हा खांडू यांच्या शोधाला सुरूवात झाली. हेलिकॉप्टर गायब झालेला प्रदेश भूतानच्या जवळ असल्याने भारताने शोधकार्यात भूतानची मदत घेतली आहे. भूतानच्या सीमेलगत असलेल्या 7 जिल्ह्यांमध्ये भूतानचे लष्कर शोध घेत आहे. मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पोलीस अधिकारी, एक महिला अधिकारी आणि दोन कॅप्टन आहे. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरचा टेक ऑफ झाल्यानंतर 20 मिनिटांतच त्याचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 10:27 AM IST

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शोधकार्यात भूतानची मदत

01 मे

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्याबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे. 24 तास उलटून गेले तरी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा शोध अजून लागलेला नाही. हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पाच जण आहेत. आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून पुन्हा खांडू यांच्या शोधाला सुरूवात झाली.

हेलिकॉप्टर गायब झालेला प्रदेश भूतानच्या जवळ असल्याने भारताने शोधकार्यात भूतानची मदत घेतली आहे. भूतानच्या सीमेलगत असलेल्या 7 जिल्ह्यांमध्ये भूतानचे लष्कर शोध घेत आहे. मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पोलीस अधिकारी, एक महिला अधिकारी आणि दोन कॅप्टन आहे. शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरचा टेक ऑफ झाल्यानंतर 20 मिनिटांतच त्याचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close