S M L

दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

04 मेअरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा शोध अखेर संपला. तवांगजवळ लुगुतांग या भागातील 17 हजार फूट खोल भागात खांडू यांचा मृतदेह सापडला आहे. सलग 100 तास खांडू यांच्या शोधासाठी मोहीम सुरू होती. खांडू गेल्या शनिवारी तवांगहून इटानगरला निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले खांडू यांच्यासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. शोधपथकातल्या विमानाला या हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचे मृतदेह दिसले. मात्र हा भाग अतिशय दुर्गम असल्याने प्रत्यक्ष मृतदेहापर्यंत पोहोचेपर्यंत उद्या दुपारपर्यंत वेळ लागणार असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. लष्कर आणि हवाईदल या जागेपर्यंत कसं पोहचणार याबद्दल चर्चा सुरू आहे. रामसापर, जँग धबधबा आणि लुगुतांग अशा तीन ठिकाणांहून या जागेवर जाता येऊ शकतं. सुजुलापासून सहा किमी अंतरावर ही जागा आहे. पण हा संपूर्ण रस्ता सध्या बर्फाखाली झाकला गेला आहे. आणि या ठिकाणी सतत वेगाने वादळं होत असल्याची माहितीही मिळतेय. त्यामुळेच विमानाला इथं उतरणं कठिण आहे. इथले हेलिकॉप्टरचे अवशेष दूर करावे लागतील. त्यानंतरच इथले मृतदेह हाती लागू शकतील.अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू हे खरंतर आर्मी मॅन होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या गुप्तचर खात्यामध्ये 7 वर्षांहून जास्त वेळ सेवा बजावली होती. तिथं त्यांना सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल सुवर्णपदकही मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी तवांग जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्याला वाहून घेतलं. 1990 मध्ये ते पहिल्यांदा अरूणाचल प्रदेशच्या विधानसभेवर थिगंबमुक्तो या मतदारसंघातून निवडून गेले.1995 मध्ये ते दुसर्‍यांदा आमदार आणि सहकार्य राज्यमंत्रीही झाले. 1996 मध्ये ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर उर्जा खातही त्यांनी सांभाळलं. 1999 मध्ये ते तिसर्‍यांदा आमदार झाले. त्यांनी 2003 पर्यंत खाणकाम आणि पुनर्वसन आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2004 मध्ये ते पुन्हा उर्जामंत्री झाले. आणि 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2009 मध्ये ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले.यापूर्वीचे हेलिकॉप्टर अपघात - सप्टेंबर 2009 - नल्लामल्ला जंगल, आंध्रप्रदेश - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - मार्च 2005 - सहारनपूर, उत्तर प्रदेश - हरियाणाचे मंत्री आणि उद्योगपती ओ. पी. जिंदाल यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - मार्च, 2002 - कैकलूर, हैदराबाद - तेलुगु देसमचे नेते आणि लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू सप्टेंबर, 2001 - काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचं कानपूरला प्रचारासाठी जात असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन- जून 1980 - दिल्ली - काँग्रेसचे खासदार संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू खांडू यांच्या या अपघाती मृत्यूनंतर आता संसदीय समितीने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. खराब हवामान असतानाही पायलट्सवर दबाव टाकून उड्डाणासाठी जबरदस्ती करणार्‍या अतीमहत्वाच्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे संकेत समितीने दिलेत. खराब हवामान असतानाही या हेलिकॉप्टरमधून जाण्याचा व्हीआयपीनी हट्ट धरल्याच्या घटना अनेकदा घडल्यात. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचाही अशाच अपघातात मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 09:06 AM IST

दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

04 मे

अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा शोध अखेर संपला. तवांगजवळ लुगुतांग या भागातील 17 हजार फूट खोल भागात खांडू यांचा मृतदेह सापडला आहे. सलग 100 तास खांडू यांच्या शोधासाठी मोहीम सुरू होती. खांडू गेल्या शनिवारी तवांगहून इटानगरला निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले खांडू यांच्यासह पाचजणांचा मृत्यू झाला आहे. शोधपथकातल्या विमानाला या हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचे मृतदेह दिसले.

मात्र हा भाग अतिशय दुर्गम असल्याने प्रत्यक्ष मृतदेहापर्यंत पोहोचेपर्यंत उद्या दुपारपर्यंत वेळ लागणार असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. लष्कर आणि हवाईदल या जागेपर्यंत कसं पोहचणार याबद्दल चर्चा सुरू आहे. रामसापर, जँग धबधबा आणि लुगुतांग अशा तीन ठिकाणांहून या जागेवर जाता येऊ शकतं.

सुजुलापासून सहा किमी अंतरावर ही जागा आहे. पण हा संपूर्ण रस्ता सध्या बर्फाखाली झाकला गेला आहे. आणि या ठिकाणी सतत वेगाने वादळं होत असल्याची माहितीही मिळतेय. त्यामुळेच विमानाला इथं उतरणं कठिण आहे. इथले हेलिकॉप्टरचे अवशेष दूर करावे लागतील. त्यानंतरच इथले मृतदेह हाती लागू शकतील.

अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू हे खरंतर आर्मी मॅन होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या गुप्तचर खात्यामध्ये 7 वर्षांहून जास्त वेळ सेवा बजावली होती. तिथं त्यांना सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल सुवर्णपदकही मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी तवांग जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्याला वाहून घेतलं.

1990 मध्ये ते पहिल्यांदा अरूणाचल प्रदेशच्या विधानसभेवर थिगंबमुक्तो या मतदारसंघातून निवडून गेले.1995 मध्ये ते दुसर्‍यांदा आमदार आणि सहकार्य राज्यमंत्रीही झाले. 1996 मध्ये ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर उर्जा खातही त्यांनी सांभाळलं.

1999 मध्ये ते तिसर्‍यांदा आमदार झाले. त्यांनी 2003 पर्यंत खाणकाम आणि पुनर्वसन आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2004 मध्ये ते पुन्हा उर्जामंत्री झाले. आणि 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2009 मध्ये ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले.

यापूर्वीचे हेलिकॉप्टर अपघात

- सप्टेंबर 2009 - नल्लामल्ला जंगल, आंध्रप्रदेश - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - मार्च 2005 - सहारनपूर, उत्तर प्रदेश - हरियाणाचे मंत्री आणि उद्योगपती ओ. पी. जिंदाल यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - मार्च, 2002 - कैकलूर, हैदराबाद - तेलुगु देसमचे नेते आणि लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू सप्टेंबर, 2001 - काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचं कानपूरला प्रचारासाठी जात असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन- जून 1980 - दिल्ली - काँग्रेसचे खासदार संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू

खांडू यांच्या या अपघाती मृत्यूनंतर आता संसदीय समितीने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. खराब हवामान असतानाही पायलट्सवर दबाव टाकून उड्डाणासाठी जबरदस्ती करणार्‍या अतीमहत्वाच्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे संकेत समितीने दिलेत. खराब हवामान असतानाही या हेलिकॉप्टरमधून जाण्याचा व्हीआयपीनी हट्ट धरल्याच्या घटना अनेकदा घडल्यात. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचाही अशाच अपघातात मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close