S M L

ओसामाची काळी कारकीर्द

02 मेजगातल्या महासत्तेलाही हादरवून टाकणार्‍या ओसामा बिन लादेनची काळीकुट्ट कारकीर्द पाकिस्तानातून सुरू झाली. आणि त्याचा शेवटही पाकिस्तानातच झाला. मोहम्मद बिन लादेन या बांधकाम क्षेत्रातल्या सौदी अब्जाधीशाच्या 50 मुलांपैकी एक म्हणजे ओसामा. 10 मार्च 1957 मध्ये त्याचा जन्म झाला. ओसामाला 5 पत्नींपासून 23 मुलं आहेत. सिव्हिल इंजिनिअरींगचा पदवीधर असलेल्या ओसामाचे स्वप्न मात्र मुस्लीम देशांमध्ये शरियतनुसार राज्यकारभार चालावा हे होतं. ओसामा आणि त्याच्या कुटुंबीयांचे सौदी राजघराण्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यातूनच अफगाणिस्तानमधील रशियाच्या आक्रमणविरोधात लढण्यासाठी 1979 मध्ये ओसामा पाकिस्तानात गेला. पॅलेस्टाईनमधल्या मुस्लीम ब्रदरहूडचा नेता अब्दुल्लाह अजीझ याच्या सहकार्याने अफगाणिस्तानात ट्रेनिंग कॅम्प सुरू केलं. अमेरिका, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या पाठिंब्याने हे काम सुरू होतं. याच दरम्यान त्याने अल कायदा संघटनेची स्थापना केली. 1989 मध्ये युद्ध संपल्यानंतर ओसामा सौदीत परतला. 1990 मध्ये इराकच्या कुवेतवरच्या हल्ल्यानंतर लादनेचं सौदी राजघराण्याशी बिनसलं. अमेरिकेच्या सौदीतल्या लष्करी तळाविरोधात त्याने जाहीर नाराजी व्यक्त करणं सुरू केलं. सौदीने ओसामाचे नागरिकत्व रद्द केलं. तो सुदानमध्ये गेला. आणि - 1993 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिल्यांदा झालेल्या बॉम्बस्फोटात अल कायदाचे संबंध दिसले - 1996 मध्ये ओसामाने अमेरिकेविरोधात जिहादची उघड घोषणा केली - 1996 मध्ये त्याने सौदी अरेबियातल्या अल खोबर टॉवरवर बॉम्बहल्ला केला- 1998 मध्ये नैरोबी आणि दार-ए-सलाम मधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला कोला. यात शेकडो ठार झाले- 1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येताच ओसामाने आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवला- ऑक्टोबर 2000 मध्ये येमेनमध्ये अमेरिकेच्या युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला घडवला.आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यामुळे अमेरिका हादरली. हा हल्ला अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला होता. यात 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले. त्यानंतर मात्र अमेरिकेनं ओसामाला पकडण्यासाठी दहशतवादाविरोधी जागतिक युद्धाची घोषणा केली. त्यातूनच अफगानिस्तानातली तालिबानची राजवट संपली.अमेरिकेविरोधातल्या कारवायांमुळे जगभरातल्या कट्टरवादी मुस्लिमांकडून त्याला नेहमीच प्रोत्साहन आणि आर्थिक मदत मिळत गेली. काश्मीरमध्ये ओसामाच्या कारवाया नसल्या तरी अफगाणिस्तानातल्या भारतीय दूतावासावर हल्ल्यात अल-कायदाचंही नाव आलं.ओसामाचा शेवट हा दहशतावाविरोधातील युद्धाचाही शेवट असल्याचं बोललं जातंय. अमेरिका आता आपल्या गुप्तचर संघटन कौशल्याचा वापर करत अल कायदाचा दोन नंबरचा म्होरक्या आयमान जवाहिरीला शोधण्याचा प्रयत्न करतेय. मात्र ओसामाने सुरू केलेलं हे युद्ध एका व्यक्तीवर नाही तर एका कट्टरवादी विचारधारेवर अवलंबून आहे. त्यामुळेच ते यापुढेही सुरू राहण्याचा धोका जगाला आहे.ओसामाची काळी कारकीर्द - 1979 - अफगाणिस्तानातल्या रशियाच्या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानात - अफगाणिस्तानात जिहादींचं ट्रेनिंग कॅम्प सुरू - अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तानचा पाठिंबा- 1988 - अल कायदाची स्थापना - 1989 - सौदी अरेबियात परत- 1990 - आखाती युद्धानंतर सौदी राजघराण्याशी बिनसलं- सौदीने ओसामाचे नागरिकत्व रद्द केले, ओसामा सुदानमध्ये गेला ओसामाचे दहशतवादी हल्ले - 1993 - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिल्यांदा बॉम्बस्फोटात संबंध उघड- 1996 - अमेरिकेविरोधात जिहादची घोषणा - 1996 - सौदी अरेबियातल्या अल-खोबर टॉवरवर बॉम्बहल्ला - 1998 - नैरोबी, दार-ए-सलाममधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला - 1999 - तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये तळ हलवला - 2000 - येमेनमध्ये अमेरिकेच्या युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला - 2001 - मध्ये अमेरिकेवर हल्ला

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 05:27 PM IST

ओसामाची काळी कारकीर्द

02 मे

जगातल्या महासत्तेलाही हादरवून टाकणार्‍या ओसामा बिन लादेनची काळीकुट्ट कारकीर्द पाकिस्तानातून सुरू झाली. आणि त्याचा शेवटही पाकिस्तानातच झाला.

मोहम्मद बिन लादेन या बांधकाम क्षेत्रातल्या सौदी अब्जाधीशाच्या 50 मुलांपैकी एक म्हणजे ओसामा. 10 मार्च 1957 मध्ये त्याचा जन्म झाला. ओसामाला 5 पत्नींपासून 23 मुलं आहेत. सिव्हिल इंजिनिअरींगचा पदवीधर असलेल्या ओसामाचे स्वप्न मात्र मुस्लीम देशांमध्ये शरियतनुसार राज्यकारभार चालावा हे होतं. ओसामा आणि त्याच्या कुटुंबीयांचे सौदी राजघराण्याशी अतिशय जवळचे संबंध होते.

त्यातूनच अफगाणिस्तानमधील रशियाच्या आक्रमणविरोधात लढण्यासाठी 1979 मध्ये ओसामा पाकिस्तानात गेला. पॅलेस्टाईनमधल्या मुस्लीम ब्रदरहूडचा नेता अब्दुल्लाह अजीझ याच्या सहकार्याने अफगाणिस्तानात ट्रेनिंग कॅम्प सुरू केलं. अमेरिका, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या पाठिंब्याने हे काम सुरू होतं.

याच दरम्यान त्याने अल कायदा संघटनेची स्थापना केली. 1989 मध्ये युद्ध संपल्यानंतर ओसामा सौदीत परतला. 1990 मध्ये इराकच्या कुवेतवरच्या हल्ल्यानंतर लादनेचं सौदी राजघराण्याशी बिनसलं. अमेरिकेच्या सौदीतल्या लष्करी तळाविरोधात त्याने जाहीर नाराजी व्यक्त करणं सुरू केलं. सौदीने ओसामाचे नागरिकत्व रद्द केलं. तो सुदानमध्ये गेला. आणि

- 1993 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिल्यांदा झालेल्या बॉम्बस्फोटात अल कायदाचे संबंध दिसले - 1996 मध्ये ओसामाने अमेरिकेविरोधात जिहादची उघड घोषणा केली - 1996 मध्ये त्याने सौदी अरेबियातल्या अल खोबर टॉवरवर बॉम्बहल्ला केला- 1998 मध्ये नैरोबी आणि दार-ए-सलाम मधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला कोला. यात शेकडो ठार झाले- 1999 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येताच ओसामाने आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवला- ऑक्टोबर 2000 मध्ये येमेनमध्ये अमेरिकेच्या युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला घडवला.

आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यामुळे अमेरिका हादरली. हा हल्ला अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला होता. यात 3000 अमेरिकन नागरिक ठार झाले. त्यानंतर मात्र अमेरिकेनं ओसामाला पकडण्यासाठी दहशतवादाविरोधी जागतिक युद्धाची घोषणा केली. त्यातूनच अफगानिस्तानातली तालिबानची राजवट संपली.

अमेरिकेविरोधातल्या कारवायांमुळे जगभरातल्या कट्टरवादी मुस्लिमांकडून त्याला नेहमीच प्रोत्साहन आणि आर्थिक मदत मिळत गेली. काश्मीरमध्ये ओसामाच्या कारवाया नसल्या तरी अफगाणिस्तानातल्या भारतीय दूतावासावर हल्ल्यात अल-कायदाचंही नाव आलं.

ओसामाचा शेवट हा दहशतावाविरोधातील युद्धाचाही शेवट असल्याचं बोललं जातंय. अमेरिका आता आपल्या गुप्तचर संघटन कौशल्याचा वापर करत अल कायदाचा दोन नंबरचा म्होरक्या आयमान जवाहिरीला शोधण्याचा प्रयत्न करतेय. मात्र ओसामाने सुरू केलेलं हे युद्ध एका व्यक्तीवर नाही तर एका कट्टरवादी विचारधारेवर अवलंबून आहे. त्यामुळेच ते यापुढेही सुरू राहण्याचा धोका जगाला आहे.

ओसामाची काळी कारकीर्द

- 1979 - अफगाणिस्तानातल्या रशियाच्या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानात - अफगाणिस्तानात जिहादींचं ट्रेनिंग कॅम्प सुरू - अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तानचा पाठिंबा- 1988 - अल कायदाची स्थापना - 1989 - सौदी अरेबियात परत- 1990 - आखाती युद्धानंतर सौदी राजघराण्याशी बिनसलं- सौदीने ओसामाचे नागरिकत्व रद्द केले, ओसामा सुदानमध्ये गेला ओसामाचे दहशतवादी हल्ले - 1993 - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिल्यांदा बॉम्बस्फोटात संबंध उघड- 1996 - अमेरिकेविरोधात जिहादची घोषणा - 1996 - सौदी अरेबियातल्या अल-खोबर टॉवरवर बॉम्बहल्ला - 1998 - नैरोबी, दार-ए-सलाममधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला - 1999 - तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये तळ हलवला - 2000 - येमेनमध्ये अमेरिकेच्या युध्दनौकेवर आत्मघाती हल्ला - 2001 - मध्ये अमेरिकेवर हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close