S M L

बुडीत साखर कारखाना नियमबाह्य विक्रीच्या वादात !

11 मेकर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्यांना कमी किमतीने विकल्याच्या ठपका खुद्द राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेवर ठेवला. असंचएक प्रकरण आहे ते म्हणजे तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचं. बाजार भावानुसार किमान 60 कोटी रुपये किमतीचा हा कारखाना राज्य बँकेने अवघ्या 14 कोटी 51 लाख रुपयांना विकला. त्यामुळे एकेकाळी गृहमंत्री आर. आर. पाटील अध्यक्ष असलेला हा कारखाना आधी बुडीत कर्जामुळे आणि आता नियमबाह्य विक्रीमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.सांगली जिल्हा तसा सहकार साखर कारखानदारीतला अग्रगण्य जिल्हा. अनेक मोठमोठे साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याची. हा कारखाना सुमारे 110 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या बोजात बुडाला. 2005 मध्ये हा कारखाना राज्य बँकेने कर्नाटकमधील उगार शुगर या खाजगी कंपनीला भाडेपट्टीवर चालवायला दिला. पण ही कंपनी मध्येच करार सोडून पळून गेली. त्यामुळे राज्य बँकेने हा कारखाना पुन्हा जिल्ह्यातल्याच गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा संघ नावाच्या सोसायटीला भाडेपट्टयावर चालवायला दिला. पण त्यात मोठं राजकारण झालं. पण दोन हंगामानंतर एकाएकी राज्य बँकेनं या कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा सोसायटीलाच विकली. राजकीय हस्तक्षेपामुळे राज्य बँकेने प्रायव्हेट ट्रीटीच्या माध्यमातून अवघ्या 14 कोटी 51 लाख रुपयांना विकल्याचा आरोप होतोय.राज्य बँकेच्या बॅलन्सशिटनूसार तासगाव कारखान्याच्या निमित्ताने बँकेला 42 कोटी 7 लाख रुपयांचा तोटा झाला. त्यामुळेच या कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होतेय. पण या कारखान्याचा विक्री व्यवहार हा नियमानुसारच झाला असा दावा गणपती जिल्हा सोसायटीच्या अध्यक्षांनी केला.एकेकाळी गृहमंत्री आर. आर. पाटील तासगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. कारखाना बुडाल्यानंतर त्यांचेच कट्टर प्रतिस्पर्धी संजयकाका पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात, आमदार बनतात आणि कारखाना चालवायला घेतात हा सर्व काही योगायोग आहे. असं नक्कीच म्हणता येणार नाही. राज्य बँकेचे थकबाकीदार - जय अंबिका साखर कारखानामाजी मंत्री गंगाधर गुंटुरकर, काँग्रेस79 कोटी 67 लाख रु. - नृसिंह साखर कारखानाशंकर बोरकर - शिवसेना 68 कोटी 99 लाख रु. - अकोला जिल्हा साखर कारखानाकोरपे कुटुंबीय, राष्ट्रवादी56 कोटी 17 लाख रु. - तापी साखर कारखानाडॉ. पी. के. अण्णा पाटील - काँग्रेस55 कोटी 63 लाख रु. - डोंगराई साखर कारखानापृथ्वीराज देशमुख - राष्ट्रवादी49 कोटी 90 लाख रु. राज्य बँकेचे थकबाकीदार- राम गणेश गडकरी साखर कारखानारणजित देशमुख, काँग्रेस 45 कोटी 55 लाख रु.- जयंतराव पाटील साखर कारखानासूर्यकांता पाटील, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी39 कोटी 3 लाख रु.- प्रियदर्शनी साखर कारखानादिवंगत अरविंद कांबळे, माजी खासदार 20 कोटी 33 लाख रु.- जरंडेश्वर साखर कारखानाशालिनीताई पाटील, अध्यक्ष, क्रांती सेना20 कोटी 32 लाख रु.- शिवाजीराव निलंगेकर साखर कारखानाशिवाजीराव निलंगेकर, माजी मुख्यमंत्री31 कोटी 24 लाख रु.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 05:18 PM IST

बुडीत साखर कारखाना नियमबाह्य विक्रीच्या वादात !

11 मे

कर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्यांना कमी किमतीने विकल्याच्या ठपका खुद्द राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेवर ठेवला. असंचएक प्रकरण आहे ते म्हणजे तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचं. बाजार भावानुसार किमान 60 कोटी रुपये किमतीचा हा कारखाना राज्य बँकेने अवघ्या 14 कोटी 51 लाख रुपयांना विकला. त्यामुळे एकेकाळी गृहमंत्री आर. आर. पाटील अध्यक्ष असलेला हा कारखाना आधी बुडीत कर्जामुळे आणि आता नियमबाह्य विक्रीमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

सांगली जिल्हा तसा सहकार साखर कारखानदारीतला अग्रगण्य जिल्हा. अनेक मोठमोठे साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याची. हा कारखाना सुमारे 110 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या बोजात बुडाला.

2005 मध्ये हा कारखाना राज्य बँकेने कर्नाटकमधील उगार शुगर या खाजगी कंपनीला भाडेपट्टीवर चालवायला दिला. पण ही कंपनी मध्येच करार सोडून पळून गेली. त्यामुळे राज्य बँकेने हा कारखाना पुन्हा जिल्ह्यातल्याच गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा संघ नावाच्या सोसायटीला भाडेपट्टयावर चालवायला दिला. पण त्यात मोठं राजकारण झालं.

पण दोन हंगामानंतर एकाएकी राज्य बँकेनं या कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा सोसायटीलाच विकली. राजकीय हस्तक्षेपामुळे राज्य बँकेने प्रायव्हेट ट्रीटीच्या माध्यमातून अवघ्या 14 कोटी 51 लाख रुपयांना विकल्याचा आरोप होतोय.

राज्य बँकेच्या बॅलन्सशिटनूसार तासगाव कारखान्याच्या निमित्ताने बँकेला 42 कोटी 7 लाख रुपयांचा तोटा झाला. त्यामुळेच या कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होतेय. पण या कारखान्याचा विक्री व्यवहार हा नियमानुसारच झाला असा दावा गणपती जिल्हा सोसायटीच्या अध्यक्षांनी केला.

एकेकाळी गृहमंत्री आर. आर. पाटील तासगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. कारखाना बुडाल्यानंतर त्यांचेच कट्टर प्रतिस्पर्धी संजयकाका पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात, आमदार बनतात आणि कारखाना चालवायला घेतात हा सर्व काही योगायोग आहे. असं नक्कीच म्हणता येणार नाही.

राज्य बँकेचे थकबाकीदार

- जय अंबिका साखर कारखानामाजी मंत्री गंगाधर गुंटुरकर, काँग्रेस79 कोटी 67 लाख रु.

- नृसिंह साखर कारखानाशंकर बोरकर - शिवसेना 68 कोटी 99 लाख रु.

- अकोला जिल्हा साखर कारखानाकोरपे कुटुंबीय, राष्ट्रवादी56 कोटी 17 लाख रु.

- तापी साखर कारखानाडॉ. पी. के. अण्णा पाटील - काँग्रेस55 कोटी 63 लाख रु.

- डोंगराई साखर कारखानापृथ्वीराज देशमुख - राष्ट्रवादी49 कोटी 90 लाख रु. राज्य बँकेचे थकबाकीदार

- राम गणेश गडकरी साखर कारखानारणजित देशमुख, काँग्रेस 45 कोटी 55 लाख रु.

- जयंतराव पाटील साखर कारखानासूर्यकांता पाटील, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी39 कोटी 3 लाख रु.

- प्रियदर्शनी साखर कारखानादिवंगत अरविंद कांबळे, माजी खासदार 20 कोटी 33 लाख रु.

- जरंडेश्वर साखर कारखानाशालिनीताई पाटील, अध्यक्ष, क्रांती सेना20 कोटी 32 लाख रु.

- शिवाजीराव निलंगेकर साखर कारखानाशिवाजीराव निलंगेकर, माजी मुख्यमंत्री31 कोटी 24 लाख रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close