S M L

वैमानिकांचा संप सुरूच ; एअर इंडियाचे 35 कोटींच नुकसान

02 मेएअर इंडियाच्या पायलट्सचा संप सहाव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे आतापर्यंत 300 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे एअर इंडियाचे पस्तीस कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. सद्यस्थितीत एअर इंडियाची फक्त 19 विमानं वाहतुकीसाठी सेवेत कार्यरत आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान वाहतुकीला बसला आहे. त्याचबरोबर आखाती देशात होणारी काही उड्डाणही रद्द करण्यात आली आहेत. आयसीपीएच्या मॅनेजमेंटने संप मिटवण्यासाठी पायट्सशी कोणत्याही प्रकारे बोलणी न केल्यामुळे संप चिघळत चालला आहे. दरम्यान काल संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया जवळ पायलट संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी मेणबत्या पेटवून निदर्शनंही केली. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 08:22 AM IST

वैमानिकांचा संप सुरूच ; एअर इंडियाचे 35 कोटींच नुकसान

02 मे

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप सहाव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे आतापर्यंत 300 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे एअर इंडियाचे पस्तीस कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. सद्यस्थितीत एअर इंडियाची फक्त 19 विमानं वाहतुकीसाठी सेवेत कार्यरत आहेत.

या संपाचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान वाहतुकीला बसला आहे. त्याचबरोबर आखाती देशात होणारी काही उड्डाणही रद्द करण्यात आली आहेत. आयसीपीएच्या मॅनेजमेंटने संप मिटवण्यासाठी पायट्सशी कोणत्याही प्रकारे बोलणी न केल्यामुळे संप चिघळत चालला आहे. दरम्यान काल संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया जवळ पायलट संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी मेणबत्या पेटवून निदर्शनंही केली. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 08:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close