S M L

लादेनला जिवंत पकडून गोळ्या घातल्या !

04 मेअमेरिकन सैनिकांनी ओसामा बिन लादेनला जिवंत पकडलं आणि कुटुंबीयांसमोरच त्याला गोळ्या घातल्या असा आरोप ओसामाच्या एका मुलीने केला आहे. पाकिस्तानातील एनबीसी न्यूजनं ही बातमी दिली. अल अरेबिया या अरबी वर्तमानपत्रानही अशीच बातमी दिली होती. ओसामाला जिवंत पकडून गोळ्या घातल्याचे या मुलीने पाकिस्तानी अधिकार्‍यांना सांगितल्याचा दावा या न्यूज एजन्सीजनी केला आहे. अमेरिकी सैनिकांच्या छाप्यात साडलेल्या ग्रुपमध्ये या मुलीचा समावेश होता. ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपला होता, असं जगभरात वारंवार सांगितलं जात होतं. पण, पाकिस्तानच्या नेत्यांनी नेहमी जगाची दिशाभूल केली. पाकिस्तानचे खोटे दावे - असिफ अली झरदारी, राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तान27 एप्रिल 2009 : 'ओसामा जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला हा प्रश्न आहे. त्याचा काहीही छडा लागलेला नाही. ओसामा अस्तित्वात नाही, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.'- युसूफ रझा गिलानी, पंतप्रधान पाकिस्तान3 डिसेंबर 2009 - 'ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आहे, असं मला वाटत नाही.' 13 एप्रिल 2010 - 'ओसामा नक्कीच पाकिस्तानमध्ये नाही. आमची लष्करी कारवाई यशस्वी झाली. आणि जर ओसामा या भागात लपला असता तर आतापर्यंत तो पकडला गेला असता.'- रहमान मलिक, अंतर्गत सुरक्षा मंत्री 12 जुलै 2009 - 'ओसामा जर पाकिस्तानात असता तर आम्हाला ते कळलं असतं. आदिवासी भागात आम्ही हजारोंच्या संख्येनं फौजा पाठवल्या. या भागात जर तो असता तर आम्ही ज्या पद्धतीने तपास करतोय ते पाहता तो पकडला गेला असता.' - शाह मोहम्मद कुरेशी, परराष्ट्र मंत्री, पाकिस्तान21 जुलै 2010 'ओसामा पाकिस्तानात असल्याबद्दलची अटकळ होती, पण विश्वासार्ह माहिती मिळत नव्हती. अशी माहिती असेल तर ही माहिती आम्हाला द्यावी. ओसामा हा पाकिस्तानचा मित्र नाही. त्यामुळे ओसामा इथे असता तर आम्ही त्याला अटक केली असती.'- परवेझ मुशर्रफ, माजी राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तान2 जुलै 2002 - 'ओसामा जिवंत आहे याबद्दल मला संशय आहे. जरी तो जिवंत असला तरी पाकिस्तानात असू शकत नाही. ओसामा जिवंत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं भलंमोठं सुरक्षा पथक असेल आणि त्यामुळे त्याला मोठ्या प्रदेशात राहावं लागेल.' हुसेन हक्कानी, पाकिस्तानचे अमेरिकेतले राजदूत 20 ऑक्टो. 2010 - ओसामा ईशान्य पाकिस्तानात राहतोय, यात काहीच तथ्य नाही. कारण तो तिथं असता तर आमच्या गुप्तचर संस्थांना त्याची माहिती मिळाली असती.'काही उपस्थित होणारे प्रश्न प्रश्न 1ऑपरेशनदरम्यान ओसामाला जिवंत पकडण्याचे आदेश होते की ठार मारण्याचे?- ओबामा यांनी असे आदेश दिल्याचा अधिकृत दावा प्रश्न 2या मोहिमेदरम्यान ओसामानं प्रतिकार केला ? अमेरिकेकडून तीन वेगवेगळे दावे पहिला दावा - मरण्यापूर्वी ओसामानं प्रतिकार केला दुसरा दावा - लादेनच्या हाती बंदूक होती, पण त्यानं ती चालवली नाही.तिसरा दावा - ओसामा पूर्णपणे निशस्त्र होता.प्रश्न 3ओसामाला कुठे कुठे गोळ्या घालण्यात आल्यात ? पहिला दावा - चेहर्‍यावरदुसरा दावा - छातीत आणि डोक्यात प्रश्न 4लादेननं महिलेचा मानवी ढाल म्हणून वापर केला काय? पहिला दावा - लादेनने एका महिलेचा मानवी ढाल म्हणून वापर केला दुसरा दावा - लादेनने मानवी ढाल म्हणून कुणाचाही वापर केला नाहीप्रश्न 5कारवाईत अमेरिकेनं कुणाला ताब्यात घेतलं काय ? बीबीसी - ओसामाच्या मुलाला पकडून नेलंअमेरिका - केवळ ओसामा बिन लादेनचा मृतदेह नेण्यात आला

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 05:27 PM IST

लादेनला जिवंत पकडून गोळ्या घातल्या !

04 मे

अमेरिकन सैनिकांनी ओसामा बिन लादेनला जिवंत पकडलं आणि कुटुंबीयांसमोरच त्याला गोळ्या घातल्या असा आरोप ओसामाच्या एका मुलीने केला आहे. पाकिस्तानातील एनबीसी न्यूजनं ही बातमी दिली. अल अरेबिया या अरबी वर्तमानपत्रानही अशीच बातमी दिली होती. ओसामाला जिवंत पकडून गोळ्या घातल्याचे या मुलीने पाकिस्तानी अधिकार्‍यांना सांगितल्याचा दावा या न्यूज एजन्सीजनी केला आहे. अमेरिकी सैनिकांच्या छाप्यात साडलेल्या ग्रुपमध्ये या मुलीचा समावेश होता.

ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपला होता, असं जगभरात वारंवार सांगितलं जात होतं. पण, पाकिस्तानच्या नेत्यांनी नेहमी जगाची दिशाभूल केली. पाकिस्तानचे खोटे दावे

- असिफ अली झरदारी, राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तान27 एप्रिल 2009 : 'ओसामा जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला हा प्रश्न आहे. त्याचा काहीही छडा लागलेला नाही. ओसामा अस्तित्वात नाही, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.'

- युसूफ रझा गिलानी, पंतप्रधान पाकिस्तान

3 डिसेंबर 2009 - 'ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आहे, असं मला वाटत नाही.' 13 एप्रिल 2010 - 'ओसामा नक्कीच पाकिस्तानमध्ये नाही. आमची लष्करी कारवाई यशस्वी झाली. आणि जर ओसामा या भागात लपला असता तर आतापर्यंत तो पकडला गेला असता.'

- रहमान मलिक, अंतर्गत सुरक्षा मंत्री

12 जुलै 2009 - 'ओसामा जर पाकिस्तानात असता तर आम्हाला ते कळलं असतं. आदिवासी भागात आम्ही हजारोंच्या संख्येनं फौजा पाठवल्या. या भागात जर तो असता तर आम्ही ज्या पद्धतीने तपास करतोय ते पाहता तो पकडला गेला असता.'

- शाह मोहम्मद कुरेशी, परराष्ट्र मंत्री, पाकिस्तान

21 जुलै 2010 'ओसामा पाकिस्तानात असल्याबद्दलची अटकळ होती, पण विश्वासार्ह माहिती मिळत नव्हती. अशी माहिती असेल तर ही माहिती आम्हाला द्यावी. ओसामा हा पाकिस्तानचा मित्र नाही. त्यामुळे ओसामा इथे असता तर आम्ही त्याला अटक केली असती.'

- परवेझ मुशर्रफ, माजी राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तान

2 जुलै 2002 - 'ओसामा जिवंत आहे याबद्दल मला संशय आहे. जरी तो जिवंत असला तरी पाकिस्तानात असू शकत नाही. ओसामा जिवंत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं भलंमोठं सुरक्षा पथक असेल आणि त्यामुळे त्याला मोठ्या प्रदेशात राहावं लागेल.'

हुसेन हक्कानी, पाकिस्तानचे अमेरिकेतले राजदूत

20 ऑक्टो. 2010 - ओसामा ईशान्य पाकिस्तानात राहतोय, यात काहीच तथ्य नाही. कारण तो तिथं असता तर आमच्या गुप्तचर संस्थांना त्याची माहिती मिळाली असती.'

काही उपस्थित होणारे प्रश्न

प्रश्न 1ऑपरेशनदरम्यान ओसामाला जिवंत पकडण्याचे आदेश होते की ठार मारण्याचे?- ओबामा यांनी असे आदेश दिल्याचा अधिकृत दावा प्रश्न 2या मोहिमेदरम्यान ओसामानं प्रतिकार केला ? अमेरिकेकडून तीन वेगवेगळे दावे

पहिला दावा - मरण्यापूर्वी ओसामानं प्रतिकार केला दुसरा दावा - लादेनच्या हाती बंदूक होती, पण त्यानं ती चालवली नाही.तिसरा दावा - ओसामा पूर्णपणे निशस्त्र होता.प्रश्न 3ओसामाला कुठे कुठे गोळ्या घालण्यात आल्यात ? पहिला दावा - चेहर्‍यावरदुसरा दावा - छातीत आणि डोक्यात प्रश्न 4लादेननं महिलेचा मानवी ढाल म्हणून वापर केला काय? पहिला दावा - लादेनने एका महिलेचा मानवी ढाल म्हणून वापर केला दुसरा दावा - लादेनने मानवी ढाल म्हणून कुणाचाही वापर केला नाहीप्रश्न 5कारवाईत अमेरिकेनं कुणाला ताब्यात घेतलं काय ? बीबीसी - ओसामाच्या मुलाला पकडून नेलंअमेरिका - केवळ ओसामा बिन लादेनचा मृतदेह नेण्यात आला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close