S M L

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग

10 मेमुंबई क्रिकेट असोशियशनचे अध्यक्षपद यावेळीही शरद पवारांकडून ओढून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. माजी कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर हे अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यानी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्याचवेळी एमसीएचे आणखी एक उपाध्यक्ष आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख हेसुद्धा या अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. त्यांच्या समर्थकांकडून विलासरावांना पाठिंबा द्यावा अशी विनंती एमसीएच्या अनेक सभासदांना केली जात आहे. ही अध्यक्षपदाची निवडणुक कधी घ्यायची यासाठी आज एमसीएमध्ये बैठक होतेय. गेली दहा वर्षे एमसीएची खुर्ची पटकावणारे पवार याही वेळेला खुर्ची आपल्याकडे ठेवतात की त्यांच्याकडून काढून घेतली जाते याकडे आता क्रिकेटचं आणि राजकीय वर्तूळाचं लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 09:46 AM IST

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग

10 मे

मुंबई क्रिकेट असोशियशनचे अध्यक्षपद यावेळीही शरद पवारांकडून ओढून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. माजी कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर हे अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यानी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा जाहीर करावा अशी विनंती केल्याचं सूत्रांकडून कळतंय.

त्याचवेळी एमसीएचे आणखी एक उपाध्यक्ष आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख हेसुद्धा या अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. त्यांच्या समर्थकांकडून विलासरावांना पाठिंबा द्यावा अशी विनंती एमसीएच्या अनेक सभासदांना केली जात आहे. ही अध्यक्षपदाची निवडणुक कधी घ्यायची यासाठी आज एमसीएमध्ये बैठक होतेय. गेली दहा वर्षे एमसीएची खुर्ची पटकावणारे पवार याही वेळेला खुर्ची आपल्याकडे ठेवतात की त्यांच्याकडून काढून घेतली जाते याकडे आता क्रिकेटचं आणि राजकीय वर्तूळाचं लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close