S M L

'आदर्श'ची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

02 मेआदर्श सोसायटीची सुनावणी आता 27 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आज हायकोर्टात आदर्श संबंधी सुनावणी झाली. आदर्श चौकशी आयोगाकडून 17 जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रात या 17 जणांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यावरून पुढील तपासास त्याची मदत होऊ शकते असं आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे या सतरा जणांना पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. यात माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, पी. व्ही. देशमुख, रामानंद तिवारी, आर. सी. ठाकूर, सुनील तटकरे, सुरेश प्रभू, सुशिलकुमार शिंदे, महसूल आणि नगरविकासचे प्रधान सचिव, मुंबईचे जिल्हाधिकारी, कन्हैयालाल गिडवाणी, गीता कश्यप, एस. एस. जोग, एस. एस. दौंडकर, एस. एस. लांबा आणि कुलाब्याचे सर्व्हे ऑफिसर यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 10:59 AM IST

'आदर्श'ची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

02 मे

आदर्श सोसायटीची सुनावणी आता 27 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आज हायकोर्टात आदर्श संबंधी सुनावणी झाली. आदर्श चौकशी आयोगाकडून 17 जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रात या 17 जणांच्या नावाचा उल्लेख आहे.

त्यावरून पुढील तपासास त्याची मदत होऊ शकते असं आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे या सतरा जणांना पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. यात माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, पी. व्ही. देशमुख, रामानंद तिवारी, आर. सी. ठाकूर, सुनील तटकरे, सुरेश प्रभू, सुशिलकुमार शिंदे, महसूल आणि नगरविकासचे प्रधान सचिव, मुंबईचे जिल्हाधिकारी, कन्हैयालाल गिडवाणी, गीता कश्यप, एस. एस. जोग, एस. एस. दौंडकर, एस. एस. लांबा आणि कुलाब्याचे सर्व्हे ऑफिसर यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close