S M L

मीनाक्षी पाटील यांच्या घरावर हातोडा

02 मेमुंबई महापालिकेच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम आज महापालिकेन तोडलं आहे. भांडुपला राहणार्‍या मीनाक्षी पाटील, महापालिकेच्या 111 वार्डच्या नगरसेविका आहेत.भांडुपला मिनीलँड भागात त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात कार पार्किंगच्या जागेत, कॉक्रिटचे छत बांधण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामाची तक्रार, महापालिका आयुक्त सबोध कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार महापालिकेने पाटील यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 12:45 PM IST

मीनाक्षी पाटील यांच्या घरावर हातोडा

02 मे

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम आज महापालिकेन तोडलं आहे. भांडुपला राहणार्‍या मीनाक्षी पाटील, महापालिकेच्या 111 वार्डच्या नगरसेविका आहेत.भांडुपला मिनीलँड भागात त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात कार पार्किंगच्या जागेत, कॉक्रिटचे छत बांधण्यात आले होते.

या अनधिकृत बांधकामाची तक्रार, महापालिका आयुक्त सबोध कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार महापालिकेने पाटील यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close