S M L

बराक ओबामा यांच्या समर्थकांमध्ये वाढ

04 मेओसामाविरोधातली कारवाई यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या समर्थकांमध्ये वाढ झाली आहे. न्यूयॉर्क टाईम्स-सीबीएस न्यूज पोलच्या सर्व्हेनुसार आता 57 टक्के लोकांनी ओबामांच्या आतापर्यंतच्या कामगिरीला पसंती दिली आहे. गेल्या महिन्यात हा 46 टक्के इतका होता. म्हणजेच त्यांच्या लोकप्रियतेत 11 टक्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांना ठार केल्यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या लोकप्रियतेत 8 टक्क्यांची वाढ झाली होती. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने व्हाईट हाऊसच्या वार रूममधून अमेरिकन नेव्ही सील्सला हल्ला करण्याचा आदेश दिला आणि जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला. पण फक्त 32 % अमेरिकी नागरिक या ऑपरेशन जेरोनिमोच्या यशाचं श्रेय बराक ओबामांना देतात. रॉयटर्स आणि इपसॉसने केलेल्या या पोलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश यांना 13% अमेरिकन्सनी मत दिलं तर 25% लोकांनी दोघांनाही मत दिलं नाही. या ऑपरेशन नंतर बराक ओबामांच्या नेतृत्व गुणांवर कस लागलेला नाही असं बहुतांश अमेरिकी नागरिकांना म्हणजे जवळ जवळ 52% लोकांना वाटतं. तर 39% लोकांना वाटतं ओबामांचे नेतृत्व दिसून येतं. 10% लोकांच्या मते या ऑपरेशनमुळे ओबामाबद्दलचा त्यांचा आदर कमी झाला आहे. दहशतवाद सारख्या संवेदशील गोष्टीला हाताळण्याची ओबामांच्या क्षमतेवर 50 % लोकांना फरक पडलेला दिसत नाही, 42 % नागरिकांना सुधारणा दिसत्ये, तर 7% लोकांना परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही. दरम्यान अमेरिकी गुप्तचार संस्थांच्या कामगिरीत सुधारणा झाली असल्याचे 66% लोकांना वाटतंय तर लश्कराच्या कामगिरी बद्दल 64% टक्के लोकांना सुधारणा झालेली दिसतेय. हा सर्व्हे 2 मेला करण्यात आला होता ज्यात 1010 लोकांची मतं जाणून घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 05:50 PM IST

बराक ओबामा यांच्या समर्थकांमध्ये वाढ

04 मे

ओसामाविरोधातली कारवाई यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या समर्थकांमध्ये वाढ झाली आहे. न्यूयॉर्क टाईम्स-सीबीएस न्यूज पोलच्या सर्व्हेनुसार आता 57 टक्के लोकांनी ओबामांच्या आतापर्यंतच्या कामगिरीला पसंती दिली आहे. गेल्या महिन्यात हा 46 टक्के इतका होता. म्हणजेच त्यांच्या लोकप्रियतेत 11 टक्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांना ठार केल्यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या लोकप्रियतेत 8 टक्क्यांची वाढ झाली होती.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने व्हाईट हाऊसच्या वार रूममधून अमेरिकन नेव्ही सील्सला हल्ला करण्याचा आदेश दिला आणि जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला. पण फक्त 32 % अमेरिकी नागरिक या ऑपरेशन जेरोनिमोच्या यशाचं श्रेय बराक ओबामांना देतात. रॉयटर्स आणि इपसॉसने केलेल्या या पोलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश यांना 13% अमेरिकन्सनी मत दिलं तर 25% लोकांनी दोघांनाही मत दिलं नाही.

या ऑपरेशन नंतर बराक ओबामांच्या नेतृत्व गुणांवर कस लागलेला नाही असं बहुतांश अमेरिकी नागरिकांना म्हणजे जवळ जवळ 52% लोकांना वाटतं. तर 39% लोकांना वाटतं ओबामांचे नेतृत्व दिसून येतं. 10% लोकांच्या मते या ऑपरेशनमुळे ओबामाबद्दलचा त्यांचा आदर कमी झाला आहे.

दहशतवाद सारख्या संवेदशील गोष्टीला हाताळण्याची ओबामांच्या क्षमतेवर 50 % लोकांना फरक पडलेला दिसत नाही, 42 % नागरिकांना सुधारणा दिसत्ये, तर 7% लोकांना परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही.

दरम्यान अमेरिकी गुप्तचार संस्थांच्या कामगिरीत सुधारणा झाली असल्याचे 66% लोकांना वाटतंय तर लश्कराच्या कामगिरी बद्दल 64% टक्के लोकांना सुधारणा झालेली दिसतेय. हा सर्व्हे 2 मेला करण्यात आला होता ज्यात 1010 लोकांची मतं जाणून घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close