S M L

ओसामा बिन लादेन ठार

2 मेअमेरिकेवरील 9/11हल्ल्याचा सूत्रधार आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सीआयएच्या कारवाईत ठार झाल्याची अमेरिकेने घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ही घोषणा केली आहे. ओसामाचा मृतदेह अमेरिकेच्या ताब्यात असल्याचं वृत्तही अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकिस्तानमधे ज्या ठिकाणी लादेन ठार झाला ते घर इस्लामाबादपासून 120 किमी अंतरावर आहे. अमेरिकेनं इस्लामाबादच्या जवळ लक्ष्य केंद्रीत केलं होतं. यामध्येअमेरिकेच्या किंवा तिथल्या नागरिकांचा बळी गेलेला नाही. जोरदार धुमश्चक्रीनंतर ओसामा बिन लादेन मारला गेला. या ठिकाणी ओसामा लपलाय अशी पक्की माहिती मिळाल्यानंतर तिथल्या कंपाऊंडमध्ये हल्ला करण्याचे आदेश मी दिले. आम्ही इस्लामविरोधात नाही. बुश यांच्याप्रमाणेच मीही स्पष्ट करतो की ओसामा हा मुस्लीम नेता नव्हता. त्यानं अनेक निरपराध मुस्लीमांना मारलं. जे शांततेवर विश्वास ठेवतात त्यांना ओसामाच्या मृत्यूने आनंदच होईल. असं अमेरिका राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी म्हटलं आहे. ओसामाच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जल्लोष झाला. व्हाईट हाऊसमोर अमेरिकन नागरिकांनी आनंद साजरा केला. ओसामा ठार झाल्यानंतर जगभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हवाई हल्ल्यांच्या शक्यतेने जगभरात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.अमेरिकेच्या कारवाईवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांची प्रतिक्रिया -' दहशतवादाविरुद्ध आमची लढाई सुरूच राहिल, पण आज अमेरिकेने एक संदेश दिलाय की कितीही वेळ लागला तरी न्याय अखेर मिळतोच 'पाकिस्तानी मीडियाने ओसामा बिन लादेनच्या घराची दृश्यं दाखवली आहेत. हे घर पाकिस्तानातल्या अबोताबादमधील आहे. यातली महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचे लष्करी प्रशिक्षण केंद्र असलेल्या पाकिस्तान मिलिटरी ऍकडमीपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. या तीनमजली घरावर ही कारवाई झाली, तो भाग निवृत्त लष्करी अधिकार्‍यांच्या घरांचा आहे. कोण होता ओसामा बिन लादेन ? - 1957 मध्ये ओसामा बिन लादेनचा जन्म सौदी अरेबियात झाला. बांधकाम क्षेत्रातील मातब्बर अब्जाधीश मोहम्मद बिन लादेन हे त्याचे वडिल. त्यांच्या 50 अपत्यांपैकी एक ओसामा.- 17 व्या वर्षी सिरीयामधील नातेवाईकाच्या मुलीसोबतओसामाचं लग्न झालं. त्यानंतर ओसामाचे 5 लग्न झाली. पाच पत्नींपासून त्याला 23 मुलं झालेत. - ओसामाने सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली. - 1979 मध्ये तो रशियाच्या अफगाण आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये निघून गेला. तिथे त्यांनी रशियन आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी मोठा फंड गोळा केला. - 1988 मध्ये त्याचा भाऊ सलेम विमान दुर्घटनेत ठार झाला. त्यानंतर ओसामाच जीवन बदललं. तो मूलतत्ववादी झाला. - 1990 ओसामाने सौदी अरेबियात अमेरिकन सैन्य तळाविरुध्द आवाज उठवला. सौदी सरकारने ओसामाच नागरिकत्व रद्द केलं. तो सुदानला गेला. - 1998 मध्ये पूर्व आफ्रिकन देश केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन वकिलातीवर अल - कैदाने हल्ला केला. त्यात 224 जण ठार झालेत.-1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येताच आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवला.- ऑक्टोबर 2000 मध्ये येमेन मध्ये यूएसएस कोल युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला घडवला. यात 17 अमेरिकन सैनीक ठार झालेत. - 2001 लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तान तोरा बोरा इथल्या डोंगरदर्‍यात मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र त्यात तो बचावला. - 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत मोठा आत्मघाती हल्ला लादेननं यशस्वी केला. विमान हायजॅक करुन ती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर धडकवण्यात आली. यात 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले. त्यानंतर 250 कोटी रुपयाचे (25 मिलीयन डॉलर) बक्षीस त्याच्या शिरावर ठेवण्यात आलं. या हल्याची मोठी किंमत तालिबानला चुकवावी लागली. तालिबानी सत्तेतून हटवण्यात आलं. अफगाणिस्तानमधून अमेरिकेन लादेनला पकडण्यासाठी सर्वात मोठी मोहीम आखली. पाकच्या मदत घेण्यात आली. आजपर्यंत ओसामा बिन लादेननं 60 पेक्षा जास्त व्हिडिओ ऑडियो मेसेज विविध चॅनेलवरुन प्रसारीत/ जारी केले गेले आहेत.लादेनचा उत्तराधिकारी क्रुरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून आयमन अल- जवाहरीकडे पाहिलं जातंय. अल कायदाच्या कारवायांचा मास्टरमाईंड म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे अल कायदा आपल्या कारवाया त्याच्या माध्यमातून सुरुच राहणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं लिबियावर केलेल्या हल्ल्याबद्दल अमेरिकेला जबाबदार धरलं होतं. आणि मुस्लिम देशांना या विरोध एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्याने केलं होतं. त्याचबरोबर 9/11च्या ट्विन टॉवरवरच्या हल्ल्यानंतर, अमेरिकाविरोधात हा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीमध्ये ओसामा बिन लादेननंतर त्याचा दुसरा क्रमांक होता. काही दिवसांपूर्वीच जवाहरीनं बराक ओबामा यांच्यावरही जोरदार टीका केली होती. बुश यांच्यासारखे ओबामाही इस्लामविरोधी आहेत असं तो म्हणाला होता. ओसामा बिन लादेनसारखंच तोही अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर लपल्याची माहिती आहे. लादेन आणि जवाहरी यांना 10 सप्टेंबर 2003 ला अल जझीरने एकत्र दाखवलं होतं. यामध्ये ही दोघे डोंगराळ भागात चालत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतात दक्षतेता इशाराअमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरात हायअलर्ट जारी केला. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये ओसामा मारला जाणं ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे पाकिस्तानात अतिरेक्यांना आश्रय दिला जातो हा आमचा दावा खरा ठरलाय. त्यामुळे मुंबईवर हल्ला करणारे सूत्रधारही पाकिस्तानातच आहे हा आमचा दावा आहे.'ओसामाचा मृत्यू ही ऐतिहासिक घडामोड असल्याचं परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटलं आहे. 'ही ऐतिहासिक घटना आहे. दहशतवादाविरोधातल्या जागतिक युद्धातला हा मैलाचा दगड आहे. मात्र यापुढे दहशतवादाविरोधातील प्रयत्न थांबवले जाऊ नयेत. तसेच आपल्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवाद्यांना दिलेल्या आश्रयाचा बीमोड करण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवावेत.'

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 07:52 AM IST

ओसामा बिन लादेन ठार

2 मे

अमेरिकेवरील 9/11हल्ल्याचा सूत्रधार आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सीआयएच्या कारवाईत ठार झाल्याची अमेरिकेने घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ही घोषणा केली आहे. ओसामाचा मृतदेह अमेरिकेच्या ताब्यात असल्याचं वृत्तही अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकिस्तानमधे ज्या ठिकाणी लादेन ठार झाला ते घर इस्लामाबादपासून 120 किमी अंतरावर आहे. अमेरिकेनं इस्लामाबादच्या जवळ लक्ष्य केंद्रीत केलं होतं. यामध्येअमेरिकेच्या किंवा तिथल्या नागरिकांचा बळी गेलेला नाही.

जोरदार धुमश्चक्रीनंतर ओसामा बिन लादेन मारला गेला. या ठिकाणी ओसामा लपलाय अशी पक्की माहिती मिळाल्यानंतर तिथल्या कंपाऊंडमध्ये हल्ला करण्याचे आदेश मी दिले. आम्ही इस्लामविरोधात नाही. बुश यांच्याप्रमाणेच मीही स्पष्ट करतो की ओसामा हा मुस्लीम नेता नव्हता. त्यानं अनेक निरपराध मुस्लीमांना मारलं. जे शांततेवर विश्वास ठेवतात त्यांना ओसामाच्या मृत्यूने आनंदच होईल. असं अमेरिका राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी म्हटलं आहे.

ओसामाच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जल्लोष झाला. व्हाईट हाऊसमोर अमेरिकन नागरिकांनी आनंद साजरा केला. ओसामा ठार झाल्यानंतर जगभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हवाई हल्ल्यांच्या शक्यतेने जगभरात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या कारवाईवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांची प्रतिक्रिया -

' दहशतवादाविरुद्ध आमची लढाई सुरूच राहिल, पण आज अमेरिकेने एक संदेश दिलाय की कितीही वेळ लागला तरी न्याय अखेर मिळतोच '

पाकिस्तानी मीडियाने ओसामा बिन लादेनच्या घराची दृश्यं दाखवली आहेत. हे घर पाकिस्तानातल्या अबोताबादमधील आहे. यातली महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचे लष्करी प्रशिक्षण केंद्र असलेल्या पाकिस्तान मिलिटरी ऍकडमीपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. या तीनमजली घरावर ही कारवाई झाली, तो भाग निवृत्त लष्करी अधिकार्‍यांच्या घरांचा आहे.

कोण होता ओसामा बिन लादेन ?

- 1957 मध्ये ओसामा बिन लादेनचा जन्म सौदी अरेबियात झाला. बांधकाम क्षेत्रातील मातब्बर अब्जाधीश मोहम्मद बिन लादेन हे त्याचे वडिल. त्यांच्या 50 अपत्यांपैकी एक ओसामा.

- 17 व्या वर्षी सिरीयामधील नातेवाईकाच्या मुलीसोबतओसामाचं लग्न झालं. त्यानंतर ओसामाचे 5 लग्न झाली. पाच पत्नींपासून त्याला 23 मुलं झालेत.

- ओसामाने सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली.

- 1979 मध्ये तो रशियाच्या अफगाण आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये निघून गेला. तिथे त्यांनी रशियन आक्रमणाविरुध्द लढण्यासाठी मोठा फंड गोळा केला.

- 1988 मध्ये त्याचा भाऊ सलेम विमान दुर्घटनेत ठार झाला. त्यानंतर ओसामाच जीवन बदललं. तो मूलतत्ववादी झाला.

- 1990 ओसामाने सौदी अरेबियात अमेरिकन सैन्य तळाविरुध्द आवाज उठवला. सौदी सरकारने ओसामाच नागरिकत्व रद्द केलं. तो सुदानला गेला.

- 1998 मध्ये पूर्व आफ्रिकन देश केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन वकिलातीवर अल - कैदाने हल्ला केला. त्यात 224 जण ठार झालेत.

-1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येताच आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवला.

- ऑक्टोबर 2000 मध्ये येमेन मध्ये यूएसएस कोल युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला घडवला. यात 17 अमेरिकन सैनीक ठार झालेत.

- 2001 लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तान तोरा बोरा इथल्या डोंगरदर्‍यात मिसाईलद्वारे हल्ला केला. मात्र त्यात तो बचावला.

- 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत मोठा आत्मघाती हल्ला लादेननं यशस्वी केला. विमान हायजॅक करुन ती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर धडकवण्यात आली. यात 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले. त्यानंतर 250 कोटी रुपयाचे (25 मिलीयन डॉलर) बक्षीस त्याच्या शिरावर ठेवण्यात आलं. या हल्याची मोठी किंमत तालिबानला चुकवावी लागली. तालिबानी सत्तेतून हटवण्यात आलं. अफगाणिस्तानमधून अमेरिकेन लादेनला पकडण्यासाठी सर्वात मोठी मोहीम आखली. पाकच्या मदत घेण्यात आली.

आजपर्यंत ओसामा बिन लादेननं 60 पेक्षा जास्त व्हिडिओ ऑडियो मेसेज विविध चॅनेलवरुन प्रसारीत/ जारी केले गेले आहेत.

लादेनचा उत्तराधिकारी

क्रुरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून आयमन अल- जवाहरीकडे पाहिलं जातंय. अल कायदाच्या कारवायांचा मास्टरमाईंड म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे अल कायदा आपल्या कारवाया त्याच्या माध्यमातून सुरुच राहणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यानं लिबियावर केलेल्या हल्ल्याबद्दल अमेरिकेला जबाबदार धरलं होतं. आणि मुस्लिम देशांना या विरोध एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्याने केलं होतं. त्याचबरोबर 9/11च्या ट्विन टॉवरवरच्या हल्ल्यानंतर, अमेरिकाविरोधात हा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीमध्ये ओसामा बिन लादेननंतर त्याचा दुसरा क्रमांक होता. काही दिवसांपूर्वीच जवाहरीनं बराक ओबामा यांच्यावरही जोरदार टीका केली होती.

बुश यांच्यासारखे ओबामाही इस्लामविरोधी आहेत असं तो म्हणाला होता. ओसामा बिन लादेनसारखंच तोही अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर लपल्याची माहिती आहे. लादेन आणि जवाहरी यांना 10 सप्टेंबर 2003 ला अल जझीरने एकत्र दाखवलं होतं. यामध्ये ही दोघे डोंगराळ भागात चालत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतात दक्षतेता इशारा

अमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरात हायअलर्ट जारी केला. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये ओसामा मारला जाणं ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे पाकिस्तानात अतिरेक्यांना आश्रय दिला जातो हा आमचा दावा खरा ठरलाय. त्यामुळे मुंबईवर हल्ला करणारे सूत्रधारही पाकिस्तानातच आहे हा आमचा दावा आहे.'

ओसामाचा मृत्यू ही ऐतिहासिक घडामोड असल्याचं परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी म्हटलं आहे. 'ही ऐतिहासिक घटना आहे. दहशतवादाविरोधातल्या जागतिक युद्धातला हा मैलाचा दगड आहे. मात्र यापुढे दहशतवादाविरोधातील प्रयत्न थांबवले जाऊ नयेत. तसेच आपल्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवाद्यांना दिलेल्या आश्रयाचा बीमोड करण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवावेत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 07:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close