S M L

पाकवर कुणीही पुन्हा कारवाई केली तर आम्ही प्रतिहल्ला करू - गिलानी

09 मेओसामा बिन लादेन विरोधातल्या कारवाईनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध आता अधिकच ताणले जाताना दिसत आहे. ऑपरेशन जिरोनिमोबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानींनी पाकिस्तानी संसदेत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. पाकिस्तानच्या भूमीवर कुणीही पुन्हा कारवाई केली, तर आम्ही प्रतिहल्ला करू असा इशारा त्यांनी अमेरिकेला दिला. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची त्यांनी पाठराखण केली. ओसामा पाकिस्तानात होता हे आमच्या गुप्तचर संस्थेचं अपयश नाही तर जगातल्या तमाम गुप्तचर संस्थांचे अपयश आहे असं गिलानी म्हणाले. ओसामाला कुणी जन्माला घातले असा सवाल त्यांनी पाश्चिमात्य देशांना केला. एकीकडे अमेरिकेला इशारा देतानाच दुसरीकडे अमेरिकेशी संबंध बिघडले नाहीयेत असा दावाही त्यांनी आज पाकिस्तानी संसदेत बोलताना केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 05:45 PM IST

पाकवर कुणीही पुन्हा कारवाई केली तर आम्ही प्रतिहल्ला करू - गिलानी

09 मे

ओसामा बिन लादेन विरोधातल्या कारवाईनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध आता अधिकच ताणले जाताना दिसत आहे. ऑपरेशन जिरोनिमोबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानींनी पाकिस्तानी संसदेत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय.

पाकिस्तानच्या भूमीवर कुणीही पुन्हा कारवाई केली, तर आम्ही प्रतिहल्ला करू असा इशारा त्यांनी अमेरिकेला दिला. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची त्यांनी पाठराखण केली. ओसामा पाकिस्तानात होता हे आमच्या गुप्तचर संस्थेचं अपयश नाही तर जगातल्या तमाम गुप्तचर संस्थांचे अपयश आहे असं गिलानी म्हणाले. ओसामाला कुणी जन्माला घातले असा सवाल त्यांनी पाश्चिमात्य देशांना केला. एकीकडे अमेरिकेला इशारा देतानाच दुसरीकडे अमेरिकेशी संबंध बिघडले नाहीयेत असा दावाही त्यांनी आज पाकिस्तानी संसदेत बोलताना केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close