S M L

अजित पवारांनी राजीनामा द्यावा मागणीसाठी शिवसेनेच आंदोलन

10 मेअजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेनं आज पुण्यात आंदोलन केलंय. पुण्याच्या कलेक्टर ऑफिससमोर हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, सीडीसीसीबँकेचा घोटाळा असे अजित पवारांचे घोटाळे उघड होत आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची फसवणूक झाली. महेश झगडे यांच्या बदलीबाबत उलटसुलट वक्तव्य करुन पुणेकरांचीही फसवणूक केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री याला जबाबदार आहेत. आणि म्हणूनचं या दोघांनी राजीनामा द्यावा अशी शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी मागणी केली. यावेळी पुणे महापालिकेचे गटनेते शाम देशपांडे तसेच पिंपरी चिंचवडमधल्या शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यासुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असता अजितदादांनी ही विरोधकांवर प्रतीहल्ला चढवला. मला 'चले जाव' म्हणणारे हे कोण, असा सवाल अजित पवारांनी केला. कोल्हापूरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार विरोधकांबद्दल आक्रमक झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 01:13 PM IST

अजित पवारांनी राजीनामा द्यावा मागणीसाठी शिवसेनेच आंदोलन

10 मे

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेनं आज पुण्यात आंदोलन केलंय. पुण्याच्या कलेक्टर ऑफिससमोर हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, सीडीसीसीबँकेचा घोटाळा असे अजित पवारांचे घोटाळे उघड होत आहे.

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांची फसवणूक झाली. महेश झगडे यांच्या बदलीबाबत उलटसुलट वक्तव्य करुन पुणेकरांचीही फसवणूक केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री याला जबाबदार आहेत. आणि म्हणूनचं या दोघांनी राजीनामा द्यावा अशी शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी मागणी केली. यावेळी पुणे महापालिकेचे गटनेते शाम देशपांडे तसेच पिंपरी चिंचवडमधल्या शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यासुद्धा उपस्थित होत्या.

दरम्यान विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असता अजितदादांनी ही विरोधकांवर प्रतीहल्ला चढवला. मला 'चले जाव' म्हणणारे हे कोण, असा सवाल अजित पवारांनी केला. कोल्हापूरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार विरोधकांबद्दल आक्रमक झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close