S M L

..त्या संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

06 मेनगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत मनमानी कारभार करणार्‍या संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संचालकांशी नातं असणार्‍या बड्या थकबाकीदारांना कर्जामध्ये सूट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे खासदार दिलीप गांधींचाही समावेश आहे. सहकार मंत्र्यांच्या गाडीत इंधन भरणे, सहकार मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये करणे यासारखे खोटे खर्च दाखवणार्‍या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा कारभार आयबीएन-लोकमतने उघड पाडला होता. बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या जवळच्या कर्जदारांना कर्जात सूट दिल्याचेही ऑडिट रिपोर्टमध्ये सिद्ध झालंय. या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचाही समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 11:30 AM IST

..त्या संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

06 मे

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत मनमानी कारभार करणार्‍या संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संचालकांशी नातं असणार्‍या बड्या थकबाकीदारांना कर्जामध्ये सूट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे खासदार दिलीप गांधींचाही समावेश आहे.

सहकार मंत्र्यांच्या गाडीत इंधन भरणे, सहकार मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था हॉटेलमध्ये करणे यासारखे खोटे खर्च दाखवणार्‍या नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा कारभार आयबीएन-लोकमतने उघड पाडला होता. बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या जवळच्या कर्जदारांना कर्जात सूट दिल्याचेही ऑडिट रिपोर्टमध्ये सिद्ध झालंय. या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close