S M L

पुणे महापालिकेच्या 36 इंग्रजी शाळा बेकायदेशीर

प्राची कुलकर्णी, पुणे 11 मेपुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यमाच्या 36 शाळा बेकायदेशीर रित्या चालवत असल्याची बाब उघड झाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत ही बाब उघड झाली आहे. मंडळाच्या या अनास्थेमुळेच यंदा सातवी पास झालेल्या 200 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. पुणे महापालिकेच्याच शिक्षणमंडळाच्या मुंढवा येथील राजर्षी शाहू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणार्‍या राखीला सातवी पास झाल्यानंतर आता तिला आठवी मध्ये प्रवेश मिळत नाही. राखीसारख्या तब्बल 200 विद्यार्थ्यांपुढचा हाच प्रश्न आहे. मोठा गाजावाजा करत शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याचा सपाटा लावला. गेल्या सहा वर्षांत पुण्यात 46 शाळा उघडल्या. पण यापैकी फक्त 10 शाळांनाच मुख्य सभेची मान्यता घेण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत ही गोष्ट उघड झाली.शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी मात्र हा दावा खोडुन काढला आहे जर शाळांना मंजुरी नव्हती तर त्यांना बजेट कसं मंजुर झालं असा त्यांचा प्रश्न आहे. स्थायी समितीने आता प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यंदा हा प्रश्न 200 विद्यार्थ्यांपुरता मर्यादीत असला तरी पुढच्या वर्षापासून या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 04:05 PM IST

पुणे महापालिकेच्या 36 इंग्रजी शाळा बेकायदेशीर

प्राची कुलकर्णी, पुणे

11 मे

पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यमाच्या 36 शाळा बेकायदेशीर रित्या चालवत असल्याची बाब उघड झाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत ही बाब उघड झाली आहे. मंडळाच्या या अनास्थेमुळेच यंदा सातवी पास झालेल्या 200 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

पुणे महापालिकेच्याच शिक्षणमंडळाच्या मुंढवा येथील राजर्षी शाहू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणार्‍या राखीला सातवी पास झाल्यानंतर आता तिला आठवी मध्ये प्रवेश मिळत नाही. राखीसारख्या तब्बल 200 विद्यार्थ्यांपुढचा हाच प्रश्न आहे. मोठा गाजावाजा करत शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याचा सपाटा लावला. गेल्या सहा वर्षांत पुण्यात 46 शाळा उघडल्या. पण यापैकी फक्त 10 शाळांनाच मुख्य सभेची मान्यता घेण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत ही गोष्ट उघड झाली.

शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी मात्र हा दावा खोडुन काढला आहे जर शाळांना मंजुरी नव्हती तर त्यांना बजेट कसं मंजुर झालं असा त्यांचा प्रश्न आहे. स्थायी समितीने आता प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यंदा हा प्रश्न 200 विद्यार्थ्यांपुरता मर्यादीत असला तरी पुढच्या वर्षापासून या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close