S M L

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

7 मे, मुंबईराज्यातल्या सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसे आदेश उशिरा दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं सध्या शंभरावं वर्षं सुरू आहे, आणि शताब्दी महोत्सवातच बँकेवर नामुष्की ओढवली आहे. गेली काही वर्षं या बँेकेच्या संचालक मंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, आणि गेल्या काही वर्षात ही बँक डबघाईला आली आहे. आता बँकेवर दोन प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी एक आहेत डॉ.सुधीर कुमार गोयल तर दुसरे प्रशासक म्हणून सुधीर श्रीवास्तव यांची नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचा ऑडिट रिपोर्टबँकेचा 2009-2010 या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट काय सांगतोय त्यावर एक नजर टाकूया2009-2010मध्ये 100 पैकी 31 मार्क्स या बँकेला मिळाले होते. त्यामुळे बँक ड वर्गात गेली.बँकेचं बुडित कर्ज हे एकूण कर्जाच्या 20.19 टक्के आहे. तर बँकेचं निव्वळ बुडित कर्ज 7.64 टक्के. बँकेनं हिशोबात तब्बल 767 कोटींच्या बुडित कर्जाची रक्कम कमी दाखवली.बँकेनं एकूण 7 हजार 998 कोटी रूपयांच्या वाटलेल्या कर्जापैकी साखर कारखान्यांना 3 हजार 908 कोटी रूपये आणि सुतगिरण्यांना 527 कोटी रूपये तर जिल्हा बँकांना 1781 कोटी रूपये इतक्या कर्जाचा पुरवठा केलाय. बँकेनं 2 कोटी 87 लाख रूपयांचा खोटा नफा दाखवलाय. प्रत्यक्षात मात्र बँकेला 1069 कोटी 41 लाख रूपयांचा तोटा झालाय.बँकेवर गरज नसताना 44 संचालक आहेत.ही बँक 16 जुलै 1966 मध्ये शेड्युल्ड बँक म्हणून वर्गीकृत झाली पण एमएससी बँकेला आरबीआयनं बँकींग लायसन्स मात्र दिलेलं नाही.पवारांचा नाराजीआरबीआयच्या कारवाईवर शरद पवारांनी मात्र नाराजी व्यक्त केलीये. बँकेत भ्रष्टाचार झालेला नाहीये फक्त तक्रारींवरुन RBI नं ही कारवाई केलीये असं शरद पवार म्हणालेत... RBIनं कारवाईपुर्वी बँकेच्या विश्वस्तांना विश्वासात घेणं गरजेचं होतं असंही त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2011 11:42 AM IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

7 मे, मुंबई

राज्यातल्या सहकारी बँकांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसे आदेश उशिरा दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं सध्या शंभरावं वर्षं सुरू आहे, आणि शताब्दी महोत्सवातच बँकेवर नामुष्की ओढवली आहे. गेली काही वर्षं या बँेकेच्या संचालक मंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, आणि गेल्या काही वर्षात ही बँक डबघाईला आली आहे. आता बँकेवर दोन प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी एक आहेत डॉ.सुधीर कुमार गोयल तर दुसरे प्रशासक म्हणून सुधीर श्रीवास्तव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बँकेचा ऑडिट रिपोर्ट

बँकेचा 2009-2010 या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट काय सांगतोय त्यावर एक नजर टाकूया

2009-2010मध्ये 100 पैकी 31 मार्क्स या बँकेला मिळाले होते. त्यामुळे बँक ड वर्गात गेली.बँकेचं बुडित कर्ज हे एकूण कर्जाच्या 20.19 टक्के आहे. तर बँकेचं निव्वळ बुडित कर्ज 7.64 टक्के. बँकेनं हिशोबात तब्बल 767 कोटींच्या बुडित कर्जाची रक्कम कमी दाखवली.बँकेनं एकूण 7 हजार 998 कोटी रूपयांच्या वाटलेल्या कर्जापैकी साखर कारखान्यांना 3 हजार 908 कोटी रूपये आणि सुतगिरण्यांना 527 कोटी रूपये तर जिल्हा बँकांना 1781 कोटी रूपये इतक्या कर्जाचा पुरवठा केलाय. बँकेनं 2 कोटी 87 लाख रूपयांचा खोटा नफा दाखवलाय. प्रत्यक्षात मात्र बँकेला 1069 कोटी 41 लाख रूपयांचा तोटा झालाय.बँकेवर गरज नसताना 44 संचालक आहेत.ही बँक 16 जुलै 1966 मध्ये शेड्युल्ड बँक म्हणून वर्गीकृत झाली पण एमएससी बँकेला आरबीआयनं बँकींग लायसन्स मात्र दिलेलं नाही.

पवारांचा नाराजी

आरबीआयच्या कारवाईवर शरद पवारांनी मात्र नाराजी व्यक्त केलीये. बँकेत भ्रष्टाचार झालेला नाहीये फक्त तक्रारींवरुन RBI नं ही कारवाई केलीये असं शरद पवार म्हणालेत... RBIनं कारवाईपुर्वी बँकेच्या विश्वस्तांना विश्वासात घेणं गरजेचं होतं असंही त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close