S M L

मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना इटानगरमध्ये आणणार

05 मेअरुणाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृतदेह इटानगरला आणण्यात येणार आहे. त्यांचा मृतदेह हेलिकॉप्टर द्वारे राजभवन इथं आणण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत. तवांगजवळ लुगुतांग या भागातल्या 17 हजार फूट खोल भागात खांडू यांचा मृतदेह सापडला. सलग 100 तास खांडू यांच्या शोधासाठी मोहीम सुरू होती. खांडू गेल्या शनिवारी तवांगहून इटानगरला निघाले होते. पण वाटेतच त्यांचं हेलिक ॉप्टर बेपत्ता झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले खांडूंसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शोधपथकातल्या विमानाला या हेलिकॉप्टरमधल्या पाचही जणांचे मृतदेह दिसले. पण हा भाग अतिशय दुर्गम असल्याने प्रत्यक्ष मृतदेहापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागल्याचे गृह मंत्रालयाने सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 10:25 AM IST

मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना इटानगरमध्ये आणणार

05 मे

अरुणाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृतदेह इटानगरला आणण्यात येणार आहे. त्यांचा मृतदेह हेलिकॉप्टर द्वारे राजभवन इथं आणण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत. तवांगजवळ लुगुतांग या भागातल्या 17 हजार फूट खोल भागात खांडू यांचा मृतदेह सापडला. सलग 100 तास खांडू यांच्या शोधासाठी मोहीम सुरू होती.

खांडू गेल्या शनिवारी तवांगहून इटानगरला निघाले होते. पण वाटेतच त्यांचं हेलिक ॉप्टर बेपत्ता झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असलेले खांडूंसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शोधपथकातल्या विमानाला या हेलिकॉप्टरमधल्या पाचही जणांचे मृतदेह दिसले. पण हा भाग अतिशय दुर्गम असल्याने प्रत्यक्ष मृतदेहापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागल्याचे गृह मंत्रालयाने सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close