S M L

'इ' इमारतीचा ते 'अ' अमेरिका !

राजीव कासले, मुंबई01 मेमराठवाड्यातील वायवा सारख्या छोट्याशा गावातून आपलं शिक्षण पूर्ण करणारे अविनाश राचमाले आज चार हजार कोटींच्या व्यवासायाचे मालक आहेत. आपलं इंजिनिअरिंगमधील कौशल्य वापरुन त्यांनी अमेरिकेत बांधकाम व्यवसाय उभारलं आणि मग अमेरिकेसह जगभरात त्यांनी आपल्या कंपनीचं जाळं विणलं.जगभरातील पाच देशात बांधकामांचे विणलेलं जाळं. चार हजार कोटीची वार्षिक उलाढाल आणि त्या जोरावरच अमेरिकेतील डिट्राईटमध्ये उभारलेलं अडीच लाख चौरसफुटांचे आलिशान असं मुख्यालय. अविनाश राचमाले या महाराष्ट्रीयन युवा उद्योजकाची ही यशोगाथा थक्क करणारी आहे. अविनाश अमेरिकेतील लेकशोअर इंजिनिअरिंग सर्व्हिसचे संस्थापक संचालक आहेत. त्यांच्या याच कर्तृत्वाची दखल घेतली ती थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी. अमेरिकेतील उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून ओबामांच्या हस्ते राचमालेचा सन्मान झाला. हा सन्मान होता एका जिद्दीचा आणि कठोर मेहनतीचा.मराठवाड्यातील वायगाव या एका छोट्याशा खेड्यात अविनाश यांचं बालपण गेले. अविनाशचे आई वडील दोघंही अशिक्षित पण त्यांनी अविनाशच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिलं. "अ" अमेरिकेचा हे अविनाशच्या मनावर ठसलं ते याच वयात. औरंगाबादमधून त्यांनी इंजिनिअररिंगची पदवी प्राप्त केली आणि मग थेट अमेरिका गाठली. वायगाव ते वॉशिंग्टन हा अविनाश यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विजयाचा त्यांचा फॉर्म्युला तसा साधा सरळ सोपा आहे. ठोर मेहनतीला पर्याय नाही, असं सांगतानाच आपण आयुष्यात कोणालाच कधी लाच दिली नाही हे सांगायलाही ते विसरत नाही. दर्जेदार काम हीच तुमची खरी ओळख असली पाहिजे हा आहे. अविनाश यांच्या आयुष्याचा मुलमंत्र. जगभरात उद्योगाचे साम्राज्य उभारणार्‍या राचमाले यांना आता भारतातही व्यवसायाचे जाळं विणायचंय. अविनाश यांनी नुसती स्वप्न पाहिली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी कठोर श्रमही घेतले. घामाच्या पैशातून उभारलेलं हजारो कोटींचे साम्राज्य हे त्यांच्या याच धडाडीची साक्ष देत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 04:57 PM IST

'इ' इमारतीचा ते 'अ' अमेरिका !

राजीव कासले, मुंबई

01 मे

मराठवाड्यातील वायवा सारख्या छोट्याशा गावातून आपलं शिक्षण पूर्ण करणारे अविनाश राचमाले आज चार हजार कोटींच्या व्यवासायाचे मालक आहेत. आपलं इंजिनिअरिंगमधील कौशल्य वापरुन त्यांनी अमेरिकेत बांधकाम व्यवसाय उभारलं आणि मग अमेरिकेसह जगभरात त्यांनी आपल्या कंपनीचं जाळं विणलं.

जगभरातील पाच देशात बांधकामांचे विणलेलं जाळं. चार हजार कोटीची वार्षिक उलाढाल आणि त्या जोरावरच अमेरिकेतील डिट्राईटमध्ये उभारलेलं अडीच लाख चौरसफुटांचे आलिशान असं मुख्यालय. अविनाश राचमाले या महाराष्ट्रीयन युवा उद्योजकाची ही यशोगाथा थक्क करणारी आहे.

अविनाश अमेरिकेतील लेकशोअर इंजिनिअरिंग सर्व्हिसचे संस्थापक संचालक आहेत. त्यांच्या याच कर्तृत्वाची दखल घेतली ती थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी. अमेरिकेतील उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून ओबामांच्या हस्ते राचमालेचा सन्मान झाला. हा सन्मान होता एका जिद्दीचा आणि कठोर मेहनतीचा.

मराठवाड्यातील वायगाव या एका छोट्याशा खेड्यात अविनाश यांचं बालपण गेले. अविनाशचे आई वडील दोघंही अशिक्षित पण त्यांनी अविनाशच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिलं. "अ" अमेरिकेचा हे अविनाशच्या मनावर ठसलं ते याच वयात. औरंगाबादमधून त्यांनी इंजिनिअररिंगची पदवी प्राप्त केली आणि मग थेट अमेरिका गाठली.

वायगाव ते वॉशिंग्टन हा अविनाश यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विजयाचा त्यांचा फॉर्म्युला तसा साधा सरळ सोपा आहे. ठोर मेहनतीला पर्याय नाही, असं सांगतानाच आपण आयुष्यात कोणालाच कधी लाच दिली नाही हे सांगायलाही ते विसरत नाही. दर्जेदार काम हीच तुमची खरी ओळख असली पाहिजे हा आहे.

अविनाश यांच्या आयुष्याचा मुलमंत्र. जगभरात उद्योगाचे साम्राज्य उभारणार्‍या राचमाले यांना आता भारतातही व्यवसायाचे जाळं विणायचंय. अविनाश यांनी नुसती स्वप्न पाहिली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी कठोर श्रमही घेतले. घामाच्या पैशातून उभारलेलं हजारो कोटींचे साम्राज्य हे त्यांच्या याच धडाडीची साक्ष देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close